Tuesday, April 23, 2024
Homeभविष्यवेधजन्मतारखेनुसार भविष्य..Future By Date Of Birth

जन्मतारखेनुसार भविष्य..Future By Date Of Birth

किरोच्या नजरेतून – सौ. वंदना अनिल दिवाणे

31 डिसेंबर –

- Advertisement -

वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर शनि, हर्षल, सूर्यया ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य मकर आहे. हर्षल हा शनिचा जुळा भाऊ आहे. त्यामुळे जीवन नशीबाच्या प्रवाहात वाहत राहील. बुद्धीमत्ता तीक्ष्ण आहे. कल्पनाशक्ती उत्तम आहे. संशोधनाच्या कामात उत्तम यश मिळेल. आपण बरे व आपले काम बरे अशी वृत्ती असल्यामुळे इतरांचा तुमच्याविषयी गैरसमज होण्याशी शक्यता आहे. स्वतंत्रवृत्ती असल्याने दुसर्‍याच्या हाताखाली काम करणे जड जाईल. प्रमुख म्हणून काम केल्यास उत्तम धनप्राप्ती होईल. त्याचा इतरांना मदत करण्यासाठी उपयोग कराल.

1 जानेवारी –

वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर सूर्य, हर्षल, शनि या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास मकर आहे. स्वभाव अत्यंत महत्त्वाकांक्षी आहे. स्वतंत्र विचाराचे असून मौलीकता हा विशेष गुण आहे. त्यातून निर्माण होणार्‍या सृजनशीलतेचा चांगला फायदा होईल. प्रत्येक गोष्टीचा बारीक सारीक तपशील जाणणे तुम्हाला आवडते. एकदा लक्ष्य निर्धारित केल्यावर ते प्राप्त करण्यासाठी सतत प्रयत्नात असता. आर्थिक बाबतीत फार सावध असल्याने केलेले गुंतवणूकीतून चांगली धनप्राप्ती होईल.

2 जानेवारी –

वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर चंद्र, नेपच्यून, शनि या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास मकर आहे. चंद्र व नेपच्यून यांच्या प्रभावामुळे स्वभाव सौम्य व कल्पक राहील. अंतर्मनावर दैवी शक्तीचा प्रभाव असल्याने भावी घटनांची चाहूल आधीच लागेल. स्वप्ने खरी ठरतील. आत्मविश्वासाच्या जोरावर जीवनात प्रगती अस्थिर राहील त्यामुळे एकाग्रता प्राप्त करणे कठीण जाईल. जगण्यासाठी आवश्यकते- पुरते पैसे मिळावे एवढीच अपेक्षा आहे. तरीपण तुम्हाला उत्तम धनप्राप्ती होईल.

3 जानेवारी –

वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर गुरू,शनी, या ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य मकर आहे. गुरूच्या प्रभावामुळे स्वभाव काहीसा आक्रमक राहील. त्यामुळे तुम्ही हाती घेतलेल्या कामात इतरांना विशेष दम वाटणार नाही. कामाच्या बाबतीत तुमची वृत्ती विधायक असून तुमच्या योजना मोठ्या प्रमाणात असतील. वैवाहिक जीवनात जोडीदाराने तुमच्या बुद्धीमत्तेला योग्य प्रतिसाद दिला नाही तर अडचणी निर्माण होतील. तुमची महत्त्वाकांक्षा मोठ मोठे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात भांडवल गुंतवणूक कराल.

4 जानेवारी –

वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर हर्षल, शनि, रवि ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास मकर आहे. स्वतंत्र बाण्याचे आहात. त्यामुळे विचार इतरांपेक्षा वेगळे राहतील. कौटुंबिक संबंध बालपणी अथवा विवाहानंतर विशेष चांगले राहणार नाही. गैरसमज झाल्यामुळे अनेक माणसे अवतीभवती असून एकटे पडल्यासारखे वाटेल. इतरांपेक्षा करिअरचे मार्ग वेगळे असतील. आणि तसे केले तरच तुम्हाला जीवनात यश मिळेल. प्रत्येक ठिकाणी अनेक विरोधक भेटतील. पण शांत राहून व संयम ठेवून पुढे गेलात तर यश शोधीत येईल. मोठ्या प्रमाणात पैसा मिळेल. पण तो तुमच्या हातात राहणार नाही. कारण पाण्यासारखा पैसा खर्च करण्याची वृत्ती.

5 जानेवारी –

वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर बुध, शनिग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास मकर आहे. अनेक विषयात रूची असल्यामुळे अनेक करिअर बोलावल्यासारखे करतील. त्यातून एखादे करिअर निवडावे. एकदा स्वीकृत केलेल्या करिअरमध्ये वारंवार बदल करू नयेत. एकाच करिअरमध्ये मार्गक्रमण केल्यास यशप्राप्ती निश्चीत आहे. अनेक प्रकारची माणसे तुम्हाला भेटतील त्यांच्याशी जुळवून घेण्याची कला अवगत आहे. प्रवसाची आवड आहे. त्यामुळे एका ठिकाणी जास्त वेळ रहाणे आवडत नाही. जीवनात अनेक संधी मिळतील. पैशाच्या बाबतीत फार सतर्क असाल. कृपण वृत्ती आहे. कर्जविषयी जास्तच भिती वाटते आहे. या अतिसावधानतेमुळे बचतीच्या चांगल्या संधी घालवल्याचे लक्षात येईल.

6 जानेवारी –

वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर शुक्र, शनि या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास मकर आहे. आयुष्यात प्रेमविवाह, नातेसंबंध, यांचे फार महत्त्व राहील. आयुष्यात अनेक महत्त्वाच्या घटना घडतील. व्यक्तीमत्वात विशेष आकर्षण असल्यामुळे अनेक लोकांच्या संपर्कात याल. कौटुंबिक अडचणींमुळे अनेक अडथळे येतील त्यावर मात करून प्रगतीकडे वाटचाल कराल. धनसंग्रह करणे कठीण जाईल. पण हळुहळु का होईना बचत करून वृद्धापकाळात ठराविक उत्पन्न मिळावे अशी सोय कराल.

- Advertisment -

ताज्या बातम्या