Saturday, April 27, 2024
Homeभविष्यवेधजन्मतारखेनुसार भविष्य..Future By Date Of Birth

जन्मतारखेनुसार भविष्य..Future By Date Of Birth

किरोच्या नजरेतून – सौ. वंदना अनिल दिवाणे

15 एप्रिल –

- Advertisement -

वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर मंगळ, शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. सुर्य रास मेष आहे. शुक्राची आनंदी वृत्ती दांडगा उत्साह, मंगळाची शक्ती आणि उत्साह यांचे मिश्रण तुमच्या स्वभावात राहील. स्वभाव प्रेमळ, प्रसन्न, सहानुभूतीपूर्ण भावनाप्रधान आणि विकाराधिष्ठीत आहे. समाजात लोकप्रियता मिळेल. आर्थिक बाबतीत भाग्यवान आहात. खर्चावर नियंत्रण न ठेवल्यास आर्थिक चिंता निर्माण होतील.

16 एप्रिल –

वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर मंगळ नेपच्यून, चंद्र या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास मेष आहे. आयुष्य ग्रहांच्या या चौकटीमुळे बरेच वेगळे राहील. गूढशास्त्रे, गुप्तसंस्था याविषयी रस वाटेल. आर्थिकविचार व नितीनियम कडक असतील. प्रवासाची आवड असेल. आर्थिक स्थितीत चढउतार चालू राहील. आवश्यकता पडल्यावर मोठ्या प्रमाणावर पैसा मिळत राहील.

17 एप्रिल –

वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर मंगळ, शनि या ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास मेष आहे. जीवनाच्या पूर्वार्धात बर्‍याच अडचणी निर्माण होतील. अनेक लोकांच्या पालनपोषणाची जबाबदारी घ्यावी लागेल. निश्चयी स्वभाव व अचूक परिश्रमाच्या जोरावर महत्त्वाकांक्षा पूर्ण कराल. हट्टी स्वभावामुळे आर्थिक बाबतीत उत्तम यश मिळेल.

18 एप्रिल –

वाढदिवस असलेल्या मंगळ या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास मेष आहे.विचार व कृती स्वतंत्र राहील. दुसर्‍यांनी घातलेल्या बंधनांना झिडकारून द्याल. स्पष्टवक्तेपणामुळे शत्रुंची संख्या वाढत राहील. आर्थिकदृष्ट्याही नुकसान सोसावे लागेल. निडरवृत्तीमुळे संरक्षण दलातील नोकरी चांगली राहील. कॉर्पोरेट सेक्टर किंवा हाताखाली काम देऊन प्रचंड प्रमाणात आर्थिक यश मिळवू शकाल.

19 एप्रिल –

वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर रवि, मंगळ ग्रहांचा प्रभाव राहील. सूर्य रास मेष आहे. ग्रहांची चौकट अशी आहे की, हाती घेतलेल्या कुठल्याही कामात यश मिळेल. आर्थिक जीवन लवकर सुरू होऊन त्यातून मौलिक योजना असल्याने सृजनशीलतेद्वारे धाडसाने व निश्चयाने यश ओढवून आणाल. संमोहनशील व्यक्तीमत्वामुळे हाताखालच्या अनेक लोकांना घेऊन कॉर्पोरेट सेक्टरमध्ये उत्तम यश मिळवाल.

20 एप्रिल –

वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर मंगळ, चंद्र, नेपच्यून या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास मेष आहे. ग्रहांची चौकट अशी आहे की, तुमच्या स्वभावात अनेक विरोधाभास तयार होईल. तुम्ही सामर्थ्यवान व निश्चयी असल्याचे दाखवून द्याल. तर दुसर्‍या क्षणी कल्पनाशक्ती अधिक असल्याने भावनातिरेक होऊन कोणाच्याही आहारी जाऊ शकाल. रूढी पाळणे कठीण जाईल. बंधनात रहाणे आवडणार नाही. आर्थिक बाबतीत स्वतःच्या निर्णयाप्रमाणे गुंतवणूक केल्यास तुम्हाला चांगला फायदा होईल.

21 एप्रिल –

वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर शुक्र गुरू, मंगळ या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास मेष आहे. आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत असे वाटत रहाणार. त्यामुळे इच्छाशक्ती दांडगी राहील. इतरांवर हुकूमत चालवण्याची हौस वाटेल. व्यवस्थानात चांगले यश मिळेल. कामाच्या वेळी शिस्त कडक असेल. मित्र सामर्थ्यवान असतील. आर्थिक बाबतीत भाग्यवान आहात. धनसंग्रह करण्यात चांगले यश मिळेल. उद्योग व शेअर्ससारख्या व्यवहारात विपुल धनप्राप्ती होईल.

- Advertisment -

ताज्या बातम्या