हल्ली समोरच्या व्यक्तीच खरं रुप ओळखणे कठीण झाले आहे. परंतू सामुद्रिकशास्त्रानुसार कोणत्याही व्यक्तीचा कानाचा आकार व्यक्तिमत्त्व तसेच भविष्याबद्दल संकेत देतं.

अथार्त आपण किती गुणवान आणि किती धनवान आहात हे देखील कान बघून ओळखता येतं. तर जाणून घ्या या बद्दल माहिती: कान केवळ ऐकण्याचा कामाचे नाही तर भाग्य आणि व्यक्तिमत्तव देखील दर्शवतं. तर दुसर्याचे कान बघण्यापूर्वी स्वत:च्या कानाकडेही एकदा बघून अंदाज बांधून घ्या.

कानावर लांब केस आवडत नसले तरी सामुद्रिक शास्त्रानुसार कानावरील केस व्यक्तीच्या भाग्यशाली असल्याची ओळख आहे. असे लोकं दिघार्युसह धन-संपत्ती अर्जित करुन शान-शौकतने आयुष्य घालवतात.

ज्या पुरुषांचे कान गजकर्ण अर्थात हत्तीच्या कानासारखे मोठे असतात ते लोकं संपन्न, प्रतिष्ठित आणि दीर्घायु असतात. असे लोकांना समाजात खूप मान-सन्मान प्राप्त होतो.

लहान कान असलेले लोकं बुद्धिमान असतात.

जन्मजात लांब कान असणारा व्यक्ती नेहमी सुखी जीवन जगणार असतो. त्याला सामान्य लोकांच्या तुलनेत जीवनात कमी संघर्षांना सामोरं जावं लागतं.

सामुद्रिक शास्त्रानुसार ज्या पुरुषांचे कान खूप लहान असतात ती व्यक्ती मितव्ययी किंवा धन संचय करणारी असते. कमी खर्च करणार्या अश्या लोकांना कंजूस देखील म्हटलं जातं.

ज्या पुरुषांचे कान जाड असतात त्यांच्यात नेतृत्व क्षमता असते. असे लोकं नेता किंवा आपल्या कार्यक्षेत्रात टीम लीडरच्या भूमिकेत असतात. असे लोकं प्रत्येक कामात पुढे वाढून भाग घेतात.

व्यक्तीचे कान सपाट असल्यास ती भोग-विलासात रुची ठेवणारी असते. असे लोकं खूप प्रकाराचे शौक पाळतात. मौज-मस्तीसाठी खूप पैसा आणि वेळ खर्च करणारे असतात.

ज्यांचे कान काळे आणि कोरडे दिसतात त्यांना आयुष्यभर संघर्ष झेलावा लागतो त्याच्या जीवनात आर्थिक समस्या आढळत असतात