किरोच्या नजरेतून
भविष्यवेध

किरोच्या नजरेतून

20 ते 26 ऑगस्ट या आठवड्यात जन्मलेल्या व्यक्तींचे भविष्य

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

सौ. वंदना अनिल दिवाणे

जन्मतारखेनुसार भविष्य...

20 ते 26 ऑगस्ट या आठवड्यात जन्मलेल्या व्यक्तींचे भविष्य

20 ऑगस्ट - वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर रवि, चंद्र, नेपच्यून या ग्रहांचा प्रभाव राहील. तुमची सूर्य रास सिंह आहे. ग्रहांची चौकट बुद्धीमत्ता धारदार करण्यासाठी चांगली मदत करेल. विचार उच्च दर्जाचे आहेत. त्यामुळे समाजात मान सन्मान मिळेल. अनेक लोकांचा विश्वास संपादन करू शकाल. कोणत्याही प्रकारच्या करिअरमध्ये लवकरात लवकर प्रगती करण्याची संधी मिळेल. कलाक्षेत्र, साहित्य, संगीत, नाटक यामध्ये उत्तम प्रगती. आर्थिक बाबतीत तुम्हाला भाग्याची साथ मिळेल. मात्र तुम्हाला त्याचे म्हणावे असे महत्व पटणार नाही. तरीही अलौकीक मार्गाने पैसा येत राहील.

21 ऑगस्ट - वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर गुरू, रवि, हर्षल, या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य आणि गुरूच्या प्रभावामुळे महत्त्वाकांक्षा फार दांडगी राहील. कितीही यश मिळाले तरी ते कमी वाटल्यामुळे की काय तुम्ही आणखी उंच शिखर गाठण्याचा प्रयत्न कराल. जबाबदारीच्या उच्च पदावर करिअरमध्ये व समाजात पोहोचण्याचा तुमचा आटोकाट प्रयत्न राहील. प्रगतीची वाटचाल करतांना तुम्ही त्यात इतके गुंतून जाल की, स्वास्थ्याकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे. त्याबाबतीत काळजी घ्या. संपत्ती व आर्थिक बाबतीत घेतलेले निर्णय अचूक निघाल्यामुळे श्रीमंत होणे फार जड जाणार नाही. भावी घटनांचा अचूक वेध घेण्याची दैवी शक्ती जन्मतःच प्राप्त झाल्याने व्यापार, उद्योग अथवा आर्थिक उलाढालीत उत्तम यश मिळेल.

22 ऑगस्ट - वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर रवि, हर्षल या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास सिंह आहे. हर्षलच्या प्रभावामुळे तुमच्या वैयक्तिक गुणांचा इतरांवर लवकर व मोठा प्रभाव पडेल. विचार आणि कृतीच्या बाबतीत स्वतंत्र बाणा असल्यामुळे इतरांच्या हाताखाली किंवा निर्देशनाप्रमाणे काम करणे तुम्हाला जड जाईल. कोणत्याही कामाचा प्रमुख म्हणून काम केल्यास जीवनात उत्तम यश मिळेल. कामात इतरांपेक्षा नाविन्य आणि वेगळेपणा असेल मात्र त्यामुळे काही लोकांना तुमचा स्वभाव विचीत्र असल्याचा गैरसमज होण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत तुमच्या योजना,हालचाली व रणनीती इतरांच्या लक्षात येणे कठीण आहे. पैशाचे जास्त आकर्षण नसूनही विपुल प्रमाणात धनप्राप्ती राहील.

23 ऑगस्ट - वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर नेपच्यून, सूर्य, बुध, हर्षल या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास सिंह आहे. बौद्धिक कामासाठी ग्रहांची चौकट फार चांगली आहे. सखोल बुद्धिमत्ता व अचूक निर्णय याच्या जोरावर उत्तम प्रकारे प्रगती करू शकाल. दुसर्‍याच्या मनात तुमच्याविषयी काय चालले आहे हे सहज ओळखता येईल. मात्र स्वभावातील उतावळेपणामुळे कधी कधी नुकसान होण्याची शक्यता आहे. त्याबाबतीत सावधान रहा. आत्मविश्वास दांडगा असल्यामुळे जीवनात यश मिळविणे सहज शक्य होईल. तीक्ष्ण बुद्धीमुळे आर्थिक क्षेत्रात नवनवीन व आकर्षक योजना तयार करून त्यातून भरपूर पैसा मिळवणे सहज शक्य होईल..

24 ऑगस्ट - वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर सूर्य, बुध,शुक्र, हर्षल या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास सिंह आहे. शुक्राच्या प्रभावामुळे तुमची सर्वांशी वागणूक सहानूभूतीपूर्वक राहील. जीवनात प्रेमाला महत्त्च राहील. तुमचे प्रेम आदर्श असेल. सहजपणे कोणाशीही मैत्री कराल. त्यामुळे मित्रसंख्या मोठी राहील. सामाजिक कामाची फार आवड असेल. समारंभ किंवा पार्टी देण्यात फार आनंद वाटेल. मोठ्या प्रमाणावर पैसा मिळवाल. यात मुळीच शंका नाही. निरनिराळ्या वित्तीय संस्थातून गुंतवणूक करून हळुहळु धनी व्हाल.

25 ऑगस्ट - वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर बुध, चंद्र,नेपच्यून, या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रासक कन्या आहे. स्वभाव महत्त्वाकांक्षी राहील. इतरांच्या मनावर अधिराज्य गाजवावे वाटेल. राजकारणी लोकांना हा योग विशेष चांगला आहे. संगीत, गायन, वादन अशा प्रकारच्या कलांवर प्रभुत्व असणार्‍यांनाही हा योग चांगला आहे. तत्वज्ञान व अध्यात्म याची तुम्हाला फार ओढ लागेल. उदार स्वभावामुळे इतरांच्या मदतीला धावून जाल. तुमचे विचार मौलिक असतील. इतरांप्रमाणे पैशांचे आकर्षण मुळीच नाही. तरी इतरांना मदत करता यावी म्हणून तो मिळवण्यासाठी आटोकाट प्रयत्न कराल.

26 ऑगस्ट - वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर हर्षल, शनी, बुध या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास कन्या आहे. ग्रहांची चौकट अशी आहे की, त्यामुळे जीवनात अनेक प्रकारचे विरोधाभास निर्माण होतील. अशा विचीत्र स्वभावामुळे संपर्कात येणारे लोक कसे वागावे याबाबत बुचकळ्यात पडतील. तुमचा स्वभाव वरून कडक वाटला तरी हृदयात करूणा राहील. इच्छाशक्ती प्रबळ आहे. पैशाच्या उलाढालीत अत्यंत सावधान रहाणे आवश्यक आहे. कोणावरही विश्वास नसल्याने लबाडांकडून फसवणूक होण्याची शक्यता कमी आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com