मानसिक ताणतणावात दबलेल्या सुशांतच्या हस्तरेषा

सुशांतसिंग राजपूत
सुशांतसिंग राजपूत

Bhavishyavedh

सुशांतसिंग राजपूत याचा जन्म 21 जानेवारी 1986 रोजी झाला. त्याचे कुटुंबीय बिहार येथील पूर्णियाचे राहणारे होते. 2002 साली सुशांतच्या आईच्या मृत्यूनंतर संपूर्ण कुटुंब दिल्लीला स्थायिक झाले. 2003 साली मेरिटमध्ये बारावी पास झाल्यानंतर त्याने मेकॅनिकल इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला. फिज़िक्स या विषयात तो राष्ट्रीय ऑलंम्पियाडचा चॅम्पियन होता. सुशांतने 11 इंजिनिअरिंगच्या परीक्षा दिल्या व त्याला सर्व परीक्षांमध्ये मेरिटचे मार्क मिळाले. सुशांतला अभिनय व नृत्याची आवड असल्याने त्याने बॅरी जोन्सच्या थिएटर अकॅडमीमध्ये प्रवेश घेतला व अभिनयाच्या शिक्षणालासुद्धा त्याने सुरुवात केली. थियेटर व नृत्यकलेच्या शिक्षणामुळे त्याचे इंजिनिअरिंगच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ लागले. खूप विषय मागे राहू लागले. शेवटी त्याने शिक्षण अर्धवट सोडून दिले.

अभिनयाचे शिक्षण घेताना त्याच्या हे लक्षात आले की स्टेज डेअरिंग कमी पडते. त्यामुळे तो नृत्य कला आत्मसात करण्याच्या प्रयत्नाला लागला. त्याने शामक डावर डान्स अकॅडमीमध्ये प्रवेश घेतला. त्याच्या मेहनतीचे चीज झाले. ग्रुप डान्समध्ये, 2005 साली आस्ट्रेलिया येथे 51 फिल्म फेअर अवॉर्डच्या एका डान्सच्या समूहात नृत्याच्या प्रकारात एक्स्ट्रा नृत्य कलाकार म्हणून त्याची निवड झाली. 2006 साली त्याची आस्ट्रेलिया येथील कॉमन वेल्थ गेम च्या उदघाटनप्रसंगी सांस्कृतिक सामूहिक नृत्यात सुद्धा निवड झाली.

अभिनयामध्ये करिअर करण्याच्या प्रेरणेने त्याने मुंबई गाठली व नादिरा बब्बरच्या थिएटर अकॅडमीमध्ये सामील झाला. तिथे त्याने थियेटर ग्रुप बरोबर अडीच वर्षे काम केले. त्या दरम्यान त्याला प्रसिद्ध नेस्टले कंपनीच्या टीव्हीच्या जाहिरातीत काम करण्याची संधी दिली व त्याकाळी त्याने केलेल्या जाहिरातीतील कामाची प्रशंसा झाली व जाहिरातसुद्धा सुपर हिट ठरली. या जाहिरातीने सुशांतचा टीव्हीच्या पडद्यावरील पदार्पणाचा मार्ग सुकर झाला.

2008 साली ‘किस देश मे है मेरा दिल’ या स्टार प्लसच्या मालिकेमध्ये त्याचे पहिले पदार्पण झाले. पुढे 2009 ते 2011 पर्यंत त्याने ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेत काम केले. 2013 मध्ये त्याचा पहिला चित्रपट ‘कै पो’ प्रदर्शित झाला. फिल्म फेअर अवॉर्ड मध्ये बेस्ट देबू अ‍ॅक्टरचे नॉमिनेशन मिळाले. पुढे त्याने विनोदी कथा असलेले शुद्ध देसी रोमान्स व व्योमकेश बक्षी आणि पुढे अनेक चित्रपटात छोटे रोल केले.

2016 साली एम एस धोनी - अनटोल्ड स्टोरी या चित्रपटातील अभिनायासाठी ‘फिल्म फेअर’चे बेस्ट अ‍ॅक्टर अवॉर्ड मिळाले. 2018/19 साली केदारनाथ व छिछोरे या त्याच्या चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर यश मिळाले.

सुशांत सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमामध्ये सामील होत होता. ‘सुशांत फॉर एज्युकेशन’ या उपक्रमाद्वारे तो मुलांच्या शिक्षणासाठी कार्यक्रम घेत असे. भारताच्या महिला कल्याण विभागात सुद्धा तो कार्यक्रम घेत असे.

14 जून रोजी वयाच्या 34व्या वर्षी सुशांत ने आपल्या वांद्य्राच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

santosh

सुशांतच्या डाव्या व उजव्या हातांवरील रेषांचे वर्णन व त्यांचे शुभ-अशुभ परिणाम

सुशांतसिंगच्या उजव्या हातावर दोन ठिकाणी हृदयरेषा आहेत. त्यापैकी नंबर 1 बाणाने दाखविलेल्या हृदयरेषेचे तुकडे आहेत. हे चार तुकडे शनी ग्रहाखाली आहेत. वस्तुतः हे हृदयरेषेचे स्थान नव्हे !

शनी ग्रहांमुळे हृदयरेषेवर अशुभ परिणाम झाला आहे. शनी ग्रहाकडे हृदयरेषा नुसती किंचित वरच्या बाजूला ओढली गेली तरी त्या व्यक्तीच्या मनात जीवन जगताना असुरक्षित भावना वाढीस लागते. इथे तर हृदयरेषेचे चार तुकडे शनी ग्रहाखाली असल्याने सुशांतच्या मानसिक स्थितीवर खरोखरच खूपच वाईट परिणाम होत असणार किंवा झाला असणार.

हृदयरेषेची सुरुवात गुरू ग्रहावर होते. शनी ग्रहाच्या मध्यापर्यंत शनिरेषेचा प्रवास 30 वर्षांच्या पुढे असतो. सुशांतने वयाच्या 34 व्या वर्षीच आत्महत्या केली. हृदयरेषेच्या पहिल्या दोन तुकड्यांत अंतर आहे. हे शनी ग्रहाच्या मध्य भागाच्या किंचित पुढे आहे. त्यामुळे आत्महत्येचे वय बरोबर 34 येते.

दोन नंबरच्या बाणाने गुरू ग्रहावरील चार पाच व्रण दिसून येत आहेत. पसरट डाग दिसून येत आहेत. गुरू ग्रह हा सात्त्विक विचारसरणीचा आहे, न्यायी बुद्धी देणारा व व मनुष्याला नम्रपणे उत्कर्षाच्या मार्गावर जाण्यासाठी कुटुंब व समाजासाठी योगदान देण्याची व त्यांच्या प्रति कायम कृतज्ञ राहण्याची मानसिकता देणारा आहे. येथे गुरू उंचवट्यावर चार पाच व्रण दिसून येत आहेत. त्यामुळे गुरू ग्रह बिघडला आहे व त्या डागांमुळे सुशांतला गुरूच्या शुभ गुणांची साथ लाभली नाही.

सुशांतसिंग याच्या उजव्या हातावर 3 नंबर बाणाने दाखविलेली हृदयरेषा सरळ मस्तक रेषेकडे गेलेली आहे. अशा वेळेस यांचा मनावर ताबा नसतो. कधी खूप राग तर कधी खूप प्रेम अशी यांची अवस्था बदलत असते.

चार नंबरच्या बाणाने दाखविलेली मस्तकरेषा आहे. ही चंद्र ग्रहाकडे खाली गेलेली आहे. अशा परिस्थितीत हे लोक कायम आपल्याच विचारात असतात. अशा वेळेस त्यांचे मन स्थिर नसते.

सुशांतसिंगच्या उजव्या व डाव्या हातावरील तिसरे बोट म्हणजे रविचे बोट पाच नंबरच्या बाणाने दाखविले आहे. हे बोट पहिल्या बोटापेक्षा लांब आहे. त्यामुळे रवि ग्रहाचे प्रसिद्धी मान सन्मानाबाबत अशी माणसे फार तीव्र भावनेची असतात. अशा परिस्थितीत ती व्यक्ती स्वतःला कायम प्रसिद्धी व प्रकाशात ठेवण्याचे अथक प्रयत्न करते.

डाव्या हातावर सुद्धा दोन हृदयरेषा आहेत. शनी ग्रहाच्या खाली पाच तुकड्यांनी असलेली ही रेषा कायम मानसिक अस्थिरता व असुरक्षित भावना देते.

दोन नंबरच्या हृदयरेषेचा उगम गुरू ग्रहावर दोन फाट्यांनी झाला आहे. एक फाटा सरळ गुरू ग्रहावर व दुसरा मस्तकरेषेत जाऊन मिळाला आहे. अशा परिस्थितीत व्यक्ती खूप भावनाशील असते. आपण सर्वांवर प्रेम करतो पण कुणी आपल्यावर प्रेम करीत नाही, अशी यांची कायमची भावना असते.

डाव्या हातावरील मस्तकरेषा 3 व 4 नंबरच्या बाणाने दाखविली आहे. येथे मस्तकरेषेचे दोन तुकडे आहेत. यामुळे सुशांतची हुशारी अत्यंत वाढली आहे; परंतु चार नंबर बाणाने दाखविलेली मस्तकरेषा तीन नंबरच्या मस्तकरेषेस आडवी झाली आहे आणि ती चंद्र ग्रहावर उतरली आहे. याचा परिणाम असा की याचे मानसिक ताणतणाव कायम चालू राहतात.

-प्रफुल्ल कुलकर्णी

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com