Thursday, April 25, 2024
Homeभविष्यवेधत्रैमासिक भविष्य - कुंभ Quarterly Future - Aquarius

त्रैमासिक भविष्य – कुंभ Quarterly Future – Aquarius

सौ. वंदना अनिल दिवाणे

नोव्हेंबर – 2020

- Advertisement -

महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी नेपच्यून, द्वितीयात मंगळ, तृतीयात हर्षल, चतुर्थात राहू, अष्टमात शुक्र,नवमात रवि-बुध, दशमात केतू लाभात गुरू-प्लुटो व्ययात शनी अशी ग्रहस्थिती आहे.

तुमची रास – राशीची आद्याक्षरे गू,गे, गो,सा,सी,सू,से, सो, दा अशी आहेत. राशीचे चिन्ह हातात घट घेतलेला पुरूष असे आहे. राशी स्वामी शनी, तत्त्व – वायु, राशी स्वामी स्थिर असल्याने जीवनात कोणत्याच प्रकारचा बदल होणे आवडत नाही. रागाचा पारा जितक्या लवकर वर चढतो तितक्याच वेगाने तो खाली येतो. पश्चिम दिशा फायद्याची. राशी लिंग पुरूष, तमोगुणी स्वभाव, काहीसा क्रूर, प्रकृती कफ-वात-पित्त म्हणजे यापैकी कोणाचेही संतुलन बिघडले की शारीरिक त्रास संभवतो. राशीचा अंमल पायाच्या पोटर्‍यांवर आहे. पायाला इजा होऊ नये ही काळजी घ्या. शुभ रत्न- निलम, शुभ रंग- आकाशी,निळा,काळा. देवता-शनि, हनुमान. शुभ अंक- 8. शुभ तारखा- 8,17,26

नवमात रवि आहे. यामुळे जनमानसात चांगली प्रतिमा तयार होईल. नावलौकीक वाढेल. काहींना यात आनंद वाटण्याऐवजी तुमचा उत्साह भंग करण्याचा प्रयत्न करतील. माता पित्याशी पटणार नाही. विचारातील जनरेशन गॅपमुळे एकमेकांचे विचार एकमेकांना पटणार नाहीत. धार्मिक बाबतीत स्वभाव समभाव राहील.

स्त्रियांसाठी -अष्टमात शुक्र आहे. महिलांना ‘ग‘ ची बाधा संभवते. त्यातून कटू भाषण व कटकटी होऊ नये यासाठी जागरूक रहा. पतीराज खुष रहातील. कौटुंबिक खर्चाला पैसा कमी पडणार नाही.

विद्यार्थ्यांसाठी -विदयार्थीदशा हा खर म्हणजे जन्मभर चालविण्याचा वसा आहे. शरीरप्रकृती चांगली राहील. त्यामुळे अभ्यासासाठी उत्साह टिकून राहिल. काहींना सरकारी मदत मिळेल.

शुभ तारखा -4, 5, 8, 12, 13, 14, 16, 19, 20, 21, 23, 24, 28, 30

डिसेंबर- 2020

महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी नेपच्यून, द्वितीयात मंगळ, तृतीयात हर्शल, चतुर्थात राहू, अष्टमात शुक्र, नवमात रवि-बुध, दशमात केतू, लाभात गुरू-प्लुटो व्ययात शनीअशी ग्रहस्थिती आहे.

नवमात बुध आहे. आर्थिक आवक सरळ मार्गाने होत असल्याने चांगली राहील. सत्पुरूषांच्या सेवेपासून लाभ होतील. लेखक वर्गाच्या हातून प्रतिभासंपन्न लिखाण होईल. काहींना परदेशगमनाची संधी मिळेल. धार्मिक मते जुन्या वळणाची असूनही नवीन विचार प्रवाहाचे स्वागत कराल.

अष्टमात शुक्र आहे. सासरवाडीकडून आर्थिक सहकार्य मिळण्याची शक्यता आहे. मात्र दोन गोष्टी लक्षात ठेवा धनप्राप्ती शक्यतो स्वतःच्या कष्टावर आधारित असावी. कमी श्रमात व अधिक धनप्राप्तीच्या आशेने अवैध मार्गाचा अवलंब करू नये. भ्रष्टाचार सुरूवातीला अमृतासमान गोड वाटला तरी त्याचा परिणाम विषासारखा भयंकर असतो.

व्ययात शनि आहे. धार्मिक बाबतीत स्वतंत्र मते असली तरी ईश्वरावर पूर्ण श्रद्धा राहील. आळसाचा आळस करा व उत्साहाने कामाला लागा. यश शोधत येईल. शनिला मेहनत करणारी माणसे आवडतात फळ देतांना विलंब करतो पण हात आखडता घेत नाही.

स्त्रियांसाठी – नातेवाईक व शेजारी पाजारी यांचे संबंध चांगले राहिल्यामुळे महिलांचा स्वभाव आनंदी व उत्साही राहील. गायनवादनादी कलात प्रगती होईल. काम नीटनेटकेपणाने केल्याने मानसिक समाधान लाभेल.

विद्यार्थ्यांसाठी -तीक्ष्ण बुध्दीमत्ता राहिल त्यामुळे वार्षिक परिक्षा देणे जास्त अवघड वाटणार नाही. या महिन्यात लेखनाचा सराव जितका वाढवाल तेवढी टक्केवारी वाढेल.

शुभ तारखा – 4, 5, 8, 12,13, 14,16, 19, 20, 21, 23, 24, 28, 30

जानेवारी- 2021

महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी नेपच्यून, तृतीयात मंगळ-हर्षल, चतुर्थात राहू, दशमात केतू लाभात बुध-गुरू-शनि अशी ग्रहस्थिती आहे.

व्ययात गुरू आहे. वितंडवादावर नियंत्रण ठेवावे. ईश्वराच्या सत्तेबाबत म्हणावा असा विश्वास वाटणार नाही. विनाकारण भटकण्याची सवय कमी करावी. पैसा अनाठायी खर्च करू नये. नातेवाईकांशी पटणार नाही. कोणाशी मैत्री करावी व कोणाशी करू नये याचा विवेक बाळगावा. धार्मिक संस्थेचे अधिपत्य कराल. अध्यात्मात प्रगती होईल. नोकरीच्या प्रतिक्षेत असलेल्यांना नोकरीचे योग. वाहनापासून अपघात होऊ नये यासाठी काळजी घ्या. कारागिरी आवश्यक असलेले काम चांगले जमेल. नीचांची संगती टाळा. नाही तर नसत्या भानगडीत अडकावे लागेल. प्रवास घडेल त्यातून आर्थिक प्राप्तीची शक्यता आहे.

एकादशात प्लुटो आहे. आकस्मिक रितीने धनलाभ होण्याचा योग संभवतो.

स्त्रियांसाठी -महिलांना पतिराजांचे उत्तम सहकार्य प्राप्त होईल. मात्र कलह टाळण्यासाठी नम्रतेचे पथ्य पाळणे जास्त चातुर्याचे ठरेल. उत्साही रहाल. कला कौशल्यात प्रगती होऊ शकेल.

विद्यार्थ्यांसाठी -विज्ञान व कला शाखा दोन्हीच्या विद्यार्थ्यांसाठी हा महिना चांगला आहे. प्रवास करणे टाळा. मित्रमंडळी सिमीत ठेवा. तूर्त खेळाकडे दुर्लक्ष करा. प्रकृतीची काळजी घेणे आवश्यक आहे.

शुभ तारखा – 3, 6, 7, 14, 18, 19, 21, 25, 26, 27, 29 ,30

- Advertisment -

ताज्या बातम्या