जन्मतारखेनुसार भविष्य..Future By Date Of Birth

28 एप्रिल ते 5 मे या आठवड्यात जन्मलेल्या व्यक्तींचे भविष्य
जन्मतारखेनुसार भविष्य..Future By Date Of Birth
जन्मतारखेनुसार भविष्य..Future By Date Of Birth

किरोच्या नजरेतून - सौ. वंदना अनिल दिवाणे

29 एप्रिल -

वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर शुक्र,चंद्र, नेपच्यून या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास वृषभ आहे. जीवनात चंद्र आणि नेपच्यूनचा प्रभाव अधिक असल्याने कल्पनाशक्ती प्रगल्भ राहील. कलाक्षेत्रात पुढे जाऊ शकाल. संवेदनशील स्वभावामुळे दुसर्‍याच्या घरात राहण्यापेक्षा स्वतःच्या मालकीच्या घरात राहणे जास्त आवडेल. नैसर्गिक सौंदर्य, रंग संगती, स्वर माधुर्य यांची आवड राहील. आर्थिक स्थिती वरखाली होत राहील. मोठ्या प्रमाणात पैसा मिळाला तरी तो टिकवून धरणे जड जाईल.

30 एप्रिल -

वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर गुरू, शुक्र या ग्रहाचा प्रभाव राहील. सूर्य रास वृषभ आहे. गुरूच्या प्रभावामुळे तुमची महत्त्वाकांक्षा दांडगी राहील. ती प्राप्त करण्यासाठी वैचारिक आणि शारीरिक सामर्थ्य असल्याने प्रचंड उत्साहाने लक्ष्य प्राप्तीचा प्रयत्न कराल. अमुक एक क्षेत्र हवे अशी अट नाही. ज्या क्षेत्रात प्रवेश कराल त्यात यशस्वी व्हाल. अनेक लोकांना रोजगार देण्याची तुम्ही क्षमता ठेवाल. आपले आदर्शवाद कृतीत आणण्याचे कार्य यशस्वी करून मोठ मोठ्या संस्थानांशी संबंध असल्याने जीवनात उत्तम यश मिळू शकेल. धनप्राप्तीच्या बाबतीत आदर्शवाद कार्यान्वित करण्यात यश मिळेल. यातून प्रचंड पैसा प्राप्त करून श्रीमंत व्हाल यात शंका नाही.

1 मे -

वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर रवि, बुध ग्रहाचा प्रभाव आहे. सूर्य रास वृषभ आहे. इतरांवर हुकूमत गाजवण्याची हौस वाटेल. योजना व कल्पना मौलिक असतील. सर्व कामे स्वतः करण्याची वृत्ती राहील. वागणुकीत सौम्यपणा व सभ्यता राहील. सहनशक्ती चांगली राहील. त्यामुळे गोड बोलून काम करून घेण्यात चांगले यश मिळेल. दूरदृष्टी चांगली असल्यामुळे योजना कार्यान्वित करतांना त्याचे चित्र अंतचक्षुला स्पष्टपणे दिसत राहील. त्यामुळे सहज यश मिळेल.धनप्राप्तीच्या दृष्टीने भाग्यवान आहात. पण उधळेपणामुळे पैसा पाण्यासारखा खर्च कराल.

2 मे -

वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर चंद्र, नेपच्यून, शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास वृषभ आहे. ग्रहांची चौकट अशी आहे की, कल्पनाशक्ती, रोमान्स, कलादृष्टी याचा जास्त प्रभाव राहील. गूढशास्त्रे सहस्य उकलण्यासंबंधी शास्त्रे अध्यात्म आणि धार्मिकता या गोष्टींचे आकर्षण वाटेल. साहित्य कलाक्षेत्र, संगीत यासंबंधित कार्यात तुम्हाला चांगले यश मिळेल. घरात अनेक सुंदर वस्तुंचा संग्रह करणे, बागबगीचा बसे सौंदर्ययुक्त वातावरण तयार कराल. आर्थिक बाबतीत भाग्याची साथ मिळेल.

3 मे -

वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर गुरू, शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास वृषभ आहे. ग्रहांची सुंदर आहे. त्यामुळे यशासाठी प्रयत्न सुरू करण्याच्या आतच यश तुम्हाला शोधित येईल. मात्र शुक्राच्या छंदीपणाच्या आहारी न जाण्याचे पथ्य पाळले पाहिजे. सामाजिक व व्यापारी क्षेत्रातील प्रसिद् व्यक्तीशी जवळीक साधून त्या क्षेत्रात सहजपणे पुढे जाल. समाजात कुणावरही अन्याय झाला तरी तुम्ही सहन करू शकत नाही. धार्मिक बाबतीत स्वतंत्र मते असतील. लवकर विवाह केल्यास अनेक अडचणींची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत भाग्यवान आहात. शून्यातून विश्व निर्माण करण्याची प्रचंड क्षमता तुमच्याजवळ आहे. मोठ्या प्रमाणात आखलेल्या योजनात प्रचंड यश मिळेल.

4 मे -

वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर हर्षल, रवि, शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास वृषभ आहे. वरील ग्रहांची चौकट तुमचे आयुष्य इतरांपेक्षा वेगळे असणार असे सांगते आहे. तुम्ही निवडलेला मार्ग इतरांपेक्षा वेगळा असेल. तत्वज्ञानी, संगीतकार, लेखक यांच्यासाठी ही चौकट चांगली राहिल. तुमची कल्पना मौलिक असल्यामुळे इतरांची त्यासाठी संमती मिळणे अवघड आहे. अनेक शत्रू निर्माण होण्याची शक्यता आहे. परिस्थिती जेवढी कठीण तेवढा तुमचा उत्साह अधिक राहील. त्यामुळे अडथळे पार करून आपले लक्ष्य प्राप्त कराल यात शंका नाही. आर्थिक स्थितीत बराच चढ उतार होईल.

5 मे -

वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर शुक्र, बुध या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास वृषभ आहे. बुद्धीमत्ता अतिशय तीक्ष्ण आहे. तर्कशक्ती उत्तम असून निरीक्षण शक्ती खुपच चांगली आहे. वागण्याची तर्‍हा स्वतंत्र बाण्याची राहील. वरवर इतरांशी जमवून घेऊ शकाल. पण प्रत्यक्षातत त्यांना तुमच्या कामात ढवळाढवळ करू देणार नाही. कोणत्याही क्षेत्रात उत्तम यश मिळू शकेल. एकाच कामाशी निगडीत रहाणे जमणार नाही. जीवनात अनेक बदल संभवतात. विवाह लवकर होईल.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com