सौ. वंदना अनिल दिवाणे

3 डिसेंबर -

वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर सूर्य, गुरू ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य धनु आहे. भाग्यांक 3 असल्याने गुरू ग्रह अतिशय प्रबल झाला आहे. गुरूच्या सामर्थ्याने ज्या कार्यात हात घालाल त्याचे सोने कराल. नेत्याचे गुण नैसर्गिकपणे प्राप्त झाल्याने कोणत्याही क्षेत्रात गेले तरी लोक प्रमुखपद स्वतःहून देतील. त्या पदाची जबाबदारी उत्तमप्रकारे सांभाळून लोकांचा विश्वास खरा करून दाखवाल. धनप्राप्तीची पूर्ण खात्री असूनही आपल्या चांगल्याकाळात वृद्धापकाळासाठी तरतूद करून ठेवणे फार आवश्यक आहे.

4 डिसेंबर -

वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर गुरू, हर्षल, सूर्य या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास धनु आहे. जीवनात अनेक अकल्पित वळणे असतील. शनीचा सावत्र भाऊ असलेला हर्षल जीवनाववर क्रूर छाया कधी पाडेल हे सांगता येत नाही. जीवनात कर्तृत्त्वापेक्षा नशीबाचा भाग जास्त असेल. स्वतंत्रवृत्ती असल्याने दुसर्याच्या हाताखाली काम करणे जड जाईल. आर्थिक बाबतीत कधी फायदा तर कधी तोटा असा चढ उतार सारखा चालू राहील. त्याचा आगाऊ अंदाज कधीच येणार नाही.

5 डिसेेंबर -

वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर गुरू, बुध या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास धनु आहे. सतत कामात असणे याचे जणू काय व्यसनच आहे. एक तर हाताला काही तरी काम असावे किंवा बुद्धी भावी योजनांच आराखडा बनविण्यात मग्न असावे असा तुमचा सारखा उदयोग चालू असतो. अतिशय स्वतंत्रवृत्ती, प्रबल महत्त्वाकांक्षा आणि प्रचंड आशावाद असे तुमच्या जीवनाचे थोडक्यात वर्णन करता येईल. आवडीनिवडी फार पक्क्या असतील. त्यात थोडा जरी बिघाड झाला तरी रागाचा पारा एकदम वर चढेल. लोकांच्या लक्षात येणार नाही अशा प्रकारांची धनप्राप्ती कराल. गुंतवणूकीतून लाभ होतील.

6 डिसेंबर -

वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर शुक्र, गुरू या ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य धनु आहे. शुक्र व गुरू एकत्र आल्याने तुमच्या स्वभावाला वेगळीच मनोरंजक झळाळी आलेली आहे. तुम्ही जेथे जाल तेथे सूर्यप्रकाशासारखे स्वच्छ वातावरण तयार झाल्याने उदासीनता सापडणार नाही. रेल्वे रूळाप्रमाणे एकाच वेळी दोन उद्देशावर प्रगतीची रेल्वे धावत राहील. जाणून बुजून प्रयत्न करो अथवा न करो धनप्राप्ती होणारच. त्यात विवाहाद्वारे अथवा बक्षिसाद्वारे भर पडतच राहील.

7 डिसेंबर -

वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर नेपच्यून, गुरू, चंद्र ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास धनु आहे. नेपच्यून चंद्र व गुरू बरोबर एकत्र आल्यामुळे व्यक्तीमत्व अतिशय प्रभावी झाले आहे. पण त्याबरोबर जीवनात अनेक विरोधाभास निर्माण होण्याची शक्यता आहे. नेपच्यूनमुळे बौद्धिक प्रगती चांगली राहील. आर्थिक निर्णय घेणे सोपे जाईल. आर्थिक प्राप्ती चांगली राहील. गुंतवणूकीच्या बाबतीत सतर्क राहावे.

8 डिसेेंबर -

वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर गुरू, शनि ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास धनु आहे. शनि व गुरूच्या प्रभावामुळे इच्छाशक्ती प्रबळ राहील. सुरूवातीला करिअरमध्ये जीव तोडून मेहनत घ्यावी लागेल. मात्र त्यामुळे तुमचे लक्ष्य प्राप्त होईल. न्यायाधीश,वकील, व्यापारी म्हणून चांगले यश मिळेल. आत्मविश्वास वाढविल्यास आणि थोडी आक्रमक भूमिका घेतल्यास प्रगतीपथावर पुढे जाणे सहज शक्य होईल.

9 डिसेेंबर -

वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर मंगळ, गुरू ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास धनु आहे. फार आशावादी आहात. आपले म्हणणे इतरांनी ऐकलेच पाहिजे. असा आग्रह असतो. संकटाच्या काळात मदतीला लगेच धावून जाता. मनोबल आणि धैर्य अशावेळी जागृत होते. भिती म्हणजे काय हे तुम्हाला माहित नाही. निसर्गाच्या सान्निध्यात रहाणे आवडते. तसेच धाडस करायलाही आवडते. न पाहिलेल्या देशांची सफर करण्याची महत्त्वाकांक्षा आहे. मोठ्या प्रमाणावर उद्योगधंदा करून भरपूर पैसा मिळेल. बौद्धिक कामापासून जास्त धनयोग होण्याचा योग आहे.