जन्मतारखेनुसार भविष्य..Future By Date Of Birth

6 ते 12 मे या आठवड्यात जन्मलेल्या व्यक्तींचे भविष्य
जन्मतारखेनुसार भविष्य..Future By Date Of Birth
जन्मतारखेनुसार भविष्य..Future By Date Of Birth

किरोच्या नजरेतून - सौ. वंदना अनिल दिवाणे

6 मे -

वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर शुक्र,चंद्र, या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास वृषभ आहे. आयुष्यात प्रेमाला महत्व राहील. वेळ आल्यावर वाटेल तो त्याग कराल. आपले लक्ष्य पुर्ण करण्यासाठी वाटेल ती किंमत द्याल. ईश्वरावर श्रद्धा राहील. एखादे काम पत्करले की, त्यात स्वतःला पूर्णपणे झोकून द्याल. कला क्षेत्रामध्ये विशेष चमक दाखवू शकाल. आर्थिक बाबतीत आयुष्यात बर्‍याच संधी उपलब्ध होतील. भाग्यवान असल्याने पैशासाठी धावावे लागणार नाही. पैसाच तुम्हाला शोधत येईल.

7 मे -

वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर चंद्र, नेपच्यून, शुक्र या ग्रहाचा प्रभाव राहील. सूर्य रास वृषभ आहे. ग्रहांची चौकट अशी आहे की, तुम्हाला गूढशास्त्र, अध्यात्त्म, रहस्यमय, गोष्टीचे जास्त आकर्षण वाटेल. थोड्याश्या साधनेनही या विषयात प्रगती होऊ शकेल. विज्ञानात गोडी असल्यास संशोधन करण्यात यश मिळेल. एकाच प्रकारचे काम करण्याचा कंटाळा येईल. मात्र समाजकारण व मानवी दुःखहरण करण्याचे काम चांगले जमेल. आर्थिक बाबतीत आयुष्याच्या पूर्वार्धात बरेच कष्ट सहन करावे लागतील. उत्तरार्धात चांगले यश मिळेल.

8 मे -

वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर शनि, चंद्र, शुक्र या ग्रहाचा प्रभाव आहे. सूर्य रास वृषभ आहे. ग्रह चौकट पहाता तुमचे जीवन इतरांसारखे रूळलेल्या मार्गाने जाणार नाही. एकतर सत्ता, संपत्तीकडे जाणारा मार्ग मिळेल किंवा त्याच्या अगदी उलट असलेली परिस्थिती निर्माण होऊ शकेल. तुमचे जीवन भाग्याच्या हातातील बाहुले राहील. आसपास असलेल्या परिस्थितीप्रमाणे कधी उन्नती होईल ती कधी मार्गात अनेक अडथळे येऊन प्रगतीस अवरोध निर्माण होईल. आर्थिक बाबतीत चांगलेच यश मिळेल. त्यासाठी बरेच कष्ट घ्यावे लागतील.

9 मे -

वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर चंद्र, मंगळ, शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास वृषभ आहे. आयुष्य अनेक महनीय घटनांनी भरलेले आहे. अनेक धाडसी प्रसंग, लव्ह, रोमान्सचे अनुभव असतील. धैर्य दांडगे असून इच्छाशक्ती प्रबळ राहील. त्याचा उपयोग चांगल्या वाईट कामांसाठी कराल. ते सुसंगती वा कुसंगतीवर अवलंबून राहील. व्यवस्थापनात विशेष रस असेल. व्यापार, उदयोग, यातून भरपूर पैसा मिळेल मात्र धाडसी व हट्टी स्वभावावर अंकुश ठेवा.

10 मे -

वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर गुरू, शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास वृषभ आहे. आत्मविश्वास दांडगा राहील. सृजनशीलता आणि मौलिकता वाखाणण्याजोगी आहे. स्वभाव शांत व सोज्वळ राहील. मात्र असुया व धोकेबाजीमुळे मनाचा तोल जाऊन रागाचा पारा चढल्यास तो लवकर खाली येणे शक्य नाही. शिवाय नुकसानही होण्याची शक्यता आहे. दूरदृष्टीमुळे योजना भव्य दिव्य असतील. त्यात इतरांना दखल दिलेली मुळीच चालणार नाही. यश एवढे प्रभावी असेल की, जनसामान्यात लोकप्रियता मिळवाल. आर्थिक बाबतीत भाग्यवान असाल. राहणामुक्त अतिखर्चाचे व ऐश्वर्यसंपन्न असेल.

11 मे -

वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर चंद्र, नेपच्यून, शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास वृषभ आहे. जीवनावर चंद्राचा प्रभाव जास्त आहे. त्यामुळे कल्पनाशक्ती, भावनाप्रधानता, कलेकडील कल, आदर्शवाद, गूढशास्त्राची आवड, व अध्यात्मात रूची राहील. आणि त्या गोष्टींचा परिणाम होईल. त्यामुळे साहजिकच कला, साहित्य, संगीत नाट्यशास्त्रात यश मिळू शकेल. घरात सजावटींसाठी सुंदर वस्तूंचा संग्रह राहील तर घराबाहेरील वातावरणही शांत व सौंदर्यृपूर्ण असेल. आर्थिक बाबतीत सारखा चढ उतार राहील. कधी कधी भाग्याची चांगली साथ मिळेल. कधी कधी त्याउलट अनुभव येईल.

12 मे -

वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर शुक्र, गुरू या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास वृषभ आहे. ग्रहांची चौकट चांगली आहे. मात्र शुक्राने गुरूवर कुरघोडी करू नये याची काळजी घ्यावी. नाही तर स्त्री वर्गाच्या संमोहनात वाहावत जाल. लक्ष्य पूर्णपणे महत्त्वाकांक्षेवर केंद्रीत करायला हवे. सामाजिक दर्जावर असलेल्या आणि आर्थिक बाबतीत सबळ असलेल्या लोकांशी संबंध ठेवणे फायद्याचे राहील. अन्यायाविरुद्ध लढण्याचे फार आकर्षण वाटेल. अध्यात्म आणि धर्माविषयी स्वतंत्र विचार असतील. आर्थिक बाबतीत भिण्याचे मुळीच कारण नाही. यश स्वतःहून शोधीत तुमच्याकडे येईल. शुन्यातून विश्व निर्माण करण्याची कला तुमच्याकडे आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com