Wednesday, April 24, 2024
Homeभविष्यवेधजन्मतारखेनुसार भविष्य..Future By Date Of Birth

जन्मतारखेनुसार भविष्य..Future By Date Of Birth

किरोच्या नजरेतून – सौ. वंदना अनिल दिवाणे

10 डिसेंबर –

- Advertisement -

वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर सूर्य, हर्षल, गुरू ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य धनु आहे. तुमचा चेहरा नेहमी प्रसन्न व आनंदी असतो. आशावादी असल्याने कोणत्याही त्रासाला किंवा संकटाला घाबरत नाही. बोलण्यात उदारपणा स्पष्ट होतो. तुम्ही स्पष्टवक्ते आहात. एका उदयोगात अपयश आले तर निराश न होता लगेच दुसरा उद्योग सुरू करून त्यात यशस्वी व्हाल. आपल्या जवळील असेल नसेल ते दुसर्‍याला देण्याच्या वृत्तीमुळे स्वतःची आर्थिक स्थिती बिघडण्याची शक्यता आहे. त्याबाबत जागरूक रहावे. माणूस ओळखण्याची कला जन्मतःच असल्याने सहसा फसवणूक होणार नाही. कोणत्याही करिअरमध्ये तुम्ही विपुल प्रमाणात पैसे कमवाल. शेअर्ससारख्या व्यवहारात रिस्क घेण्याची सवय असेल तर तोटा होण्याचा संभव आहे. जरी सतर्क रहाणे आवश्यक आहे.

11 डिसेंबर –

वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर गुरू, चंद्र, नेपच्यून या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास धनु आहे. स्वभाव सौम्य कमी आशावादी व कमी आत्मविश्वास असलेला आहे. भौतिक कार्यापेक्षा आध्यात्मिक कार्यात जास्त रस वाटेल. त्यामुळे अध्यात्म, धर्म, गूढ या शास्त्रांचा अभ्यास कराल. स्वप्नातून होणार्‍या साक्षात्काराकडून भावी घटनांची चाहूल लागते. या शक्तीचा आर्थिक फायदा मिळवण्यासाठी उपयोग करता येणार नाही. वास्तविक पैसे मिळवण्याचे फारसे आकर्षण वाटत नाही. पण साधारणपणे आपल्या बौद्धिक शक्तीच्या जोरावर मोठमोठे पद मिळवाल. इतरांच्या आर्थिक प्रगतीसाठी प्रयत्न कराल.

12 डिसेेंबर –

वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर गुरू, रवि या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास धनु आहे. रवि आणि गुरू एकत्रित झाल्यामुळे एक शक्तीशाली ग्रहयुती मदतीला आहे. उत्तम समन्वयक होणे चांगले जमेल. राजकीय चळवळीत यश मिळवून अनेक प्रकारचे पुरस्कार मिळवाल. त्यातून पुढे मोठ्या जबाबदार्‍या मिळतील. त्याशिवाय बिल्डर, डिझायनर, ट्रान्सपोर्ट कंपनी अशा उद्योगांचा प्रमुख म्हणून चांगली जबाबदारी पार पाडाल. सरकारी नोकरी केल्यास उच्च पदापर्यंत पोहोचाल. काहींना धार्मिक विषयाची आवड राहील. आतापर्यंत तुमची प्रगती किती होऊ शकेल हे वर सांगितलेलेच आहे. प्रगतीच्या या काळात मिळवलेला पैसा पन्नास वर्ष वयाच्या आतच योग्य गुंतवणूक करून ठेवावा.

13 डिसेंबर –

वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर हर्षल, रवि, गुरू या ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य धनु आहे. हुशार आहात. बौद्धिक पातळी उच्च आहे. कार्यक्षेत्राच्या विशेष गोष्टीवर बौद्धिकदृष्ट्या प्रभुत्व प्राप्त आहे. नवनवीन शोध लावणे सहज शक्य आहे. अंतर ठेवून जगतांना दुसर्‍यांचा मात्र तुमच्याविषयी गैरसमज निर्माण होतो. जे लोक खोट्या नाट्या वावड्या उठवतात त्यांच्या विरोधात ते काहीच करू शकत नाही. साक्षात्कार होणे, विचित्र स्वप्ने, भावी घटनांविषयी चाहूल अशा गोष्टी तुमच्या बाबतीत घडत आहेत. पैसा ही विचित्र गोष्ट आहे. अद्भूत प्रकाराने मोठ्या प्रमाणावर पैसा येतो खरा परंतू तो टिकून ठेवणे शक्तीच्या बाहेरचे आहे. जीवनाकडे पाहण्याचा तुमचा दृष्टीकोन असल्यामुळे कुठून तरी अचानक मदत मिळेल असे वाटत राहील.

14 डिसेंबर –

वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर बुध, गुरू, ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास धनु आहे. जीवनात बुधाचा प्रभाव फार मोठा व महत्त्वाचा राहील. बुद्धी अतिशय तीक्ष्ण असून हुषार व हजरजबाबी आहात. हाताला व डोक्याला काम नसेल तर अस्वस्थ होता. काल्पनिकदृष्ट्या तुम्ही महत्त्वाकांक्षी आहात. आवडीनिवडी निश्चित आहे. मानसिक अस्वस्थेवर नियंत्रण ठेवल्यास कोणत्याही करिअरमध्ये शिखर गाठाल. भरधाव वेगाचे फार आकर्षण आहे. आर्थिक उत्पन्नाच्या दृष्टीने तुम्ही भाग्यवान आहात. गुंतवणूकीतून चांगला पैसा मिळू शकेल. मात्र गुंतवणूक करतांना दुसर्‍याचा विचार न घेता करा.

15 डिसेेंबर –

वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर गुरू, शुक्र ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास धनु आहे. गुरू व शुक्राची युती हा योग अतिशय फायद्याचा आहे. कारण दोन्ही ग्रह एकमेकांचे पूरक ग्रह आहेत. तुम्हाला निसर्गाची आवड आहे. त्याप्रमाणेच सौंदर्याचेही वेड आहे. कोणत्याही प्रकारे खालच्या पातळींशी संबंध येणे आवडत नाही. अतिथी सत्कार करताना आनंद द्विगुणीत होतो. मैदानी खेळाची आवड आहे. पाळीव प्राण्यांची आवड आहे. भाग्यवान असल्यामुळे कमी वयातच विवाह, वारसा हक्क किंवा बक्षीसाद्वारे मोठ्या प्रमाणावर पैसा मिळेल. मात्र दैव जन्मभर साथ देईल असे नाही. वृद्धापकाळासाठी लवकरात लवकर योग्य ठिकाणी गुंतवणूक करा.

16 डिसेेंबर –

वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर नेपच्यून, चंद्र, गुरू ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास धनु आहे. नेपच्यून व चंद्र यांच्या युतीमुळे तुम्ही सामर्थ्यवान, प्रबळ, महत्त्वाकांक्षी, आपलेच खरे करण्याची वृत्ती निर्माण झाली आहे. नेपच्यूनचा परिणाम शरीरापेक्षा मनावर जास्त होतो. त्यामुळे विचीत्र स्वप्न, साक्षात्कार, आदेश, निरनिराळे मानसिक परिणाम अंतर्मनाच्या जागृत अवस्थेत होतो. या युतीमुळे कविता, साहित्य, संगीत निर्माण करता येते. गुरुचे अस्तित्त्व नसते तर या कल्पना प्रत्यक्षात उतरल्याच नसत्या. आर्थिक स्थिती इतरांपेक्षा पूर्णपणे वेगळी राहील. सामान्य कामापेक्षा काही तरी निराळे करून पैसा निर्माण कराल. भरवश्याच्या आर्थिक संस्थांमध्येच गुंतवणूक करा.

- Advertisment -

ताज्या बातम्या