जन्मतारखेनुसार भविष्य.. Future By Date Of Birth

11 ते 17 मार्च या आठवड्यात जन्मलेल्या व्यक्तींचे भविष्य
जन्मतारखेनुसार भविष्य..
जन्मतारखेनुसार भविष्य..Future By Date Of Birth

किरोच्या नजरेतून - सौ. वंदना अनिल दिवाणे

11 मार्च - वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर चंद्र, नेपच्युन, गुरु या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास मीन आहे. तुम्ही जीवनात भरभरुन यश मिळवू शकाल. मात्र त्यासाठी तुम्हाला दोन गोष्टी कराव्या लागतील. इच्छाशक्ती वाढविणे, घेतलेल्या निर्णयात बदल न करणे यासाठी तुम्हाला तुमचे लक्ष्य निर्धारीत करणे आवश्यक आहे. तांत्रिक कार्यापेक्षा कलाक्षेत्राशी संबंधित टीव्ही, सिनेमा, लेखन इ. कार्यात तुम्हाला जास्त यश मिळेल. तुमची संवेदनशीलता अधिक असल्यामुळे कर्तृत्वशाली वाढविण्यासाठी शांत परिसरात राहणे आवश्यक आहे. त्यातल्या त्यात निसर्गाचे सान्निध्य व सौंदर्य तुमची कार्यशक्ती चांगली वाढवील.

12 मार्च -वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर गुरू या ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास मीन आहे. तुमची महत्वाकांक्षा मोठी राहील. तुमचा उत्साह बौद्धिक कार्यात इतका दांडगा राहील की तुम्हाला कितीही बौद्धिक काम केले तरी थकल्यासारखे वाटणार नाही. तुमचे कोणते का कार्यक्षेत्र असेना तुमच्या हाताखाली काम करणारे अनेक लोक असतील व बहुधा त्यांना प्रमुख म्हणूनच तुम्हाला काम करावे लागेल. असे झाले तर तुमचे सहकारी व भागिदार तुमच्यावर फार खुश राहतील. मोठमोठ्या शाळा, कॉलेज, हॉस्पिटल अशा संस्थातून तुम्हाला काम करण्याची संधी मिळेल.

13 मार्च - वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर हर्षल, गुरु, रवि या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास मीन आहे. परंपरा व रुढीबद्दल आपुलकी नसल्यामुळे त्या गोष्टी पाळणे तुम्हाला जड जाईल. त्यामुळे इतरांना तुमचे वागणे विचित्र आहे असे वाटण्याची शक्यता आहे. आयुष्याच्या सुरुवातीला तुम्हाला नातेवाईकांचा विरोध, कौटुंबिक समस्या व पत्नीच्या नातेवाईकांकडून त्रास सहन करावा लागेल. तुम्हाला काही देणार्‍यापेक्षा तुमच्याकडून घेणार्‍या लोकांची संख्या अधिक असेल.

14 मार्च -वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर बुध, गुरु या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास मीन आहे. आयुष्यात यशस्वी व्हायचे की अपयशाच्या खोल दरीत पडावयाचे हे तुमच्या हातात राहील. सकारात्मक वृत्तीची जोपासना केल्यास तुम्हाला प्रचंड यश मिळेल. त्या उलट नकारात्मक वृत्तीच्या लोकांची संगत तुम्हाला अपयशाच्या खोल दरीत लोटून देऊ शकेल. सकारात्मक वृत्तीची जोपासना केल्यास तुमची विलक्षण बुद्धीमत्ता व परिस्थितीशी जुळवून घेण्याची आश्चर्यकारक शक्ती तुम्हाला यशाच्या उंच शिखरावर घेऊन जाईल.

15 मार्च - वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर शुक्र, गुरु या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास मीन आहे. शुक्र आणि गुरुच्या छत्राखाली राहून आयुष्यात प्रचंड यश मिळेल. नाही असे कधी होणार नाही. इतकी ही युती प्रबळ आहे. या सर्व सौंदर्याने परिभूत असलेल्या गोष्टींचे तुम्हाला फार आकर्षण राहील. त्यामुळे संगीत, पेंटींग, काव्य, साहित्य, नाटक, सिनेमा व टीव्ही या कार्यक्षेत्रामध्ये उत्तम प्रकारचे यश मिळवून नावलौकिकही मिळेल.

16 मार्च -वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर चंद्र, गुरु या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास मीन आहे. तुमची महत्वाकांक्षा दांडगी राहील. तुमचे आदर्श उच्च राहतील. स्वतंत्र बाणा असल्यामुळे आपल्या जीवनात तुम्ही इतरांना दखल देणे किंवा लुडबूड करणे अशा प्रकारच्या गोष्टी करु देणार नाहीत. तुम्ही फार मोठ्या मनाचे व उदार हृदयाचे आहात.

17 मार्च - वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर शनि, गुरु या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास मीन आहे. शनी ग्रहाच्या प्रभावामुळे तुमच्याविषयी इतरांच्या मनात अनेक प्रकारचे गैरसमज बदनामीकारक खोट्या गोष्टी भरवण्याचा शत्रूपक्ष प्रयत्न करील. त्यामुळे तुमच्या आर्थिक उत्पन्नात अडथळे येणे, नातेवाईकांशी न पटणे अशा प्रकारच्या गोष्टी घडण्याची भीती आहे. सतर्क रहावे. लवकर विवाह केल्यास तुमच्या प्रगतीच्या आड अनेक प्रकारची बंधने येतील व तुमच्या गुणांचा विकास होणे कठीण जाईल.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com