Friday, April 26, 2024
Homeभविष्यवेधजन्मतारखेनुसार भविष्य..Future By Date Of Birth

जन्मतारखेनुसार भविष्य..Future By Date Of Birth

किरोच्या नजरेतून – सौ. वंदना अनिल दिवाणे

24 डिसेंबर –

- Advertisement -

वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर शनि, शुक्र ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य मकर आहे. अतिथी सत्काराची फार आवड राहील. मित्रांची संख्या मोठी राहील. पाळीव प्राण्यांची आवड राहील. वैवाहीक संबंध बर्‍याच दूरच्या स्थळी होईल. मित्रांबरोबर मैत्रिणीही असतील. सर्वांशी तुमचे संबंध मैत्रीचे व प्रेमळ राहतील. धनप्राप्तीसाठी विशेष प्रयत्न केला नाही तरी विपुल प्रमाणात पैसा प्राप्त होईल. शिवाय विवाह, समारंभ याद्वारे धनप्राप्ती होईल.

25 डिसेंबर –

वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर नेपच्यून, चंद्र, शनि या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास मकर आहे. नेपच्यून ग्रहाचा जास्त प्रभाव राहील. अध्यात्म व गूढशास्त्रात चांगली प्रगती होऊ शकेल. जीवनातील भावी घटनांची स्वप्नाद्वारे अगोदरच सूचना मिळत राहील. गूढशक्तीद्वारे आपल्याला सारखे मार्गदर्शन होत राहील. तिच्यावर अंकूश ठेवणे फायद्याचे असेल. आर्थिक बाबतीत तुमची मते व मार्ग वेगळा असेल. गुंतवणूकीच्या बाबतीत लबाड लोकांपासून सावध रहा..

26 डिसेेंबर –

वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर शनि या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास मकर आहे. शनीचा प्रभाव आहे. त्यामुळे तुमच्या महत्त्वाकांक्षेत अनेक अडचणी दत्त म्हणून उभ्या राहतील. आपल्या स्थितप्रज्ञ स्वभावामुळे त्यावर मात करून पुढे जाल. उत्तम न्यायाधीश, वकील, व्यापारी म्हणून चांगले यश लाभेल. साहसी स्वभावामुळे जीवनात उत्तम यश मिळेल. आर्थिक स्थिती सुधारत राहील. अनेक नातेवाईकांची जबाबदारी उचलल्यामुळे आर्थिक स्थितीवर ताण पडेल.

27 डिसेंबर –

वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर मंगळ,शनी, या ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य मकर आहे. आशावादी आहात. हाताखालच्या लोकांकडून काम करून घेतांना हुकूमशाही वृत्ती राहील. निडर वृत्ती असल्याने अचानक उद्भवलेल्या प्रसंगातून निभावून जाण्यासाठी लोक मदत घेतील. विवाहापासून आर्थिक फायदे संभवतात. एकापेक्षा अधिक विवाहाची शक्यता. आर्थिक बाबतीत भाग्यवान आहात. अकल्पितपणे वारसाहक्क विवाहसंबंध किंवा शेअर्ससारख्या व्यवहारातून आर्थिक लाभ होतील.

28 डिसेंबर –

वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर हर्षल, शनि, सूर्य ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास मकर आहे. तुमचा स्वभाव अतिशय आनंदी, प्रेमळ, आशावादी राहील. उत्साह दांडगा आहे. उदारमतवादी आहात. मत स्पष्टपणे सांगण्याची सवय आहे. धाडसाने नवनवीन कामात उडी घेणे फार आवडते. सहजतेने कुणी फसवू शकणार नाही. कोणत्याही प्रकारच्या कामातून विपुल प्रमाणात धनप्राप्ती होईल. सट्ट्यासारख्या व्यवहारात मुळीच सहभागी होऊ नये.

29 डिसेेंबर –

वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर चंद्र, नेपच्यून, शनिग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास मकर आहे. भौतिक फायद्यांपेक्षा आध्यात्मिक विचारांचा जास्त प्रभाव राहील. विचारांची बैठक उच्च दर्जाची राहील. धर्म, अध्यात्म, गूढशास्त्र यांची प्रचंड आवड राहील. स्वप्नाद्वारे पुढील घटनांची सूचना प्राप्त होत राहील. मात्र त्यातून सांसारिक अथवा आर्थिक फायदा घेणे जमणार नाही. खाण्यापिण्याची आवड विशिष्ट प्रकारची आहे. धनप्राप्ती आकर्षण नसले तरी उच्चपदप्राप्तीमुळे मिळालेल्या पैशांचा इतरांना मदत करण्यासाठी उपयोग कराल.

30 डिसेेंबर-

वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर सूर्य, शनि या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास मकर आहे. ग्रहांची चौकट अतिशय सामर्थ्यवान आहे. जीवनात भरभरून यश मिळेल. राजकारणात शिरल्यास उच्चपद प्राप्ती होण्याची शक्यता आहे. त्यातून किर्ती, संपत्ती प्राप्त होतील. शिवाय ट्रान्सपोर्टर, बिल्डर, कॉन्ट्रक्टर, इ, व्यवसायातही भरपूर फायदा आहे. सुगीचा काळ असेपर्यंत मिळालेल्या धनाची उत्तम गुंतवणूक केल्यास वृद्धापकाळ सुखात जाईल.

- Advertisment -

ताज्या बातम्या