Thursday, April 25, 2024
Homeभविष्यवेधजन्मतारखेनुसार भविष्य...Future By Date Of Birth

जन्मतारखेनुसार भविष्य…Future By Date Of Birth

किरोच्या नजरेतून – सौ. वंदना अनिल दिवाणे

28 जानेवारी –

- Advertisement -

वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर सूर्य , हर्षल, शनि, या ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य कुंभ आहे. स्वभाव स्वतंत्र बाण्याचा आहे. मौलिक विचारामुळे सृजनशीलतेची फार तहान लागेल. पण तुमच्या विशिष्ट स्वभावामुळे जीवनात यश मिळण्यात दिरंगाई होण्याची शक्यता आहे. तुमचे लक्ष्य निर्धारित केलेले असल्यामुळे वाटचाल त्या दिशेने चालू राहील. स्वभाव उदार आहे. काटकसरी स्वभावामुळे खर्चावर नियंत्रण व बचतीवर जोर राहील. जीवनभर आर्थिक सुस्थिती राहील.

29 जानेवारी –

वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर नेपच्यून, चंद्र, शनि या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास कुंभ आहे. चंद्र व नेपच्यूनच्या प्रभावामुळे स्वभाव सौम्य असून कल्पनाशक्ती चांगली आहे. अंतर्मन जागृतीमुळे पुढील घटनांची चाहूल आधीच लागेल. अतिशय संवेदनशील असल्यामुळे एखादी गोष्ट मनाविरुद्ध केली की अचानक प्रयत्नांचा पसारा आवरून काही काळ निष्क्रीय व शांत बसून मनाच्या जखमा उगाळीत रहाल.

30 जानेवारी –

वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर गुरू, शनि या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास कुंभ आहे. महत्त्वाकांक्षा दांडगी आहे. आपल्या दृढनिश्चयामुळे व स्वकर्तृत्वामुळे तुम्ही ती प्राप्त करू शकाल. शत्रुवर्ग मोठा असेल. कारण तुमची धडक प्रगतीमुळे अनेकांना मत्सर वाटत राहील. आपला हुकुम सर्वांनीच पाळलाच पाहिजे असा तुमचा स्वभाव आहे. मोठ्या योजनांमधून पैशाची गुंतवणूक केल्याने कधी कधी आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. सावधगिरी बाळगा.

31 जानेवारी –

वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर हर्षल, सूर्य शनी या ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची कुंभ आहे. विचार मौलिक असतील. स्वतंत्र बाणा असल्याने इतरांच्या योजनात स्वतःला जमवून घेणे जमणार नाही. कौटुंबिक बाबतीत व वैवाहिक आयुष्यात अडचणी संभवतात. गैरसमज झाल्याने एकाकी आहोत असक वाटेल. स्वतःच्या योजनेप्रमाणे काम केल्यास यश मिळेल. प्रचंड प्रमाणात पैसा मिळवूनही तो खर्च केल्याने टिकणे अवघड जाईल.

1 फेब्रुवारी –

वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर हर्षल, रवि, शनी या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास कुंभ आहे. कौैटुंबिक परिस्थितीत अनेक बदल संभवतात. त्यामुळे लवकरच कुटूंबाची जबाबदारी तुमच्या खांद्यावर येईल. विचार मौलीक असून बर्‍याच विषयात तुम्हाला रस वाटेल.महत्वाकांक्षा दांडगी असेल. इच्छाशक्ती प्रबळ असून निश्चयात्मक बुद्धी चागली आहे. अनेक विश्व मार्गाचे अनुकरण करत करत पुढे जाल. शेअर्स सारख्या बेभरवशाच्या धंद्यापासून दूर रहा.

2 फेबु्रवारी –

वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर चंद्र, शनी, नेपच्यून या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास कुंभ आहे. आदर्शवादी आणि रोमँटीक असल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारची अनेक प्रेमप्रेकरणे घडण्याची शक्यता आहे. स्वभाव महत्वाकांक्षी असल्यामुळे जीवन सुधारण्याचे अनेक मार्ग उपलब्ध असतील. आत्मविश्वास वाढवा. प्रवासाची आवड राहील. कला, साहित्य, संगीताद्वारे आपल्या इच्छा प्रकट कराल. जीवनाच्या उत्तर भागात श्रीमंत होण्याचे योग आहेत. अनेक बक्षीसे व सन्मान प्राप्त होतील.

3 फेब्रुवारी –

वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर मंगळ, शनि या ग्रहांचा प्रभाव राहील. तुमची सूर्य रास कुंभ आहे. सामाजिक संस्था, सरकारी खाते, राजकारणात चांगले यश मिळेल. बौद्धीेक कामात यश मिळेल. शारिरीक कामात रस वाटणार नाही. मोठमोठ्या संस्थांचे व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करू शकाल. काहीही केली तरी यश मिळेल यात शंका नाही. आर्थिक बाबतीत इतरांपेक्षा चांगले यश मिळेल.अधून मधून तोट्याची शक्यता तरी सावध रहावे.

- Advertisment -

ताज्या बातम्या