Friday, April 26, 2024
Homeभविष्यवेधकिरोच्या नजरेतून - Future By Date Of Birth

किरोच्या नजरेतून – Future By Date Of Birth

सौ. वंदना अनिल दिवाणे

17 सप्टेंबर – वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर शनी या ग्रहांचा प्रभाव राहील. तुमची सूर्य रास कन्या आहे. आयुष्याच्या पूर्वार्धात प्रगतीमध्ये अनेक प्रकारच्या अडचणी येतील. तुम्ही केलेल्या कामाचे श्रेय व फायदा इतर लोक घेण्याचा प्रयत्न करतील. कोणत्याही विषयाचा सखोल अभ्यास करण्यासाठी मोठ मोठ्या ग्रंथाचे परिशीलन कराल. उत्तरार्धात तुमचे जीवन तौलनिकदृष्ट्या बरेच सुखकारक होईल. मात्र तुम्ही दुसर्‍यांवर टीका करण्याची नकारात्मक प्रवृत्ती कमी करायला हवी. अतिशय संशयी व सावध राहण्याच्या सवयीमुळे आर्थिक बाबतीत मिळालेल्या संधीची बस तुमच्या आयुष्यात अनेक वेळा चुकेल नंतर पश्चाताप होईल.

- Advertisement -

18 सप्टेंबर – वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर बुध, मंगल या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास कन्या आहे. मंगळ आणि बुधाचे एकमेकांशी बर्‍याच अंशी चांगले जमत असल्यामुळे तुमचा उत्साह व निश्चयात्मक शक्तीमुळे जीवनात उत्तम यश मिळेल. परीक्षक किंवा समीक्षक म्हणून तुम्ही उत्तमप्रकारे काम करू शकाल. स्वतःच्या किंवा एखाद्या मोठ्या उद्योगाच्या कंपनीत पदाधिकारी म्हणून तुम्ही उत्तमप्रकारे काम करू शकाल. आर्थिक बाबतीत जीवनात उत्तम यश मिळेल. त्यासाठी तुमची कल्पनाशक्ती व योजकता चांगली कामाला येई.

19 सप्टेंबर – वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर बुध, सूर्य, हर्षल या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास कन्या आहे. हर्शल आणि बुध यांच्या प्रभावामुळे विचारांची गती व ज्ञानग्रहणशक्ती चांगली राहील. निसर्गाच्या चिंतनाची फार आवड आहे. भाषा विषयात विशेष प्राविण्य संपादन कराल. सौंदर्याचे आकर्षण राहील. पैसे मिळवण्याचीही महत्त्वाकांक्षा असेल. पण आयुष्याच्या सुरूवातीला मोठ्या प्रमाणात अडथळे येतील. त्याचे कारण म्हणजे तुमचे अस्थिर मन व असमाधानी स्वभाव यातून निर्माण होणार्‍या चिंता हे असेल. मनाची एकाग्रता वाढविल्यास आर्थिक बाबतीत चांगले यश मिळेल.

20 सप्टेंबर – वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर बुध, नेपच्यून, चंद्र या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास कन्या आहे. तीक्ष्ण आणि सुपीक बुद्धीमत्तेतून अनेक प्रकारच्या योजना आकार घेतील. त्यासाठी वेळ पडली तर प्रवास करून त्या यशस्वी करून दाखवाल. साधी रहाणी व उच्च विचारसरणी यामुळे आर्थिक बाबतीत तुमची महत्त्वाकांक्षा जेमतेम राहील. हवे ते आणि जीवनाला आवश्यक तेवढेच उपलब्ध असावे. अशा विचारामुळे पैशाच्या पाठीमागे न धावता बौद्धिक कार्यात मग्न रहाल.

21 सप्टेंबर – वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर बुध,गुरू ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास कन्या आहे. महत्त्वाकांक्षा फार दांडगी आहे. आहे त्या परिस्थितीपासून वरचा दर्जा प्राप्त करण्यासाठी तुम्ही सतत आटोकाट प्रयत्न करत राहणार आणि तशी उन्नती जरी झाली तरी तुमच्या मनाचे समाधान काही होणार नाही. त्याहीपेक्षा वरचा दर्जा प्राप्त करण्यासाठी अविरत परिश्रम कराल. आर्थिक परिस्थितीच्या बाबतीत काहीच भिण्याचे कारण नाही तरीही नसती चिंता करण्याची सवय काही जाणार नाही.

22 सप्टेंबर – वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर बुध, शुक्र, सूर्य या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास तुला आहे. हर्शलच्या प्रभावामुळे भौतिक आणि स्वतंत्र अशा कल्पना सुचतील. त्यामुळे तुमचा स्वभाव विचीत्र आहे असे प्रतिस्पर्ध्यांना वाटेल. कोणाशी लवकर मैत्री करणे तुम्हाला जमणार नाही. त्यामुळे तुमच्या मित्रांची संख्या व पाठिंबा कमी राहील. शत्रुसंख्या मात्र वाढेल. आर्थिक बाबतीत अनेक जणांकडून फसवणूक होण्याची शक्यता आहे. स्वतंत्रपणे चांगला पैसा मिळेल.

23 सप्टेंबर – वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर शुक्र, बुध या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास तुला आहे. निरनिराळ्या व्यक्ती आणि वेगवेगळ्या परिस्थितीशी सहज जमवून घ्याल. हा तुमचा प्लस प्वॉईंट आहे. कोणत्याही प्रकारचे करिअर अथवा धंदा असला तरी आपल्या तीक्ष्ण बुद्धीच्या जोरावर त्यात सहज यशस्वी व्हाल. एकाच वेळी अनेक प्रकारच्या उलाढालीत आणि उदयोगात भाग घेतल्याने आर्थिक स्थिती चांगली होणार यात शंका नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या