ब्रिटीश मॉडेल ते बॉलिवूड अभिनेत्री
भविष्यवेध

ब्रिटीश मॉडेल ते बॉलिवूड अभिनेत्री

भविष्य आपल्या हाती

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

प्रफुुुल्ल कुलकर्णी,ज्योतिषभास्कर, सामुद्रिक मार्तंड-8888747274

भारतामध्ये टॅलेंट ची कमी आहे कि जणू श्रीलंका, अमेरिकेतील मॉडेल असे बरेचसेे नावे घेता येतील अश्या आयात केलेल्या अभिनेत्री बॉलिवूडमध्ये यशस्वी आहेत. हजारो मुली ज्यांच्यात टॅलेन्ट आहेत त्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये येण्यासाठी धपडत आहेत. पण ज्यांना हिंदीही येत नाही अश्या आयात नट्या यशस्वी होत आहेत.

याचा असा अर्थ होत नाही कि आयात झालेल्या नट्या टँलेन्टेड नाही, त्यांच्यात टॅलेन्ट असल्याशिवाय बॉलिवूड च्या निर्मात्यांच्या त्या पसंतीस उतरू शकत नाहीत. परंतु स्वर्गीय अभिनेता सुशांत सिंगच्या आत्महत्येबाबत संपूर्ण बॉलीवूडमधील राजकारणाला तोंड फुटले आहे.

बॉलीवूडचे राजकारण काहीही असो आज आपण ज्या ब्रिटिश मॉडेल कॅटरिनाला हिंदीतील ओ का ठो कळत नव्हते ती आज आज यशस्वी अभिनेत्री म्हणून एक तपाहून अधिक काळ बॉलिवूडमध्ये यशस्वी आहे.

कुठल्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी अपार कष्ट लागतात त्याचबरोबर नशिबाची साथही आवश्यक असते. आज आपण कटरिना कैफ यांना नशिबाने किती साथ दिली ते पाहणार आहोत. वस्तू स्थिती अशी आहे कि यशस्वी होण्यासाठी 95% मेहनती बरोबरच 5% नशिबाची साथ आवश्यक असते, तेव्हाच 100% यश लाभते. कितीही प्रयत्न केले तरी 5% ने यश हिरावून घेतले तर 100% यश लाभत नाही. कुठल्याही प्रयत्नाला नशिबाची साथ लाभलेली असेल तर यश हे निश्चित असते.

हसत सामुद्रिक शास्त्र सांगते कि अथक प्रयत्न केली कि अशक्य वाटणारे यश लाभते म्हणजेच प्रयत्ननाने नशीब बदलता येत.

कटरिना कैफ यांचा जन्म हाँगकाँगमध्ये 16 जुलै 1983 साली झाला. कतरीनाचे वडील मूळ काश्मीरचे परंतु ब्रिटनमध्ये व्यवसाय करीत असत. कतरीना आई चे नाव सूझाने त्या ब्रिटन मध्ये वकिली व्यवसाय व सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम पाहतात. कतरीना लहान असतानाच तिचे वडील कैफ यांनी फारकत घेतली. आईनेच कतरिनाची पालन पोषण केले तिला मोठे केले. कतरिनाची आई सामाजिक कार्यकर्ता असल्याने त्या संपूर्ण युरोपभर प्रत्येक देशात थोड्या काळासाठी राहिल्या त्या फिरस्त्या असल्याने अनेक देशातून त्यांचे स्थलांतर होत होते शेवटी त्या परत ब्रिटनमध्ये स्थायिक झाल्या. कटरिना वर आईनेच संस्कार केले वडिलांची माया तिला मिळाली नाही. ब्रिटनमध्ये तीन वर्ष कटरिना राहिल्या व नंतर भारतात आल्या. भारतात आल्या नंतर त्यांनी आपल्या नावा पुढे वडिलांचे कैफ हे आडनाव लावले.

कटरिना ने अवघ्या 14 व्या वर्षी हवाई येथील ब्युटी कॉन्टेस्ट जिंकली, तिने भारतात येण्यापूर्वी फ्री लान्स मॉडेल म्हणून ब्रिटन मध्ये काम केले. लंडनमध्ये असताना अभिताभ बच्चन, जॉकी श्रॉफ यांच्यावर चित्रित होणार्‍या बूम ह्या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. बूम चित्रपटाचे चित्रीकरण भारतात होत व मॉडेलिंगच्या ऑफरही तिला मिळाल्या. पुढे तिला हिंदी भाषा येत नसल्याने तिला बूम चित्रपटातून वगळण्यात आले. 2003 मध्ये महेश भट्ट यांनी त्यांच्या चित्रपटात घेतले पण तिथेही हिंदी येत नसल्याने तिची निराशा झाली. कटरिना ने एक तामिळ चित्रपट केला त्यात तिला यश मिळाले.

2005 मध्ये राम गोपल वर्मा यांनी त्यांच्या सरकार या चित्रपटात काम दिले, पुढे सलमानखान याने त्याच्या मैने प्यार क्यू किया या चित्रपटात काम दिले. या कामासाठी कॅटरिनाला स्टार डस्ट अवॉर्ड मध्ये यशस्वी नवतारका म्हणून गौरवले गेले. पुढे 2008 पर्यंत कटरिना ने कॉमेडी हिट फिल्म्स दिल्या व ती यशस्वी बॉलिवूड तारका म्हणून उदयास अली. 2003 पासूनच तिने हिंदी शिकण्यासाठी अपार कष्ट घेतले, सुरवातीचे तिचे चित्रपट डबिंग मध्ये केले गेले.

2003 च्या चित्रपटसृष्टीत प्रवेश करण्याआधी तिने भारतात मॉडेलिंग केले,ती टी.व्ही.वर कोका कोला सारख्या नामांकित कंपनीबरोबर जाहिराती केल्या त्यामुळेे कटरिना चर्चेत राहिली.

एक था टायगर, धुम , बँग बँग या चित्रपटांनी कॅटरिनाला यशाच्या शिखरावर नेऊन ठेवले. झिरो चित्रपटाला बेस्ट सपोर्टींग ऍक्टरचे फिल्म फेयर अवॉर्ड मध्ये नॉमिनेशन मिळाले. सलमान खान बरोबरचा टायगर जिंदा है या चित्रपटानेही तिला लोकप्रियता मिळवुन दिली. सलमान खानचे वय सुद्धा खूप झाले आहे कॅटरिना सुद्धा 37 वर्षाची होऊन गेली त्यामुळे वयस्क अभनेत्यांबरोबर तिला चित्रपट मिळत राहणार, याचे एक महत्वाचे कारण म्हणजे कॅटरिना लग्नाच्या भानगडीत पडली नाही आपल्या करियरवर लक्ष दिले. हिंदी येत नसताना सुद्धा आपल्या प्रयत्न व नशिबाच्या जोरावर आज ती बोॅॅलीवूडची यशस्वी तारका आहे, चेहेरे पट्टी भारतीय नसताना सुद्धा व सुमार अदाकारी असताना सुद्धा ती बॉलिवूड मध्ये यशस्वी झाली आहे, ‘याला म्हणतात नशीब’.

कटरिना कैफ यांच्या उजव्या हातावरील भाग्यकारक रेषा व त्यांचे विश्लेषण

नं. 1 बाण - मस्तक रेषा व आयुष्य रेषा यातील अंतर हे उगम स्थानी आहे व असे मस्तक रेषेत व भाग्य रेषेत अंतर असल्यास किंवा त्या एकत्र उगम पावत नसल्यास अश्या व्यक्ती अत्यंत हुशार व स्वयंनिर्णय क्षमता असलेल्या असतात.

नं. 2 बाण - भाग्य रेषा वयाच्या 20 व्या वर्षाृनंतर थेट शनी उंचवट्यावर निर्दोष गेलेली, नियमित व भरपूर आर्थिक उत्पन्न दाखविते.

नं. 3 बाण - चंद्राचा उंचवटा मणिबंधकडे फुगीर झाला आहे, हा शुक्र ग्रहा पक्षा खाली मनगटाकडे सरकला आहे अश्या परिस्थितीत चंद्र ग्रहाचे गुण मोठ्या प्रमाणावर लाभत असतात, यामुळे कल्पना शक्ती, व हुशारीमध्ये वृद्धी होते.

नं. नं . 4 व 7 बाण - रवी रेषा थेट रवी ग्रहावर गेल्यामुळे मान सन्मान कीर्ती, कला, अभिरुची व प्रसिद्धी बरोबरच धनवृद्धी होते. अशी लांब रवी रेषा भाग्यवंतांच्याच हातावर पाहावयास मिळते. अश्या व्यक्तींना थोड्या श्रमात अमाप प्रसिद्धी मिळते.

नं. 5 बाण - मस्तक रेषा खाली चंद्र ग्रहावर उतरलेली नाही ती सरळ वरच्या मंगळ ग्रहाकडे गेल्या मुळे अश्या व्यक्ती साधक बाधक निर्णय घेतात, भूल थापांना बळी पडत नाहीत, आपले हित कशात आहे हे त्यांना चांगले कळते व त्याप्रमाणे विचारपूर्वक यांचे निर्णय असतात.

नं. 6 बाण - बुध रेषेचा उगम रवी रेषेतून होत असल्याने व्यवहारी, चतुर, चाणाक्ष, संधी साधणारी व्यक्ती असते. अशी बुध रेषा क्वचितच पाहावयास मिळते या रेषेला रवीबरोबर बुध ग्रहाची साथ मिळाली आहे त्यामुळे यांचे व्यावसायिक निर्णय सहसा चुकत नाहीत.

नं. 8 बाण - हृदय रेषा पहिल्या व दुसर्‍या बोटाच्या पेर्‍यात म्हणजेच गुरु व शनीच्या बोटांच्या मध्ये गेली आहे त्यामुळे अश्या व्यक्ती अत्यंत व्यवहारी, दुसर्‍याचा उपयोग पायरी प्रमाणे करणार्‍या व चाणाक्ष असतात. यांचे काम असेल तर हे लोक अत्यंत गोड व लघवी बोलतात, काम झाले कि त्यांच्याशी परत काम पडले तरच संबंध ठेवतात.

नं. 9 बाण - मस्तक रेषेतून पहिल्या बोटाच्या खाली म्हणजेच गुरु ग्रहावर एकाच रेषा गेलेली असेल तर अश्या व्यक्ती आपल्या बुद्धीच्या व मेहनतीच्या बळावर निश्चित यशस्वी होतात. जीवनाच्या ध्येयपूर्तीकडे यांची वाटचाल चालू असते व त्यात ते यश मिळवितात आपण कोण होतो व आता आपण काय आहोत या प्रवासात अंतिमतः निश्चित सौख्य व समाधान प्राप्त करतात.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com