प्रखर बुद्धिमत्तेच्या नेत्याला आडव्या रेषेचा अडसर

प्रखर बुद्धिमत्तेच्या नेत्याला आडव्या रेषेचा अडसर

पृथ्वीराज चव्हाण यांचा जन्म मध्यप्रदेशातील इंदूर येथे 1 मार्च 1946 रोजी झाला. चव्हाण यांनी आपल्या शालेय शिक्षणाची सुरुवात कराड येथील स्थानिक म्युनिसिपल मराठी माध्यम शाळेत केली.

बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि सायन्स, पिलानी येथून मॅकेनिकल अभियांत्रिकीचे पदवी प्राप्त केली. 1967 मध्ये पदवी घेतल्यानंतर त्यांनी जर्मनीत युनेस्कोची शिष्यवृत्ती जिंकली आणि नंतर कॅलिफोर्निया, बर्कले विद्यापीठातून मास्टर ऑफ सायन्स पदवी मिळविली. त्यांनी संगणक विज्ञानावर लेख लिहिले.

अभियांत्रिकी डिझाइन तसेच संगणकीकरणाच्या संशोधनातही हातभार लावला. त्यांनी डिझाईन अभियंता म्हणून अमेरिकेत काम केले. संरक्षण इलेक्ट्रॉनिक्स, पाणबुडीविरोधी युद्ध, संगणक संग्रहण प्रणाली आणि भारतीय भाषांचे संगणकीकरण यावर त्यांनी काम केले.

राजीव गांधी यांच्याशी भेट घेतल्यानंतर चव्हाण राजकारणात आले. 2004 नंतर केंद्रात काँग्रेस सरकार आले. या सरकारमध्ये ते विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचा समावेश असलेल्या पाच विभागांचे कामकाज पाहत होते. 2010 मध्ये काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी चव्हाण यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री केले.

सत्ताधारी राष्ट्रवादी-काँग्रेसची युती तुटल्यानंतर त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. तत्पूर्वी चव्हाण संसदीय कार्य मंत्रालय आणि कर्मचारी, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्तीवेतन मंत्रालयात राज्यमंत्री म्हणून काम पाहिले. चव्हाण हे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे (एआयसीसी) सरचिटणीस, जम्मू-काश्मीर, कर्नाटक, हरियाणा, गुजरात, त्रिपुरा आणि अरुणाचल प्रदेश यासह अनेक राज्यांचे प्रभारी होते.

चव्हाण यांनी 1991 मध्ये लोकसभा निवडणुकीत कराडची पारंपरिक जागा जिंकून राजकीय कारकीर्दीची सुरुवात केली. 1991, 1996 आणि 1998 साली तीन वेळेस लोकसभेची निवडणूक जिंकली, परंतु 1999 मध्ये ते पराभूत झाले. पृथ्वीराज चव्हाण यांनी 24 मे 2004 रोजी नवी दिल्ली येथे पीएमओ राज्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला होता. अलिकडच्या राजकारणात काँग्रेस पक्षातील निष्ठावंत आणि मातब्बर नेते म्हणून त्यांचा उल्लेख होतो.

पृथ्वीराज चव्हाण यांच्या डाव्या हातावरील संचिताचे भविष्य - डाव्या हातावरील हृदय रेषेला उगम स्थानी दोन फाटे असून एक गुरूच्या बोटाकडे व दुसरा गुरु ग्रहावर सरळ गेलेला. त्यामुळे चव्हाण हे हळव्या मनाचे व प्रेमळ आहेत. मस्तक रेषा आयुष्य रेषेपासून किंचित दूर उगम पावलेली व तिचा शेवट हा हातावर तिरका जाऊन चंद्र ग्रहावर गेलेला. त्यामुळे स्वतंत्र निर्णय क्षमता व कल्पनाशक्ती व प्रखर बुद्धिमत्ता लाभलेली आहे. आयुष्य रेषा दमदार व निर्दोष थेट मणिबंधापर्यंत जाऊन थांबलेली, त्यामुळे धडधाकट व सुदृढ प्रकृती व शरीरयष्टी लाभलेली आहे.

आयुष्य रेषेला लागूनच वयाच्या 20 वर्षांपासून मंगळ रेषा उगम पाऊन तिची साथ वयाच्या 70 वयापर्यंत लाभलेली. यामुळे जोम, उत्साह व काम कारण्याची क्षमता दुप्पट आहे. अशी मंगळ रेषा हातावर असता 18-18 तास न थकता काम करण्याचा उत्साह असतो. पहिल्या भाग्य रेषेचा उगम तळहाताच्या मधे होऊन ती मस्तक रेषेवर थांबलेली आहे. तिचा प्रवास वयाच्या 32 वर्षापर्यंत आहे. त्यानंतर दुसरी भाग्यरेषा मस्तकरेषेतून वय वर्ष 30 च्या सुमारास उगम पाऊन हृदय रेषेवर वयाच्या 56 वर्षी समाप्त होत आहे. या दोन्ही भाग्य रेषा उत्तम असून वयाच्या 30 वर्षांपासून स्वकमाईचे उत्पन्न दाखविते.

बुध व रवीच्या बोटामध्ये मस्तक रेषेतून एक सरळ रेषा जाऊन दोनही बोटांच्या पेर्‍यात जाऊन थांबल्यामुळे आत्यंतिक हुशारी प्रदान करते. तसेच परदेशी शिक्षणात चमक मिळवून देणारी आहे. हात, हाताचा आकार, हाताची बोटे, त्यावरील पेरे समान आहेत. बोटांची लांबी तळहातापेक्षा कमी असल्याने त्वरित निर्णय क्षमता बहाल झाली आहे.

तसेच अंगठा मजबूत असल्याने कोणाच्या अधिपत्याखाली हे राहू शकत नाहीत. उजवा व डावा दोनही हात मजबूत व प्रमाणशीर आहेत. डाव्या हातावरील ग्रह उच्चीचे आहेत. त्यामुळे सर्व ग्रहांची सौभाग्यकारक साथ लाभली आहे. चंद्र ग्रह मनगटाकडे शुक्र ग्रहापेक्षा अधिक विस्तारित झाल्याने हुशारी द्विगुणित प्रदान झाली आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांच्या उजव्या हातावरील संचिताचे भविष्य -हृदय रेषा गुरु ग्रहावर गेलेली त्यामुळे सात्विक स्वभाव. डाव्या हातावरील हृदय रेषेपेक्षा पेक्षा थोडी जास्त गडद व जाड असल्याने कठोरपणा असतो. मस्तक रेषा व आयुष्य रेषा ह्या सुरवातीला 10 वर्षापर्यन्त एकत्र त्यामुळे वडीलधार्‍या मंडळींचे उत्तम संस्कार झालेले. हात हाताचा आकार, हाताची बोटे, त्यावरील पेरे समान आहेत. बोटांची लांबी तळहातापेक्षा कमी असल्याने त्वरित निर्णय क्षमता बहाल झाली आहे. तसेच अंगठा मजबूत असल्याने कोणाच्या अधिपत्याखाली हे राहू शकत नाहीत. उजव्या व डाव्या दोनही हात मजबूत व प्रमाणशीर आहेत. उजव्या हातावरील ग्रह उच्चीचे आहेत. त्यामुळे सर्व ग्रहांची सौभाग्यकारक साथ लाभली आहे. चंद्र ग्रह मनगटाकडे शुक्र ग्रहापेक्षा अधिक विस्तारित झाल्याने हुशारी द्विगुणित प्रदान झाली आहे. आयुष्य रेषा दमदार व निर्दोष थेट मणिबंधापर्यंत जाऊन थांबलेली.

त्यामुळे सुदृढ प्रकृती व शरीरयष्टी लाभलेली. आयुष्य रेषेला लागूनच वयाच्या 25 वर्षांपासून मंगळ रेषा उगम पाऊन तिची साथ वयाच्या 55 वयापर्यंत लाभलेली. यामुळे जोम उत्साह व कामकारण्याची क्षमता दुप्पट झालेली. परंतु वयाच्या 55 वर्षी मंगळ रेषेचा फाटा आयुष्य रेषेपासून दूर गेलेला. अशी मंगळ रेषा हातावर असता मंगळ रेषेपासून मिळणारी ऊर्जा ही साठ टक्के कमी होते. मंगळ रेषा आयुष्य रेषेपासून तिच्या प्रवासात जितकी दूर जाईल तितकी तिची क्षमता क्षीण होत जाते. भाग्य रेषेचा उगम आयुष्य रेषेतून झालेला त्यामुुळे चव्हाण अतिभाग्यवंत, ही भाग्य रेषा वयाच्या 32 वर्षापासून मस्तक रेषेला स्पर्श केल्यानंतर सरळ व बारीक होऊन शनी उंचवट्यावर गेलेली त्यामुळे आर्थिक संपन्नता मोठ्या प्रमाणावर वाढते.

मस्तक रेषा वयाच्या चाळीस ते पन्नास वयात पसरट झाल्याने मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते. परंतु ही मस्तक रेषा वयाच्या 40 नंतर उत्तमरित्या तिला दोन फाटे फुटून एक चंद्र व दुसरा वरच्या मंगळ ग्रहाकडे गेल्याने हुशारी व व्यवहारवाद यांचा उत्तम मिलाफ झालेला.

पृथ्वीराज चव्हाण यांच्या उजव्या हातावरील अशुभ रेषांचे भविष्य - हृदय रेषा गुरु ग्रहावर गेलेली. त्यामुळे सात्विक स्वभाव उजव्या हातापेक्षा थोडी जास्त गडद व जाड असल्याने कठोरपणा असतो. परंतु शनी ग्रहावर हृदय रेषेच्या एक फाट्यावर तीन आडव्या रेषा आहेत. तसेच प्रमुख हृदय रेषेवर बारीक बारीक उभ्या रेषा ह्या आडव्या रेषा भावनिक व मानसिक स्थिती अत्यंत वेदनादायी करतात. ह्या भावनिक वेदना त्यांच्या हातावर स्पष्टपणे आहेत. हृदय रेषा ते आयुष्य रेषेच्या आत मंगळ रेषेपर्यन्त एक अखंड आडवी रेषा हातावर आहे. ही रेषा चव्हाण यांच्या सर्वांगीण प्रगतीच्या मार्गात अडसर ठरते. अशी आडवी जाणारी हातावर रेषा असता या लोकांना त्यांची हुशारी व कर्तृत्व मोठे असूनसुद्धा ह्या लोकांना त्यांच्या आयुष्यात अखंड आडवी रेषा अडसर बनते. यांच्या हातून संधी हुकते, नशीब जेेवढे साथ द्यायला पाहिजे तेवढे साथ देत नाही. नाहीतर आज पृथ्वीराज चव्हाण हे राष्ट्रीय नेत्यांमध्ये वरच्या स्थानावर नक्कीच विराजमान असते, आतापेक्षा त्यांची राजकीय स्थिती खूपच उत्तुंग असायला हवी होती. परंतु, हातावरील आडव्या रेषेने त्यांना आणखी पुढे जाऊ दिले नाही.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com