Friday, April 26, 2024
Homeभविष्यवेधजन्मतारखेनुसार भविष्य..Future By Date Of Birth

जन्मतारखेनुसार भविष्य..Future By Date Of Birth

किरोच्या नजरेतून – सौ. वंदना अनिल दिवाणे

1 एप्रिल –

- Advertisement -

वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर चंद्र, नेपच्यून, शनि या ग्रहांचा प्रभाव आहे. सुर्य रास मकर आहे. चंद्र आणि नेपच्यूनच्या प्रभावामुळे स्वभाव सौम्य , कल्पक राहील. अंतर्मनावर दैवी शक्तीचा प्रभाव असल्याने भावी घटनांची चाहूल तुम्हाला आधीच लागेल. स्वप्ने खरी ठरतील. आत्मविश्वासाच्या जोरावर जीवनात प्रगती अस्थिर राहील. त्यामुळे एकाग्रता प्राप्त करणे कठीण जाईल. जगण्यासाठी आवश्यक तेवढे पैसे मिळावेत. एवढीच अपेक्षा आहे. तरी पण उत्तम धनप्राप्ती होत राहील.

2 एप्रिल –

वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर गुरू, शनि या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास मकर आहे. गुरूच्या प्रभावामुळे स्वभाव आक्रमक राहील. त्यामुळे तुम्ही हाती घेतलेल्या कामात इतरांना विशेष ‘दम’ वाटेल. कामाच्या बाबतीत कृती विधायक असून त्यात चांगल्या योजना मोठ्या प्रमाणात असतील. वैवाहीक सुखाच्या बाबतीत मात्र जोडीदाराने तुमच्या बुद्धीमत्तेला प्रतिसाद दिला नाही तर, अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.

3 एप्रिल –

वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर हर्षल, शनि, सूर्य या ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास मकर आहे. त्यामुळे तुमचे विचार इतरांपेक्षा वेगळे आणि शुद्ध रहातील. कौटूंबिे संबंध बालपणी किंवा विवाहानंतर विशेष चांगले रहाणार नाही. गैरसमज झाल्यामुळे अनेक माणसे अवतीभोवती असूनही एकटे रहाल. इतरांपेक्षा तुमचे करिअरचे मार्ग वेगळे असतील. आणि तसे केलेच तरच तुम्हाला जीवनात यश मिळेल. प्रत्येक ठिकाणी अनेक विरोधक भेटतील. शांत व संयम ठेवून निश्चयाने पुढे गेलात तर यश तुम्हाला शोधत येईल.

4 एप्रिल –

वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर बुध आणि शनी या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास मकर आहे. अनेक विषयात रूची असल्यामुळे अनेक प्रकारची करिअर तुम्हाला बोलावल्यासारखे करतील. त्यातून एखादे करिअर निवडावे. एकदा स्वीकृत केलेल्या करिअरमध्ये वारंवार बदल करू नये. एकाच करिअरमध्ये मार्गक्रमण केल्यास निश्चीतपणे यशप्राप्ती होईल. प्रवासाची फार आवड आहे. त्यामुळे एकठिकाणी जास्त वेळ राहणे तुम्हाला आवडणार नाही.

5 एप्रिल –

वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर शुक्र, शनि या ग्रहांचा प्रभाव राहील. सूर्य रास मकर आहे. तुमच्या आयुष्यात प्रेमविवाह नातेसंबंध यांचे फार महत्व राहिल. यागोष्टींचा तुमच्या मनावर प्रभाव राहील. विरूद्ध लिंगी व्यक्तीच्या प्रभावामुळे आयुष्यात अनेक मत्वाच्या घटना घडतील. व्यक्तीमत्वात विशेष आकर्षण असल्यामुुळे अनेक लोकांच्या संपर्कात याल. कौटूंबिक अडचणींमुळे प्रगतीत अनेक अडचणी येतील. त्यावर मात करून प्रगतीकडे वाटचाल कराल. धनसंग्रह करणे कठीण जाईल.

6 एप्रिल –

वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर शनि, नेच्यून, चंद्र या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास मकर आहे. जे काम मिळेल. ते मनापासून करण्याची तुमची सवय असल्यामुळे कोणत्याही करिअरमध्ये निश्चीतपणे प्रगती करू शकाल. विशिष्ट देवतेची विशेष आराधना कराल. स्वभावाने रोमँटीक, आदर्शवादी उत्तम कल्पनाशक्ती असलेले असल्यामुळे आपल्या विश्वात रंगून गेलेेले असाल. परदेशात गेल्यावर विशेष प्रगती होईल. व्यवसायात आदर्शवादी प्रयोग कराल.

7 एप्रिल –

वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर शनि या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास मकर आहे. जीवनावर शनिचा फारच प्रभाव राहील. आयुष्यात पुढे जातांना अनेक संकटे येतील. वियोग होईल. त्यामुळे संघर्ष करीत पुढे जावे लागेल. स्वतःच्या जोरावर कर्तृत्व करून सर्व अडचणीवर सहज मात कराल. त्यासाठी भरपूर संयम हवा. महत्त्वांकाक्षा दांडगी असून ध्येय उंचीचे राहील. पराक्रमाची पराकाष्ठा करून तुम्ही ते मिळवाल यात शंका नाही. मोठ्या प्रमाणात धनप्राप्ती झाली तर इतरांच्या मानाने आर्थिक स्थिती विशेष चांगली राहणार नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या