4 हजार वर्षांपासून उपलब्ध तुरटीचे उपाय

4 हजार वर्षांपासून उपलब्ध तुरटीचे उपाय

तुरटी ही मानवाला किमान चार हजार वर्षांपासून माहिती असल्याचे पुरावे इजिप्तमध्ये आढळले.

तसेच भारतीय गणितज्ज्ञ वराहमिहिर यांच्या लेखनात पाचव्या शतकात रंगबंधक म्हणून तुरटीचा उल्लेख केलेला आहे.

तुरटीत अनेक औषधीय गुण असले, तरी तंत्र शास्त्रानुसार, तुरटीचे काही उपाय आपणासाठी लाभदायक सिद्ध होऊ शकतात.

तुरटीच्या या उपायांमुळे नैराश्य, नकारात्मकता यांसह अनेक समस्यांतून आपणस मुक्ती मिळू शकते, असे सांगितले गेले आहे. जाणून घेऊया...

व्यापार वृद्धीसाठी उपयुक्त -

तंत्रशास्त्रानुसार, व्यापार, व्यवसाय, उद्योग, दुकान, कार्यालय अशा ठिकाणी काही कारणास्तव वारंवार मंदीचा सामना करावा लागत असेल, तर एका काळ्या रंगाच्या वस्त्रात तुरटी ठेवून दुकान, कार्यालय यांच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ वरच्या बाजून बांधावी. असे केल्याने नकारात्मक ऊर्जा हळूहळू नाहीशी होते. निराशेचे मळभ दूर होऊन सकारात्मकतेचा संचार होऊ लागतो. इतकेच नव्हे तर यामुळे व्यापार, व्यवसाय, उद्योगात प्रगती होताना दिसते. तुरटीच्या या उपायामुळे टप्याटप्याने आपल्या सर्व समस्या कमी होऊ लागतात, असे सांगितले जाते.

कलह दूर करण्यासाठी तुरटीचे उपाय -

अनेक कुटुंबामध्ये वारंवार कलह होत असतो. भांडणे वाढत जातात. अशावेळी रात्री झोपताना पलंगाखाली एका भांड्यात पाणी घेऊन त्यात तुरटीचे तुकडे टाकावेत. सकाळी उठल्यावर हे पाणी पिंपळाच्या झाडापाशी ओतून टाकावे. असे केल्याने कुटुंबातील कलहाचे गढूळ वातावरण स्वच्छ होण्यास सुरुवात होते. कुटुंबातील सदस्यांमध्ये सौहार्दपूर्ण नाते निर्माण होते. तसेच एकमेकांमधील नातेसंबंध दृढ होण्यास यामुळे मदत मिळते. सुमारे एक महिन्यापर्यंत हा उपाय करून पाहावा, असे सांगितले जाते. बाथरूममध्ये तुरटीने भरलेली एक वाटी ठेवावी आणि दर महिन्याला ती बदलावी. याने नकारात्मक ऊर्जा दूर राहते.

मुलाखतीत यश मिळण्यासाठी तुरटीचे उपाय -

तंत्रशास्त्रानुसार, नोकरीच्या ठिकाणी मुलाखतीसाठी गेल्यावर उत्तम यश मिळावे, यासाठी तुरटीचा उपाय लाभदायक ठरू शकतो. तुरटीचे पाच तुकडे, सहा निळ्या रंगाची फुले आणि एक कमरेला बांधायचा बेल्ट या सर्व गोष्टी नवमी तिथी असताना देवी मातेला अर्पण कराव्यात. दुसर्‍या दिवशी म्हणजे दशमीला सदर बेल्ट एखाद्या कन्येला द्यावा, फुले वाहत्या पाण्यात विसर्जित करावीत आणि तुरटीचे तुकडे आपल्याजवळ ठेवावेत. हा उपाय केल्यावर नव्या नोकरीसाठीच्या मुलाखतीला जाताना अपक्षित यश वा परिणाम साध्य होण्याच्या शक्यता वाढू शकतात, असे सांगितले जाते.

आर्थित स्थिती सुधारण्यासाठी तुरटी उपयुक्त -

अनेक प्रयत्न करूनही कर्ज फेडण्यासाठी अपेक्षित यश मिळत नाही, अशा वेळी तंत्रशास्त्रात दिलेले तुरटीचे उपाय उपयुक्त ठरू शकतील, असे सांगितले जाते. बुधवारी तुरटीवर शेंदूर टाकावा आणि शेंदुरयुक्त तुरटी विड्याच्या पानात बांधावी. सायंकाळी पिंपळाच्या झाडाखाली ते पान पुरावे. असा उपाय सलग तीन बुधवार करावा, असे तंत्रशास्त्र सांगते. यामुळे आर्थिक स्थितीत हळूहळू सुधारणा होऊन कर्ज फेडीचे प्रयत्न यश देऊ शकतील, असे सांगितले जाते.

मानसिक ताणावर तुरटीचे उपाय -

तंत्रशास्त्रानुसार, तणाव कमी करण्यासाठी आठवड्यातून तीन वेळा पाण्यात तुरटी टाकून आंघोळ करावी. तसेच तुरटी आणि मिठाचे पाणी एकत्र करून घराची स्वच्छता केल्यास वास्तुदोष दूर होतो, असे सांगितले जाते. यामुळे नकारात्मकता दूर होते. घरात नवीन ऊर्जा आणि सकारात्मकतेचा संचार होतो, असे सांगितले जाते. काही जणांना वारंवार दृष्ट लागते. अशा लोकांच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा तुरटी फिरवून दृष्ट का तुरटी फिरवताने ती प्रत्येकवेळी तळव्याला लावावी. यानंतर ती तुरटी आगीत टाकून द्यावी. असे केल्याने वाईट नजरांचा परिणाम नाहीसा ोतो. दृष्ट लागल्यानंतरचा प्रभाव कमी होतो, असे सांगितले जाते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com