Thursday, April 25, 2024
Homeभविष्यवेधलाफिंग बुद्धा अन् मनोकामना

लाफिंग बुद्धा अन् मनोकामना

जीवनात सुख, समृद्धी, शांतता नांदावी, यासाठी अनेक घरात काही विशिष्ट वस्तू ठेवलेल्या आपण पाहतो. यापैकी काही गोष्टी या सौभाग्याच्या सूचक मानल्या गेल्या आहेत. मात्र, वास्तुशास्त्र आणि फेंगशुई शास्त्रात लाफिंग बुद्धाचे विशेष महत्त्व

नमूद करण्यात आले आहे. लाफिंग बुद्धाची मूर्ती लकी चार्म मानण्यात येते. म्हणूनच कार्यालयात आणि घरात लाफिंग बुद्धाची मूर्ती ठेवलेली पाहायला मिळते. यामुळे संपन्नता, यश, प्रगती, आर्थिक समृद्धी शक्य व साध्य होऊ शकते, अशी मान्यता आहे.

- Advertisement -

तसेच नकारात्मक ऊर्जेचा नायनाट होऊन सकारात्मकतेचा संचारही लाफिंग बुद्धामुळे शक्य होतो, असे मानले गेले आहे. लाफिंग बुद्धाच्या अनेकविध मूर्त्या पाहायला मिळतात.

आपल्या मनातील इच्छापूर्तीसाठी लाफिंग बुद्धाचे वेगळे महत्त्व विषद करण्यात आले आहे. कोणत्या लाफिंग बुद्धाच्या मूर्तीमुळे नेमक्या काय मनोकामना पूर्ण होऊ शकतात? जाणून घेऊया…

आर्थिक स्थितीत सुधारणा

व्यापार, व्यवसाय यात वारंवार नुकसान होत असेल; पैसा तसेच रोखीच्या समस्या वरचेवर उद्भवत असतील, तर कार्यालयातील टेबलावर होन्ही हात उंचावलेल्या लाफिंग बुद्धाची मूर्ती ठेवावी, असे सांगितले जाते. असे केल्याने काही ना काही लाभ मिळण्यास सुरुवात होते.

आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत मिळते. होणार्‍या नुकसानाचे प्रमाण कमी होते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.

कर्जमुक्तीकडे एक पाऊल

आर्थिक आघाडीवरील चिंतेत वरचेवर भर पडत असेल; कर्जामुळे मानसिक ताण, तणाव वाढत असतील, तर घरामध्ये हातात पैशाचा बटवा असलेल्या लाफिंग बुद्धाची मूर्ती ठेवावी, असे सांगितले जाते. असे केल्याने आर्थिक स्थितीत हळूहळू सुधारणा होऊन कर्जमुक्तीच्या दिशेने एक एक पाऊल पुढे पडण्यास सुरुवात होऊ शकेल, असे सांगितले जाते.

सकारात्मक उर्जेसाठी –

मुलांसह खेळणार्‍या लाफिंग बुद्धाची मूर्ती घरात आणल्याने घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो, असे सांगितले जाते. तसेच मुलांशी निगडीत समस्या दूर होण्यास मदत मिळते, असे सांगितले जाते. जीवनातील अनेक गोष्टी सुधारण्यास या प्रकारच्या मूर्तीचा उपयोग आणि फायदा होतो, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.

व्यापार, दुकानांसाठी –

व्यापार गतिमान होत नसेल किंवा दुकानात अपेक्षित विक्री होत नसेल, तर दुकानात आणि व्यापाराशी निगडीत वास्तूत हातात थैली घेतलेली लाफिंग बुद्धाची मूर्ती ठेवावी, असे सांगितले जाते. असे केल्याने नवीन ग्राहक मिळण्यास मदत होते. कोषवृद्धी होते. दुकानातील विक्री वाढण्यास मदत होऊ शकते. व्यापार, दुकानातील समस्यांतून बाहेर पडण्याचा मार्ग सापडायला लागतो, असे सांगितले जाते.

दृष्ट लागत असल्यास –

असेल, तर घरात किंवा कार्यालयात डायनोसोरवर बसलेल्या लाफिंग बुद्धाची मूर्ती ठेवावी, असे सांगितले जाते. असे केल्याने घरातील तसेच कार्यालयातील नकारात्मक ऊर्जा संपुष्टात येते. दृष्ट लागत नाही, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.

सुख-शांतीसाठी –

घरात, कुटुंबात सुख, शांतता नांदावी, असे वाटत असेल, तर हातात वाटी, वाडगा घेतलेल्या लाफिंग बुद्धाची मूर्ती घरात ठेवावी, असे सांगितले जाते. असे केल्याने समस्या, अडचणी दूर होण्यास मदत होते. घरातील वातावरण सकारात्मक होते. कुटुंबातील सदस्यांमध्ये असलेला स्नेहभाव द्विगुणित होतो, असे सांगितले जाते.

- Advertisment -

ताज्या बातम्या