किरोच्या नजरेतून – Future By Date Of Birth

jalgaon-digital
4 Min Read

सौ. वंदना अनिल दिवाणे

24 सप्टेंबर –

वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर शुक्र ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास तुला आहे. जीवनावर शुक्राचा प्रभाव जास्त राहील. विवाहानंतर जीवन सुरळीत होईल. वैवाहिक सुख चांगले मिळेल. एकतर तुम्ही पारंपारिक धंदा स्वीकाराल. किंवा धाडस आणि स्वतंत्र जीवनाच्या प्रबळ इच्छेमुळे घर सोडून स्वतंत्र करिअर उभे कराल. भाग्याची चांगली साथ मिळेल. सहकार्‍यांच्या भरघोस आर्थिक मदतीमुळे आर्थिक सुस्थिती प्राप्त होईल.

25 सप्टेंबर –

वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर नेपच्यून, चंद्र, शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास तुला आहे. आदर्शवादाकडे ओढा राहील. विचार उच्च असून कल्पनाशक्तीही प्रबळ आहे. महत्त्वाकांक्षा मात्र भौतिक प्रगतीशी संबंधित राहील. गूढशास्त्रांबद्दल आकर्षण राहील. पण ते असेल त्यातील अंधश्रद्धा शोधण्यासाठी. दुसर्‍याला एखादी गोष्ट पटवून सांगतांना तिची कारणे सविस्तर समजावून सांगाल परंतू आपली मते दुसर्‍यांवर लादणे आवडणार नाही. आर्थिक बाबतीत काळजी करणे हा तुमचा स्वभाव धर्म आहे. संधी चुकवू नका. धनी व्हाल.

26 सप्टेंबर –

वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर शुक्र, शनी या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास तुला आहे. सुरूवातीच्या आयुष्यात तुमच्या प्रगतीत बरेच अडथळे येतील. वयाच्या पस्तीसाव्या वर्षानंतर अशा सर्व अडथळ्यांना पार करून प्रगतीकडे तुमची वाटचाल बिनधास्तपणे चालू राहील. इतरांशी जास्त मिळून मिसळून रहाणे जमणार नाही. तुमच्या कष्टाचे फळ लुबाडण्याचा इतर लोक प्रयत्न करतील. सावध रहा. अति सावधानतेमुळे आलेल्या आर्थिक संधी वाया जाऊ न दिल्यास आर्थिक सुस्थिती प्राप्त होई.

27 सप्टेंबर –

वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर मंगळ व शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास तुला आहे. स्पष्टवक्तेपणा हा तुमचा विशेष गुण आहे. दुसर्‍याचे दोष त्यांच्या तोंडावर सांगणे कधी कधी फार महागात पडेल. शत्रुंची संख्या सतत वाढत रहाणार आहे. यांत्रिक कामापासून तुम्हाला फार फायदा होईल.तुम्ही मेकॅनिकल इंजिनिअर होऊन यंत्राद्वारे फायदा मिळवू शकाल. किंवा शस्त्रक्रिया तज्ञ डॉक्टर होऊन नावलौकीक व पैसा मिळवू शकाल. पैसा मिळवणे तुमच्यासाठी अवघड काम नाही. कामाच्या झपाट्यामुळे भरपूर पैसा मिळेल.

28 सप्टेंबर –

वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर सूर्य, हर्शल, शुक्र्र या ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास तुला आहे. तुम्ही फार विचारशील आहात. निसर्गाचा अभ्यास करण्याची आवड आहे. तुम्ही फार उदयोगशील आहात. कोणते काम अंगावर घेतले की ते मनापासून व जलद गतीने करणे आवडते. भाषा विषयावर तुमचे चांगले प्रभुत्व राहील. पैसा मिळवण्यासाठी जीवनात तुम्हाला अनेक संधी प्राप्त होतील. इतरांचा विश्वास संपादन केल्यामुळे सतत पदोन्नती होत राहील.

29 सप्टेंबर –

वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर चंद्र, शुक्र, नेपच्यून या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास तुला आहे. कल्पनाशक्ती चांगली असून बौद्धिकक्षमता अतिशय उत्तम आहे. नाविन्याची आणि बदलाची आवड आहे. बौद्धिक कसरतीची आवश्यकता असलेल्या विषयात जास्त रस वाटेल. त्यामुळे व्यापार उद्योगापेक्षा बौद्धिक कामाशी संलग्न करिअरमध्ये अधिक यशस्वी व्हाल. बौद्धिक कामाद्वारे विपुल प्रमाणात धनप्राप्ती होईल. पैसा मिळवण्याची महत्त्वाकांक्षा निर्माण झाल्यास उद्योगाचे प्रमुख होऊ शकाल.

30 सप्टेंबर

वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर शुक्र, गुरू या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास तुला आहे. आहे त्या परिस्थितीमधून वर येण्याची सतत महत्त्वाकांक्षा राहील. त्यासाठी जीव तोडून मेहनत कराल. एक टप्पा गाठला की लगेच पुढच्या टप्प्यासाठी घोडदौड चालू होईल. वास्तविक पाहता धनप्राप्तीच्या बाबतीत काळजी करावी असे नाही. परंतू चिंता करण्याच्या सवयीमुळे एकाच वेळी अनेक उद्योग करून समाधान वाटते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *