जन्मतारखेनुसार भविष्य..Future By Date Of Birth

13 ते 19 मे या आठवड्यात जन्मलेल्या व्यक्तींचे भविष्य
जन्मतारखेनुसार भविष्य..Future By Date Of Birth
जन्मतारखेनुसार भविष्य..Future By Date Of Birth

किरोच्या नजरेतून - सौ. वंदना अनिल दिवाणे

13 मे -

वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर शुक्र,रवि, या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास वृषभ आहे. ग्रहांची चौकट फारच वेगळी आणि काहीशी विचीत्र राहील. जीवनात इतरांपेक्षा वेगळ्या घटना घडतील. भौतिक दृष्टीने भाग्यवान आहात. जीवनात सतत काही ना काही बदल होत राहतील. इतरांशी जमवून घेणे जड जाईल. त्यामुळे शत्रुंची संख्या वाढेल. पण तरीही अडथळ्यांना पार करत पाऊल पुढेच राहील. विवाहाच्या बाबतीत जगावेगळा अनुभव येईल. बारीक सारीक गोष्टीची टीका करण्यावर अंकुश ठेवणे चांगले. अपेक्षित घटनांपेक्षा अनपेक्षित घटना जास्त घडतील. इतरांपेक्षा वेगळ्या मार्गाने धनी व्हाल.

14 मे -

वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर बुध, शुक्र या ग्रहाचा प्रभाव राहील. सूर्य रास वृषभ आहे. बुद्धीमत्तेच्या द़ृष्टीने ग्रहांची चौकट चांगली आहे. त्यामुळे बुद्धी सुक्ष्म तर मौलिक आणि जागृत असेल. तर्कशक्ती बलवान असल्याने कोणत्याही मुद्याचा किस पाडण्यात आनंद वाटेल. कोणाच्याही प्रभावाखाली न येता सर्वांशी जमवून घेण्याची अद्भूत किमया तुम्हाला प्राप्त आहे. कोणत्याही कामात रस घेतल्यात त्यास सरस कामगिरी कराल. एकाच विषयाला चिकटून रहाणे जमणार नाही. आर्थिक बाबतीत उलाढालीबद्दल मनात काय विचार चालले आहेत याविषयी इतरांना कोडे वाटेल. पैशाने पैसा मिळवणे याबाबत पटाईत असाल.

15 मे -

वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर चंद्र, शुक्र या ग्रहाचा प्रभाव आहे. सूर्य रास वृषभ आहे. ग्रह चौकट अशी आहे की, तुमची धारणा प्रेम हेच जीवन अशी असेल आणि सगळ्या मानवावर प्रेम करणे हेच तुमच्या जीवनाचे ध्येय राहील. त्यासाठी कोणतेही काम करण्यास तयार असाल. कोणत्याही कष्ट आणि त्याग करण्यास तयार असाल. भावना तीव्र असाल. आणि भक्ती योगामुळे तुमचा उत्साह दांडगा राहील. धर्मगुरू, कलावंत लेखक इ.मध्ये चांगले यश मिळेल. आर्थिक बाबतीत भाग्याची चांगली साथ राहील. चांगल्या संधी प्राप्त होतील. ऐश्वर्ययुक्त वस्तूंच्या उलाढालीच्या मोठ्या कंपनीत प्रचंड यश मिळेल.

16 मे -

वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर चंद्र, नेपच्यून, शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास वृषभ आहे. स्वभाव सौम्य असून लक्ष्य वर्तमानापेक्षा भविष्याकडेच जास्त आहे. तुमची व्हिजन अद्भूत आहे. अध्ययन, गूढशास्त्रे याविषयी आकर्षण राहील. नाविन्यपूर्ण कल्पनांमुळे मग ते त्या कलेविषयी असोत अथवा विज्ञानाशी संबंधित असो जीवनात तुम्हाला उत्तम यश मिळेल. एकाच प्रकारचे जीवनाचा लवकर कंटाळा येईल. आर्थिक बाबतीत सुरूवातीला काही अडचणी येण्याची शक्यता आहे. मात्र सर्व सुरळीत होऊन गाडी रूळावर आली की, आर्थिक प्रगतीचा आलेख चांगला वाढेल.

17 मे -

वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर चंद्र, शुक्र , शनि या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास वृषभ आहे. ग्रहांची चौकट अशी आहे की, जीवन आणि करिअर एकदम चांगले असेल किंवा त्या उलटही असू शकेल कारण तुमच्या प्रगतीची दोरी भाग्याच्या हातात राहील. ती जिकडे घेऊन जाईल तिकडे जावे लागेल. प्रेमाची व आपुलकीची भावना पुर्ण झाली असे तुम्हाला कधीच वाटणार नाही. अनेक लोकांच्या संपर्कात असूनही आपण एकाकी आहोत अशी टोचणी मनाला सारखी राहील. आर्थिक परिस्थिती चांगली राहील. कारण खर्चावरील नियंत्रण, काळजीपूर्वक केलेली गुंतवणूक हे असेल. मात्र सट्ट्यासारख्या व्यवहारात यश येणार नाही.

18 मे -

वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर चंद्र, मंगळ, शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास वृषभ आहे. ग्रहांची चौकट अतिशय सामर्थ्यवान आहे. त्यामुळे अ‍ॅडव्हेंचर, धोका पत्करणे, रोमान्स या गोष्टी आवडतील. तुमची इच्छाशक्ती प्रबळ आहे. ती चांगल्यासाठी वापरायची की वाईटासाठी हे तुमच्याच हातात आहे. संपत्ती व सत्ता आवडत असले तरी त्यासाठी आवश्यक असणार्‍या मोठ्या खर्चाची तरतूद करणे अवघड वाटेल. व्यापार उद्योगात विपुल प्रमाणात पैसा मिळेल. प्रबळ शत्रुमुळे कोर्टाच्या पायर्‍या चढाव्या लागण्याची शक्यता आहे. व्यापार, उद्योगात विपुल प्रमाणात पैसा मिळेल.

19 मे -

वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर शुक्र, रवि या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास वृषभ आहे. आपला जीवनपट स्वकष्टाने उभा कराल. तुमची सृजनशीलता आणि मौलिकता यांचा तुमच्या योजनात महत्वाचा वाटा असेल. स्वभाव शांत व सहनशील आहे पण कुणी मार्गात आडवे आले तर क्रोधाचा स्फोट होतो. दूरदृष्टी चांगली आहे. उच्च पदावर किंवा जनसमूहावर नेतृत्व करण्याच्या कार्यात चांगले यश मिळेल. आर्थिक बाबतीत भाग्यवान आहात.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com