नेहाच्या यशाला हृदय रेषेची व्यावहारिक साथ !

भविष्य आपल्या हाती
नेहाच्या यशाला हृदय रेषेची व्यावहारिक साथ !
नेहा कक्कडneha kakkar

प्रफुुुल्ल कुलकर्णी,ज्योतिषभास्कर, सामुद्रिक मार्तंड-8888747274

नेहा कक्कड यांचा जन्म 6 जून 1988 रोजी उत्तराखंडमधील हृषीकेश येथे झाला. 2006 मध्ये वयाच्या अठराव्या वर्षी नेहा कक्कडने इंडियन आयडॉलच्या दुसर्‍या सत्रात ऑडिशन दिले.

जेथे शोच्या सुरुवातीलाच बाहेर पडावे लागले. चांगला आवाज किंवा गायकीवर कोणीच प्रोत्साहन किंवा शाबासकी दिली नाही. म्हणून चांगले गायचेच असा दृढनिश्चय करून प्रचंड रियाज केला आणि यश गाठले, असे नेहा सांगते.

इंडियन आयडॉलमधील सहभागामुळे पार्श्वगायनाच्या कारकिर्दीला दिशा मिळेल, वाटले होते. पण तसे झाले नाही. सुपारे पाच वर्षे पार्श्वगायनाच्या कुठल्याच ऑफर्स नेहा यांना मिळाल्या नाहीत. संगीताच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये भाग घेतल्यामुळे नेहा यांची गायिका म्हणून ओळख निर्माण होत गेली.

नेहा यांची भक्तीसंगीत कार्यक्रमांमुळे ‘जय माता दी गर्ल’ म्हणून ओळख झाली. 2015 च्या ‘जाणिवा’ या मराठी चित्रपटाच्या प्रीमियर इव्हेंटमध्ये नेहा यांनी त्यांचा पहिला अल्बम ‘नेहा द रॉकस्टार’ लाँच केला.

ज्यात काही रोमँटिक गाणी होती. तिचा भाऊ टोनी कक्कडने संगीतबद्ध केलेल्या रोमिओ-ज्युलियट या संगीत अल्बमसाठी नेहा यांच्या आवाजात गाणे रेकॉर्ड झाले.

नेहा यांनी कन्नड आणि तेलगू संगीतातही पदार्पण केले. त्याची दखल दक्षिणेतील संगीत क्षेत्राने घेतली.

‘नोडू बरे’ या गाण्यासाठी नेहाला सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिकेचा दक्षिणेतील फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.

2011 मध्ये नेहा यांनी कपिल शर्मा आणि अली असगर यांच्यासमवेत कॉमेडी सर्कस के तानसेनच्या दुसर्‍या सत्रात हजेरी लावली. त्यातून नेहाला प्रसिद्धी मिळाली.

त्यांनी युट्यूबवर रिलीज केलेल्या शाहरुख खान अँथमला जोरदार प्रतिसाद मिळाला. शाहरुख खानही यामुळे प्रभावित झाला.

2014 मध्ये नेहा आपल्या गाण्यांमुळे प्रसिद्धीच्या झोतात आल्या. 2016 वर्ष नेहासाठी यशस्वी वर्ष ठरले. भाऊ टोनी कक्कडने संगीतबद्ध केलेले ‘मिले हो तुम’ नेहासाठी टर्निंग पॉईंट ठरले.

या गाण्याला समीक्षक आणि प्रेक्षकांकडून प्रतिसाद मिळाला. 2017 मध्ये नेहाने तनिष्क बागसोबत केलेली अनेक गाणी गाजली.

जून्या हिंदी गाण्यांची रिमेकचा एक नवाच प्रकार तरूणाईला भावला. अशी अनेक गाणी नेहाच्या नावावर जमा आहेत. विशेष म्हणजे सोशल मिडियावर या गाण्यांना जबरदस्त प्रतिसाद मिळाला.

सारेगामापा लिटीलचॅम्प्समध्ये नेहा जज म्हणून पुढे आली. नेहाच्या आवाजात विविधता आहे. विशेष म्हणजे गायकीचे कोणतेही प्रशिक्षण घेतलेले नाही. दरवेळी नवी शैली ही नेहाची खासीयत. या नव्या पिढीच्या लोकप्रिय गायिकेला भारतीय तरूणाईची डोक्यावर घेतले आहे.

हातावरील भविष्य

नेहाचा जन्म गरीब घरात झाला. मात्र कक्कड भावंडांकडे संगीताची जाण व प्रतिभा उपजत आली. त्या प्रतिभेला व्यावहारिक जोड दिल्याने प्रसिद्धी मिळाली. प्रसिद्धीसोबत आर्थिक लाभ होत गेला. आज नेहाकडे सबकुछ आहे.

‘माताकी चौकी’ या धार्मिक संगीत कार्यक्रमाने स्टेज डेअरिंग आले. स्वतःवरील विश्वास वाढला. जनतेला, विशेषता तरुण पिढीला काय हवे याची नस पकडण्यात नेहा यशस्वी ठरली. नेहा आज 32 वर्षाची आहे. त्यांचा प्रेमविवाह झाला.

गेल्या काही वर्षात मोबाईल क्रांती झाली. खेड्यापाड्यातील तरूणांकडे स्मार्टफोन पोहचले. इंटरनेटच्या प्रसारामुळे सोशल मिडिया व त्यावरील मनोरंजन विश्वाचा आवाकाच बदलला. यातून नव्या सेलिब्रिटींचा उदय झाला. नेहा कक्कड त्यापैकी एक. कदाचित नेहापेक्षा अत्यंत प्रतिभाशाली गायिका असतील.

परंतु सोशल मीडियाने सेलेब्रिटी म्हणून नेहा यांना ओळख मिळवून दिली. सोशल मीडिया चा उपयोग नेहा गेल्या 10 वर्षांपासून करते आहे. यासाठीही एकप्रकारचा चाणाक्षपणा अंगी असावा लागतो. भारतातील युट्यूबवर लाखो क्रिएटर आहेत. त्यापैकी नेहासारख्या यश मिळविणारे मोजकेच आहेत.

नेहा यांचा निर्धार, प्रयत्न कष्ट व योग्य वेळी योग्य निवडीने त्यांना प्रसिद्धी मिळाली. सोशल मिडियाचा वापर हा त्यापैकीच एक. नेहा यांना उपजत मिळालेले गायनाचे प्रतिबिंब त्यांच्या हाताच्या आकारात दिसून येते. नेहा यांची उंची जेमतेम 4 फूट 8 इंच आहे.

मात्र हस्तसामुद्रिकदृष्ट्या महत्त्वाचा असलेला त्यांचा हात, हाताचा व बोटांचा आकार व जोमदार अंगठा, बोटांतील सांधे हे सर्वसामान्य स्त्रीसारखे नाही. तर पुरूषाच्या हाताच्या आकारासारखे आहेत.

म्हणजेच स्त्रीसारखे कोमल टोकदार सांधे नसलेले बोटे. शरीराच्या प्रमाणात हाताचा छोटा आकार, लहान अंगठा, हाताची रुंदी लांबी मोठी ह्या सर्व बाबी हस्तसामुद्रिकशास्त्रात कर्तबगार महिलेच्या हात व त्याचा आकार असावा त्याप्रमाणे आहेत.

कुठल्याही महिलेच्या हाताचा व बोटांच्या आकार हा पुरूषी असेल तर त्या सर्व महिला कर्तबगार, दृढनिश्चयी, व्यवहारी व निर्णयक्षमता असलेल्या असतात. नेहा यांना आणखी एक देणगी मिळाली, ती म्हणजे आवाज व अभिनयाची. त्यामुळे नेहा यांना खूप छोट्या वयातच कीर्ती, प्रसिद्धी व श्रीमंती लाभली.

महिलांची बोटे जाडजुड व टोकाला चपटे सापडत नाहीत. बोटांचे टोके नेहमी निमुळती असतात व बोटांमध्ये सांधे नसतात. अंगठा शक्तीहीन सापडतो. इथे मात्र नेहाच्या हाताबाबत उलटे आहे.

हात मोठा, बोटांत सांधे व अंगठा मोठा व मजबूत आहे. या गुणांमुळेच नेहा कर्तबगार आहेत. नेहा यांच्या हातावरील हृदय रेषा सरळ गुरु ग्रहापर्यंत गेली आहे. अशा वेळी या व्यक्ती स्वार्थी व व्यवहारिक निर्णय घेतात. त्या भावनाप्रधान असू देत पण अंतिम निर्णयाच्या वेळी स्वतःचे हित ते विसरत नाहीत. अशा वेळी भावनेला आवर घालू शकतात. नेहा ब्रेकअप झाल्यानंतर परत प्रेमात पडल्या व विवाहबद्ध झाल्या, यातून ते दिसून येते.

नेहा यांच्या हातावरील मस्तक रेषा सरळ आहे. त्यामुळे वरच्या मंगळाचे गुण त्यांना लाभले आहे. या गुणात विचारपूर्वक निर्णय व ठरवलेले काम पूर्ण करण्याची क्षमता व निश्चय येतो. मुख्य मस्तकरेषेच्या खालीच चंद्र ग्रहावर आडवी झालेली आणखी एक मस्तक रेषा मुख्य मस्तक रेषेच्या बर्‍याच खाली ही रेषा प्रतिभा देते. ती नेहा यांना मिळालेली आहे.

रवी रेषा ही आंतरराष्ट्रीय मानसन्मान देणारी आहे. त्याच जोडीला भाग्य रेषा शनी ग्रहावर गेल्याने ती अमाप आर्थिक लाभ देणारी आहे. हातावरील गुरु ग्रह मोठा आहे. त्यामुळे अहंभाव आहे. परंतु मस्तक रेेषा व हृदय रेषेचा व्यावहारिकपणा असल्याने अहंभावाचे कुठे प्रदर्शन करायचे व कुठे नाही हे नेहा यांना चांगले कळते.

एकंदरीतच नेहा यांचा हात व हातावरील भविष्य पाहिले तर एक लक्षात येते, स्वतःच्या उणेपाणाची कधीही पर्वा न करता आपल्या आवाजाने, अभिनयाने रसिकप्रेक्षकांना जिंकले. नृत्य या विषयातही त्यांनी प्रयत्नपूर्वक आपल्या मर्यादा ओळखून काम केले आहे. त्यामुळे यश मिळाले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com