Friday, April 26, 2024
Homeभविष्यवेधजन्मतारखेनुसार भविष्य..Future By Date Of Birth

जन्मतारखेनुसार भविष्य..Future By Date Of Birth

किरोच्या नजरेतून – सौ. वंदना अनिल दिवाणे

17 डिसेंबर –

- Advertisement -

वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर शनि, गुरू ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य धनु आहे. शनि आणि गुरू एकत्रित आल्यामुळे नंबर 8 चा प्रभाव राहील. नंबर 8 हा मुख्यतः शनिचा आहे. करिअरच्या सुरूवातीला फार त्रास सहन करावा लागेल. महत्त्वाकांक्षा प्राप्त होण्यामागे अनेक अडथळे येतील. सहनशक्ती दांडगी आहे. कोणतीही गोष्ट सहजासहजी मिळणार नाही. असे असूनही देखील हळूहळू पण निश्चीतपणे लक्ष्य प्राप्त कराल. उत्तम न्यायाधीश, वकील किंवा व्यापारी होऊ शकतात. विशेषतः स्वतःपेक्षा दुसर्‍याच्या कामाच्या वेळी तुम्ही सावध असाल. वृत्ती सावधानतेची आहे. आत्मविश्वास वाढविल्यास चांगले यश मिळेल.

18 डिसेंबर –

वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर गुरू, मंगळ या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास धनु आहे. महत्त्वाकांक्षा दांडगी आहे. आशावादी आहात. हाताखालच्या लोकांकडून हुकूमाचे काम घेण्याची वृत्ती आहे. अत्यंत धाडसी असून भिती हा शब्द माहित नाही. नैसर्गिक वातावरणात राहणे फार आवडते. विवाहानंतर भाग्योदय होईल. मात्र एकच विवाह होईल असे सांगता येणार नाही. धाडसी सफरींची आवड आहे. प्रवास करणे शक्य नसल्यास अतिशय बेचैन व्हाल. नव नवीन स्थळे शोधून काढण्याची फार इच्छा आहे. अर्थप्राप्तीच्या बाबतीत अतिशय भाग्यवान आहात.

19 डिसेेंबर –

वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर गुरू, सूर्य, हर्षल या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास धनु आहे. व्यक्तीमत्च प्रसन्न, आनंदी, आशावादी भाव प्रकट करणारे आहे. कशाही प्रकारची परिस्थिती आली तरी तुमचे व्यक्तीमत्व तसेच राहील. सकारात्मक दृष्टीकोन ठेवल्यास संकटावर मात करणे सहज शक्य होईल. अपयश मनावर न घेता पुन्हा पुन्हा प्रयत्न केल्यास यश मिळवाल. अति उदार स्वभावामुळे मात्र काही जवळचे लोक फसवतील. आणि त्यामुळे आर्थिक टंचाईला अधून मधून तोंड द्यावे लागेल. कोणत्याही कामापासून पैसा मिळवणे हा तुमचा छंद आहे. असे म्हटले तरी चालेल. त्यासाठी वाटेल ती रिस्क घेण्यासाठी तयार असता. शेअर्ससारख्या धंद्यात मात्र कधी तरी मोठे नुकसान होईल. त्याविषयी आधीच सतर्क राहिलेले बरे. आर्थिक टंचाई आली तरी पुन्हा एखाद्या सरळ व्यवसायात हळूहळू पैसा मिळवून श्रीमंत व्हाल यात शंका नाही.

20 डिसेंबर –

वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर चंद्र, नेपच्यून, गुरू या ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य धनु आहे. तुमचा स्वभाव सौम्य, सभ्य, आशावादी, असलेला असा आहे. भौतिक सुखापेक्षा आध्यात्मिक सुखामध्ये मन जास्त रमते. धार्मिकता, गूढशास्त्रे, अध्यात्म, याविषयांची तुम्हाला फार गोडी वाटेल. त्यामुळे वारंवार स्वप्ने पडतात किंवा एखाद्या वेळी साक्षात्कार झाल्यासारखा अनुभव येतो. त्यातून भावी घटनांची चाहूल लागेल. अंतःस्फूर्ती असल्याने उत्तम ज्योतिषी होऊ शकाल. ज्योतिषशास्त्राची आवड वाटली तरी त्यातून पैसा मिळवावा असे तुम्हाला वाटणार नाही. इतरांपेक्षा आर्थिक बाबतीत तुमचा स्वभाव हटके असेल. पण कोणत्याही करिअरमध्ये सहजच उच्चपद प्राप्त होईल.

21 डिसेंबर –

वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर गुरू, शनि, सूर्य ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास मकर आहे. गुरू अतिशय प्रबळ असल्यामुळे त्याचे सूर्याबरोबर होणे तुम्हाला अतिशय सामर्थ्यवान बनवतील. कोणत्याही प्रकारचे करिअर असले तरी त्यात चांगले यश मिळेल. समाजात मानप्रतिष्ठा व पुढारीपण प्राप्त होईल. व्यवस्थापनेचे कार्य चांगले जमेल. आर्थिक बाबतीत फार चांगले यश मिळेल. एक इशारा द्यावा वाटतो की , चलतीच्या काळात वृद्धापकाळासाठी भरपूर तरतूद करून ठेवणे आवश्यक आहे.

22 डिसेेंबर –

वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर हर्षल, सूर्य, शनिग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास मकर आहे. हर्षलच्या प्रभावामुळे जीवनात अनेक वळणाचा अनुभव येईल. हर्शल हा शनिचा जुळा भाऊ आहे. असे म्हणतात. त्यामुळे जीवन नेहमी नशिबावर अवलंबून राहील. बुद्धीमत्ता अतिशय तीक्ष्ण असून एखादा विशिष्ट विषय निवडून प्राविण्य संपादन करता येईल. कल्पनाशक्ती प्रबळ राहील. संबोधक वृत्ती चांगली राहील. आर्थिक आवकाची स्थिती कधी जास्त आवक तर कधी कमी अशी सारखी वर-खाली होत राहील.

23 डिसेेंबर –

वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर बुध, शनि या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास मकर आहे. जीवनात बुध ग्रहाचा प्रभाव महत्त्वाचा राहील. बुद्धीमत्ता तीव्र असल्यामुळे नेहमी मानसिक स्थिती चंचल राहील. त्यासाठी तुमचे हात किंवा बुद्धी सतत कोणत्या ना कोणत्या कामात गुंतवून ठेवलेली पाहिजे. फार महत्त्वाकांक्षी आहात. क्रीडा क्षेत्रात उत्तम यश मिळू शकेल. मात्र त्या अपघातापासून नेहमी सावध राहणे आवश्यक आहे. साहित्य, विज्ञान, वैद्यक, कायदा किंवा नेता यापैकी एखाद्या क्षेत्रात उत्तम यश मिळेल. पैसा हातचा मळ आहे. असे वाटण्याइतका सहज मिळेल.

- Advertisment -

ताज्या बातम्या