Friday, April 26, 2024
Homeभविष्यवेधजन्मतारखेनुसार भविष्य..Future By Date Of Birth

जन्मतारखेनुसार भविष्य..Future By Date Of Birth

किरोच्या नजरेतून – सौ. वंदना अनिल दिवाणे

8 एप्रिल –

- Advertisement -

वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर मंगळ, शनि या ग्रहांचा प्रभाव आहे. सुर्य रास मेष आहे. दोन विरूद्ध गुणांच्या ग्रहांचा एकाच वेळी प्रभाव पडल्याने जीवन अस्थिर होऊ नये म्हणून सावधानता बाळगा. आयुष्याच्या पूर्वार्धात लक्ष गाठण्यासाठी बर्‍याच अडचणींना तोंड द्यावे लागेल. नातेवाईकांना मदत करणे भाग पडल्याने प्रगतीच्या वेगात खंड पडत राहील.

9 एप्रिल –

वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर मंगळ ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास मेष आहे. विचार आणि कृती याबाबतीत फार स्वतंत्र बाणा आहे. बंधन लादण्याचा प्रयत्न केल्यास झुगारून द्याल. स्पष्टवक्ते आहात त्यामुळे तुमची मते नेहमी प्रगट करत रहाता. छोट्या गोष्टींवरून रागाचा पारा वर चढेल व वेथ आल्यास बळाचा उपयोग कराल. विविध उद्योगांद्वारे विपुल धनसंपत्ती करू शकाल.

10 एप्रिल –

वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर मंगळ, सूर्य या ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास मेष आहे. ग्रहांची चौकट इतकी मजबूत आहे की, आयुष्यात यश मिळवणे जछ जाणार नाही. अंगचे गुण लहानपणीच प्रगट होतील. मौलिक बुद्धीच्या जोरावर निर्माण होणार्‍या कल्पना कुणासही न घाबरता निश्चयी स्वभवाच्या जोरावर कृतीत आणाल. भागीदारीशिवाय काम करणे जास्त फायद्याचे राहील.

11 एप्रिल –

वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर चंद्र, नेंपच्यून, मंगळ या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास मेष आहे. तुमच्या स्वभावात दोन प्रकारचे गुण एकत्रित झालेले आहेत. कधी कधी तुम्ही इतरांशी कडकपणे वागाल तर कधी भावनेच्या आहारी जाऊन प्रेमाचा अतिरेक कराल. कार्यक्षेत्रात वारंवार बदल करीत कराल.

12 एप्रिल –

वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर गुरू, मंगळ या ग्रहांचा प्रभाव राहील. सूर्य रास मेष आहे. वरील दोन ग्रह एकत्र आल्यामुळे सामर्थ्यवान मिळण व्यक्तीमत्वात तयार झाले आहे. महत्त्वाकांक्षा फार दांडगी आहे. लक्ष्यप्राप्तीच्या ध्येयाने जीवापाड प्रयत्न कराल. कोणत्याही कार्यक्षेत्रात पदार्पण केले तरी चांगले यशप प्राप्त कराल. आर्थिक बाबतीत भाग्यवान आहात. नोकरी, उद्योग, व्यापार या तिन्हीत यश मिळू शकेल.

13 एप्रिल –

वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर हर्षल, रवि, मंगह या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास मेष आहे. ग्रहांची चौकट अशी आहे की, जीवनात काही वेगळ्या घटना घडतील. त्यामुळे विविध प्रकारचे विरोधाभास तयार होतील. जीवन एकसारखे असणार नाही. यश अपयशाचा काळ राहील. अकल्पित घटना घडतील. भागीदारासोबत व्यवसाय करण्यापेक्षा एकट्याने व्यवसाय केल्यास उत्तम आर्थिक स्थिती प्राप्त होईल.

14 एप्रिल –

वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर बुध, शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास मेष आहे. तुमच्या इच्छाशक्तीनुसार तुमचे जीवन अतिशय चांगले किंवा वाईट होऊ शकते. तुम्ही अतिशय भाग्यवान किंवा दुर्दैवी ठरू शकतात. मानसिक प्रगती विविध रंगांनी रंगलेली हुशारी व चातुर्ययुक्त राहील. तुमचे विचार व कृती गतीमान राहील. तर्कशक्ती अतिशय चांगली आहे. कोणताही विषय सहज आत्मसात करू शकाल. वाचनाची आवड राहील. स्मरणशक्ती चांगली आहे. आर्थिक स्थितीचे सुकाणू तुमच्या हातात राहील. ठरवाल तेवढी उंची आर्थिक क्षेत्रात गाठू शकाल.

- Advertisment -

ताज्या बातम्या