Friday, April 26, 2024
Homeभविष्यवेधजन्मतारखेनुसार भविष्य..Future By Date Of Birth

जन्मतारखेनुसार भविष्य..Future By Date Of Birth

किरोच्या नजरेतून – सौ. वंदना अनिल दिवाणे

19 नोव्हेेंबर – वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर सूर्य, हर्षल, मंगळ, ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य वृश्चिक आहे. सूर्याच्या प्रभावामुळे शारिरीक व मानसिक शक्ती चांगली राहील. राजकारणात उल्लेखनीय यश मिळेल. बोलण्यातून विनोदाची पखरण करण्याची सवय असल्याने तुमच्या संपर्कात येणार्‍या व्यक्ती हास्याच्या कारंजांचा आनंद घेतील. मात्र तुमची दुसर्‍यांचे दोष आपल्या तिरकस शैली उघड करण्याचर सवय शत्रु निर्माण करू शकेल. आर्थिक बाबतीत उत्तम यश मिळेल. पैसा मिळवणे अवघड नसले तरी टिकवणे जड जाईल.

- Advertisement -

20 नोव्हेेंबर – वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर चंद्र, नेपच्यून, मंगळ या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास वृश्चिक आहे. कमजोर मंगळ व चंद्र यांच्यात विचित्र मिश्रणाने तुमच्या स्वभावात बराच विरोधाभास निर्माण होईल. मनात नक्की काय आहे हे ओळखणे कठीण आहे नेमके कोणते करिअर करावे याचा निर्णय घेणे जड जाईल. त्यामुळे एका करिअरमध्ये शिरून उत्तम नावलौकीक प्राप्त कराल. विशेष काळजी घेतली नाही तर आर्थिक बाबतीत सतत चिंता वाटत राहील.

21 नोव्हेेंबर – वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर मंगळ, गुरू या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास वृश्चिक आहे. गुरू व मंगळाच्या एकत्रित प्रभावामुळे जीवनात यश मिळवून समाजात महत्त्व प्राप्त करणे कोणत्याही क्षेत्रात सोपे जाईल. आत्मविश्वास दांडगा राहील. त्यामुळे बर्‍याच कौटुंबिक जबाबदार्‍या सांभाळाव्या लागतील. अनेक लोकांचा सांभाळ करणे हे जणू पाचवीलाच पूजलेले असेल. आर्थिक बाबतीत नशीबवान आहात. मातीचे सोने करण्याची क्षमता आहे त्यामुळे कोणत्याही क्षेत्रात उत्तम यश मिळवून श्रीमंत व्हाल.

22 नोव्हेेंबर – वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर मंगळ, हर्शल,रवि ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य वृश्चिक आहे. हर्शल व मंगळ यांच्या एकत्रित प्रभावामुळे जीवनात इतरांच्यापेक्षा काही तरी वेगळे घडत राहील. विशेषतः गूढशास्त्रांचे फार आकर्षण राहील. नावीन्यची हौस असल्यामुळे नवनवीन प्रदेश पाहण्यासाठी बराच प्रवास कराल. मनावर ताबा ठेवण्याची सवय केल्यास संकटांपासून संरक्षण मिळेल. आर्थिक बाबतीत अतिशय सावध राहणे आवश्यक आहे. दुसर्‍याने दिलेल्या आश्वासनावर विसंबून राहू नका.

23 नोव्हेेंबर – वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर बुध, गुरू ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास धनु आहे. बुधाच्या प्रभावामुळे बुदधीमत्तेत विलक्षण सामर्थ्य राहील. व्यवस्थापन कौशल्य सहज आत्मसात करू शकाल. सहकार्‍याची पारख करणे चांगले जमेल. काहीसा संशयी स्वभाव असल्यामुळे सहकार्‍यांवर विश्वास टाकणे अवघड वाटेल. इतरांपेक्षा वेगळ्या मार्गाने धनप्राप्ती होईल. कल्पनाशक्ती, कलेद्वारे धनप्राप्ती होऊ शकेल.

24 नोव्हेेंबर- वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर गुरू, शुक्र ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास धनु आहे. प्रेमातील खाचखळग्यांचा प्रश्न सोडला तर तुमच्या जीवनावर असलेला शुक्राचा व गुरूचा प्रभाव अन्य बाबतीत फायद्याचा राहील. तुमचे व्यक्तीमत्व सर्वांना हवेहवेसे वाटेल. नातेवाईकांना मदतीसाठी वाटेल तो त्याग करण्याची तयारी राहील. आर्थिक बाबतीत नशीबवान आहात. स्वतःच्या निर्णयावर ठाम राहीले पाहिजे. धनसंगग्रहात यश मिळेल.

25 नोव्हेेंबर – वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर नेपच्यून, चंद्र,गुरू ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास धनु आहे. नेपच्यूनचा प्रभाव बुद्धीपेक्षा मनावर जास्त राहील. त्यामुळे भावी घटनांची सुचक स्वप्ने पडतील. त्याचा उपयोग करून घ्या. आपल्या सहकार्‍यांबाबत अति संवेदनशील आहात. भोवतालच्या वातावरणाचा लवकर परिणाम होतो. वारसाहक्काने अन्य प्रकारच्या बक्षिसाद्वारे अर्थप्राप्ती होईल.

- Advertisment -

ताज्या बातम्या