Friday, April 26, 2024
Homeभविष्यवेधजन्मतारखेनुसार भविष्य..Future By Date of Birth

जन्मतारखेनुसार भविष्य..Future By Date of Birth

किरोच्या नजरेतून : सौ. वंदना अनिल दिवाणे

7 जानेवारी – वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर शनि, नेपच्यून, चंद्रया ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य मकर आहे. जे काम मिळेल ते मनापासून करण्याची सवय असल्यामुळे कोणत्याही करिअरमध्ये निश्चीतपणे प्रगती करू शकाल. ईश्वरावर तुमची पूर्ण श्रद्धा आहे. विशिष्ट देवतेची आराधना कराल. स्वभावाने आदर्शवादी, उत्तम कल्पनाशक्ती असलेले आपल्या वेगळ्याच विश्वात रंगून गेलेले असतात. प्रवासाची आवड आहे. परदेशगमनाचा योग असल्यामुळे तुमची विशेष प्रगती होईल. व्यवसायात आदर्शवादाचा प्रयोग कराल पण त्यामुळे अनेक ठिकाणी फिरावे लागेल.

- Advertisement -

8 जानेवारी – वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर शनि या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास मकर आहे. जीवनावर शनि ग्रहाचा प्रभाव राहील. आयुष्यात वाटचाल करतांना अनेक संकटे येतील. वियोग होईल. त्यामुळे संघर्ष करीत पुढे लावे लागेल. स्वकर्तृत्वावर संकटांवर मात करून पुढे जाल. यासाठी संयम आणि सहनशक्तीचे बळ असेल. आधी केले मग सांगितले अशी वृत्ती राहील. महत्वाकांक्षा दांडगी असेल. पराक्रमाची पराकाष्ठा करून ध्येय गाठाल. उदासवाणे वाटेल पण थोड्याच काळात उदासी दूर होईल. मोठ्या प्रमाणात धनप्राप्ती होईल तरी आर्थिक परिस्थिती चांगली रहाणार नाही.

9 जानेवारी – वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर मंगळ, शनि या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास मकर आहे. धाडसाने पुढे जाण्याचा प्रयत्न करतांना अनेक प्रकारचे कधी वर तर कधी खाली होण्याचे प्रसंग येतील. वेगवान प्रगती पाहून आनंद होतांना अचानक काही तरी उलट सुलट घडेल. पूर्वजांनी मिळवलेली स्थावर इस्टेट असली तरी त्रासदायक काळातून जावे लागण्याची शक्यता आहे. वयाच्या 33 ते 35 व्या वर्षी न आवडणारे काम करण्याची वेळ येईल. असे असले तरी महत्त्वाकांक्षा दांडगी असल्याने आशावादी राहून महत्त्वाच्या पदावर आरूढ व्हाल. पैसा मिळवण्यासाठी काही अडथळे आले तरी अथक परिश्रमातून आर्थिक परिस्थिती हळुहळु चांगली होईल.

10 जानेवारी – वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर रवि, हर्षल, शनी, या ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य मकर आहे. रवि आणि हर्षलमुळे तुमच्या व्यक्तीमत्वात वेगळेपणा निर्माण होईल. तुमचे विचारस्वातंत्र्य स्वतःचे असतील. उत्तराआयुष्यात यश तुम्हाला शोधत येईल. प्रत्येक काम विचारपूर्वक व गांभीर्याने करण्याची सवय आहे. विचार वस्तुस्थितीला धरून व समतोल असतील. त्यामुळे कोणीही चुकीच्या मार्गाला नेणार नाही. ध्येय सुरूवातीला निश्चीत झाले असल्यामुळे ते प्राप्त करण्यासाठी वाटेल तेवढे कष्ट घ्याल. आर्थिक बाबतीत अत्यंत काटकसरी व सावध राहील्यामुळे सुरक्षित ठिकाणीच गुंतवणूक राहील. इतरांवर तुमच्या व्यक्तीमत्वाचा संमोहनयुक्त प्रभाव राहील त्यामुळे आर्थिक सुस्थिती राहील.

11 जानेवारी – वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर चंद्र, नेपच्यून, शनि, ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास मकर आहे. चंद्र व नेपच्यूनच्या प्रभावामुळे स्वभाव सौम्य असून कल्पनाशक्ती चांगली आहे. भावी काळात घडणार्‍या घटनांची स्वप्नाद्वारे आधीच चाहूल लागेल. दिवास्वप्न पाहण्याची सवय आहे. ती तुमच्या महत्त्वाकांक्षेच्या निगडीत आहे. आत्मविश्वासात वृद्धी केल्यास स्वप्ने खरी होतील. पैशाविषयी फारसे आकर्षण असणार नाही.

12 जानेवारी – वाढदिवस असलेल्या गुरू, शनिग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास मकर आहे. गुरूच्या प्रभावामुळे वृत्ती कामाच्या बाबतीत आक्रमक व सामर्थ्यशाली राहील. महत्त्वाकांक्षा दांडगी राहील. निश्चयात्मक बुद्धीने स्वकर्तृत्वावर उत्तम यश मिळवणे शक्य होईल. यशाबरोबर मत्सरामुळे विरोधक व शत्रुंची मांदियाळी तयार होऊन ती पाठीशी असेल. योजना मोठ्या असतील त्यासाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करतांना चूक होऊन नुकसान होऊ नये ही काळजी घ्या.

13 जानेवारी – वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर हर्षल, सूर्य. शनि या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास मकर आहे. हर्षल ग्रहाचा प्रभाव राहील. तुमची मते मौलिक असतील. स्वभाव स्वतंत्रता प्रिय राहील. दुसर्‍याच्या हाताखाली काम करणे जड जाईल कौटुंबिक सुखाच्या बाबतीत समाधान मिळणे कठीण जाईल. अनेक गैरसमज होऊन दुसर्‍यांनी टीका केल्यामुळे एकाकी आहोत असे वाटत राहील. अर्थप्राप्तीचा मार्ग इतरांपेक्षा वेगळा राहिल. मोठ्या प्रमाणात पैसा मिळवूनही तो खर्च करत राहील्याने धनसंग्रह होणे कठीण आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या