जन्मतारखेनुसार भविष्य..Future By Date Of Birth

4 ते 10 फेब्रुवारी या आठवड्यात जन्मलेल्या व्यक्तींचे भविष्य
जन्मतारखेनुसार भविष्य..
जन्मतारखेनुसार भविष्य..Future By Date Of Birth

किरोच्या नजरेतून - सौ. वंदना अनिल दिवाणे

4 फेब्रुवारी -

वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर रवि , हर्षल, शनि, या ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य कुंभ आहे. विचार मौलिक आहे. नवनवीन विचार करण्याची सवय आहे. नवीन प्रकारच्या अध्यात्मिक विचाराकडे जास्त आकर्षित होता. सामान्या लोकांशी म्हणावे तसे जमणार नाही. तुमचा स्वभाव संवेदनशील आहे. त्यामुळे इतरांशी जवळीक साधणे जड जाते. तुमच्याविषयी इतरांचे गैरसमज होतात. लहानसहान गोष्टी मनाला लावून घेता. शत्रूशीदेखील चांगल्याप्रकारे वागता. सामान्या माणसांना असते तेवढे पैशाचे वेड तुम्हाला नाही. पैसे मिळवण्याचे मार्ग इतरांपेक्षा वेगळे आहेत. नुकसान झाले तरी इतरांपेक्षा वेगळे होतील. लबाडांपासून दूर रहा.

5 फेब्रुवारी -

वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर बुध, शनि या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास कुंभ आहे. दोन्ही ग्रह एकत्र येणे तुमच्यासाठी फायद्याचे राहील. बुधामुळे चांगले विचार व शनिमुळे कष्ट करण्याची आवड पुढे जाण्यास उद्युक्त करेल. मानवी स्वभावबद्दल चांगली जाण आहे. विचारांचे पृथक्करण चांगल्याप्रकारे करता येईल. पैसा किंवा सत्ता याचे आकर्षण नाही. पण तुमचे कार्य इतरांनी मान्य करावे म्हणून तुम्ही धडपडता. आर्थिक बाबीमध्ये तुम्ही दिलेला सल्ला फायद्याचा राहील. स्वतःसाठी मात्र उपयोग करत नाही. बौद्धिक कामात श्रीमंत व्हाल.

6 फेब्रुवारी -

वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर शुक्र, शनि या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास कुंभ आहे.आपल्यावर मनापासून प्रेम करावे असे तुम्हाला सारखे वाटत राहील. पण अशी प्रेमाची भूक भागविणारी व्यक्ती मिळणे कठीण आहे. लहानपण जरी त्रासात गेले असले तरी तारूण्याचा काळ सुरू होताच भाग्योदय होईल. बर्‍याच वेळा बेभरवश्याच्या संस्थामधून केलेली गुंतवणूक पैसा देऊन जाईल. सार्वजनिक संस्थामधून पदाधिकार्‍याच्या रूपाने चांगला पैसा मिळू शकेल.

7 फेब्रुवारी -

वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर शनी, नेपच्युन, चंद्र, हर्षल या ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास कुंभ आहे. तुमचा स्वभाव अतिशय संवेदनशील असल्याने इतरांच्या नकळत उच्चारलेल्या एखाद्या शब्दानेही आपला अपमान झाला असे वाटत राहील. तसेच आपले करिअर नेमके कोणते हे तुम्हाला लवकर कळणार नाही. आपल्या भोवतालचे वातावरण व संपर्कात येणार्‍या लोकांबद्दल तुम्ही फार सतर्क म्हणजे जागरुक रहाल.

8 फेब्रुवारी-

वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर शनी आणि हर्षल या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमचे व्यक्तिमत्व इतरांपेक्षा वेगळे राहील आणि ते वेगळेपण इतरांच्या लगेच लक्षात येईल. कोणतेही करिअर असले तरी तुम्ही प्रत्येक गोष्टीवर सखोल विचार कराल. कारण तुम्हाला मुळातच अध्यात्माची आवड राहील. तुमच्या जीवनात अशा काही विचित्र घटना घडतील की त्यामुळे लहान वयातच तुमच्या खांद्यावर मोठी जबाबदारी येऊन पडेल.

9 फेब्रुवारी -

वाढदिवस असलल्या व्यक्तींवर मंगल, शनी या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास कुंभ आहे. तुमच्या जीवनाचा मार्ग तुमच्या प्रयत्नापेक्षा नशिबावर जास्त अवलंबून राहील. तुमची इच्छाशक्ती प्रबळ आहे. तुमच्या प्रत्येक कामावर तुमच्या विशेष व्यक्तिमत्वाची स्पष्ट छाप दाखवणारी असेल. तुमच्या व्यक्तिमत्वात एक प्रकारची संमोहनशक्ती आहे. तुमची तर्कशक्ती उत्तम आहे. वादविवादात प्रतिपक्षावर त्यांचा एखादा कमजोर मुद्दा शोधून त्यांना जिंकण्यात तुम्हाला विशेष आनंद वाटेल. मानव समाजाबद्दल सहानुभूती वाटेल.

10 फेब्रुवारी -

वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर शनी,सूर्य या ग्रहांचा प्रभाव राहील. तुमची सूर्य रास कुंभ आहे. तुम्ही तुमचे काम स्वतःच्या योजनेप्रमाणे सिद्ध कराल. आयुष्यात सुरुवातीला बरेच कष्ट करावे लागतील. तुमच्या कुटुंबात आणि योजनांत अचानक अनेक बदल सुरुवातीला होत राहतील. फार लवकर कुटुंबाची जबाबदारी येऊन पडेल. तुमच्या चतुरस्त्र बुद्धीमुळे मौलिक कल्पनांच्या आधारावर इतरांपेक्षा वेगळे अशा प्रकारे तुम्ही काम सुरु कराल.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com