जन्मतारखेनुसार भविष्य..Future By Date Of Birth

22 ते 28 एप्रिल या आठवड्यात जन्मलेल्या व्यक्तींचे भविष्य
जन्मतारखेनुसार भविष्य..Future By Date Of Birth
जन्मतारखेनुसार भविष्य..Future By Date Of Birth

किरोच्या नजरेतून - सौ. वंदना अनिल दिवाणे

22 एप्रिल -

वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर शुक्र,मंगळ या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास वृषभ आहे. ग्रहांची चौकट सामर्थ्यवान परंतू विचीत्र आहे. त्यामुळे जीवनात अनेक विचीत्र घटनांना सामोरे जावे लागेल. जीवनात यशाचे पारडे कधी जाईल. कधी जीवन आंबट गोड अनुभवांनी भरलेले असेल. आवडलेर्ल्या कामात मानसिक अस्थिरतेमुळे सतत बदल करावासा वाटेल. तसे न केल्यास उत्तम यश मिळणे अवघड. आर्थिग बाबतीत इतरांबरोबर काम करणे तुम्हाला जड जाईल. स्वतःच्या योजना कार्यान्वित केल्यास विपुल प्रमाणात धनप्राप्ती होईल.

23 एप्रिल -

वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर बुध, शुक्र या ग्रहाचा प्रभाव राहील. सूर्य रास वृषभ आहे. ग्रहांची चौकट अशी आहे की, आपल्याला यशाच्या अत्त्युच्च शिखरावर पोहोचवेल. किंवा अपयशमुळे खोल खाईत ढकलून देतील. भाग्याची बाबतीत ही स्थिती तशीच राहील. तुमचे विचार, बोलणे व कृतीची गती जलद राहील. तर्कशक्ती उत्तम असल्याने कोणत्याही विषयाम प्राविण्य संपादन कराल. परंपरेच्या विरूद्ध असल्याने नवनवीन कल्पना शोधून त्या कार्यान्वित करण्याकडे जास्त लक्ष राहील. कल्पनेची कामधेनू प्रसन्न असल्याने हवा तितका पैसा व हवा तेव्हा पैसा मिळेल.

24 एप्रिल -

वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर शुक्राचा ग्रहाचा प्रभाव आहे. सूर्य रास वृषभ आहे. ग्रहांची चौकट अशी आहे की, स्वभाव अतिशय उदार राहील. त्याला जोड म्हणून शारिरीक शक्ती व वैचारिक उंचीदेखील चांगली राहील. स्वभाव प्रेमळ, सहीष्णु, भावनाप्रधान व विकारवशता आहे. लोकप्रियता जाती, धर्म, देश या सीमा ओलांडून सर्वत्र पसरेल. उधळे जसे खर्च करतात त्याच प्रमाणात पण त्याच्या उलट अर्थाचे स्त्रोत तुमच्याकडे धावून येईल. सढळ हाताने दान करूनही तुमचा धनसंग्रह प्रचंड राहील.

25 एप्रिल -

वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर चंद्र, नेपच्यून, शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास वृषभ आहे. ग्रहांची चौकट विचीत्र असल्याने जीवनातही तसेच अनुभव घ्यावे लागतील. गूढशास्त्र, बांधकाम, गुप्तसंस्था, मानसशास्त्र, यांचे आकर्षण असून अभ्यास केल्यास त्यात उत्तम प्रगती कराल. संगीताचे वेड आहे. प्रयत्न केल्यास एखाद्या संगीत उपकरणात प्राविण्य मिळवू शकाल. भावनेच्या अतिरेकामुळे मौलिक कल्पना विशेषतः धार्मिक व सामाजिक क्षेत्रात कार्यान्वित होतांना तुमच्यावर टिका होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती खूप खाली राहील. मात्र अधून मधून आपल्या मौलिक योजनाद्वारा मोठ मोठ्या रकमा मिळतील.

26 एप्रिल -

वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर शनि, शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास वृषभ आहे. ग्रहांची सुंदर आहे. मात्र जीवनात सावधानता आणि चातुर्याचा उपयोग करणे आवश्यक आहे. आयुष्याच्या पूर्वार्धात आपले लक्ष्य पुरे करतांना अनेक अडचणींना व संकटाला तोंड द्यावे लागण्याची शक्यता आहे. त्याला कारण कुटूंबातील सदस्य आणि नातेवाईक असतील. अनेक लोकांचे पोषण करण्याची जबाबदारी पडेल आणि असे असूनही महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी धडपड कराल. कारण उत्तम चिकाटी हट्टी स्वभाव, व चिकाटीमुळे मोठ्या प्रमाणावर पैसा मिळवण्यास चांगले यश येईल.

27 एप्रिल -

वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर मंगळ, शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास वृषभ आहे. केवळ विचारात नव्हे तर कृती करण्यात ही स्वतंत्र बाणा असल्यामुळे इतरांनी टाकलेले बंधन झुगारून द्याल. एखाद्याचा दोष त्याला तोंडावर सांगण्याचा स्पष्टवक्तेपणा तुम्हाला नडू शकतो. विरोध करणारावर रागावण्याची धावून जाण्याची वृत्ती संयमाने कमी करावी लागेल. कलहप्रियता सांसरिक दृष्टीने चांगली नाही. क्रिडा क्षेत्रात गेल्यास यश मिळू शकेल. चेहरा आणि कमरेच्या वरील भागास जपावे. विविध प्रकारच्या उद्योगातून भरपूर पैसा मिळेल.

28 एप्रिल -

वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर शुक्र,गुरू, मंगळ या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास वृषभ आहे. मुख्यतः रवि आणि शुक्र यांचा प्रभाव असल्यामुळे जीवनात अशा काही चांगल्या घटना घडतील की तुम्ही लवकर प्रसिद्धीच्या झोतात याल. अंतस्फूर्तीची देणगी जन्मजात प्राप्त असल्यामुळे भावी काळातील घटनांची स्वप्नांद्वारे अन्य मार्गाने अगोदर चाहूल लागेल. त्याचा उपयोग नोकरी, धंद्यात फायदा होण्याच्या दृष्टीने चांगला होऊ शकेंल. मात्र त्यावर बारीक लक्ष ठेवावे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com