रंग पालटेल आपलं नशीब

रंग पालटेल आपलं नशीब

रंगांचा आपल्या आयुष्यावर खूप प्रभाव पडतो. प्रत्येक रंगाची गुणवत्ता आणि शक्ती वेगळी असते. प्रत्येक ग्रहाचे रंग, प्रत्येक देवी आणि देवतांचा रंग आणि प्रत्येक वस्तूचे देखील आपले वेगळेच रंग असतात. म्हणून रंगाचे महत्त्व समजून घेणे आवश्यक आहे.

1 सूर्य - रंग लाल आणि तांबडा - म्हणजे तांब्याच्या रंगाचा

शक्ती- अग्नीचा भांडार आहे. म्हणजे की हा रंग खूप उर्जावान आणि उत्साही आहे.

गुण - अग्नी, राग, आवेश, विवेक, विद्या आणि भव्य शौर्य हे गुण आहेत.

2 चंद्र- ह्याचा रंग पांढरा आणि पाण्याच्या रंगाचा आहे

शक्ती- मानसिक आनंद, सुख आणि शांतीचे स्वामी.

गुण- थंड, शांत, आईचा लाडका, पूर्वजांचा सेवक, दयाळू आणि सहानुभूती करणारा.

3 मंगळ - रंग लाल आणि रक्ताच्या रंगाचा

शक्ती - पराभूत किंवा मृत्यू देणे.

गुण - सामर्थ्य, आत्मविश्वास, निर्दयी, युद्ध आणि विचारवंत धोरणाने बोलणारा.

4 बुध- रंग हिरवा आणि काळा

शक्ती - वास घेण्याची आणि बोलण्याच्या शक्ती सह मेंदूची शक्ती.

गुण - मैत्री, वक्तृत्व, प्रेमळपणा आणि चापलूस आहेत.

5 गुरु - ह्याचा रंग पिवळा आणि सोनेरी आहे

शक्ती- हकीमी, हवा, आत्मा आणि श्वास घेण्याची आणि मिळविण्याची शक्ती असते.

गुण- मूक आणि शांत आणि गूढ ज्ञानी.

6 शुक्र- ह्याचा रंग पांढरा आणि याच्या समान असणारा रंग

शक्ती -प्रेम, जिव्हाळा, शांती, आणि सुख भोगणे आवडते.

गुण - घर गृहस्थी सांभाळणारा आणि प्रेमळ.

7 शनी - रंग काळा आणि कृष्ण वर्णीय आहे

शक्ती - जादूमंत्र दर्शविण्याची शक्ती.

गुण- गूढ बघण्यात आवड, लक्ष देणारा, हुशार, मूर्ख, गर्विष्ठ आणि कारागीर.

8 राहू- रंग निळा

कल्पना शक्तीचा स्वामी, पूर्वाभास आणि अदृश्य शक्तीला अनुभव करण्याची शक्ती असणारा.

गुण- विचार करण्याचे सामर्थ्य, भीती, शत्रुत्व, चलाख, आळशी, नीच आणि निर्दयी.

9 केतू - रंग काळा-पांढरा

म्हणजे दोन्ही रंग एकत्र आणि कबुतराचा आणि धुर्‍याचा रंग.

शक्ती -ऐकणे, चालणे, दक्षता आणि भेटणे.

गुण- धर्मज्ञानी, मजूर आणि अधिकारी.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com