Thursday, April 25, 2024
Homeभविष्यवेधरेषांचा खेळ

रेषांचा खेळ

प्रफुुुल्ल कुलकर्णी,ज्योतिषभास्कर, सामुद्रिक मार्तंड – 8888747274

अभिषेक बच्चन यांचा जन्म 5 फेब्रुवारी 1976 रोजी मुंबईत झाला. अभिषेकने मुंबईतील जमनाबाई नरसी स्कूल आणि बॉम्बे स्कॉटिश स्कूल, मॉडर्न स्कूल, वसंत विहार, नवी दिल्ली आणि स्वित्झर्लंडमधील आयगलॉन कॉलेजमध्ये शिक्षण घेतले.

- Advertisement -

त्यानंतर त्यांनी बोस्टन विद्यापीठात शिक्षण घेतले त्यानंतर ते बॉलिवूडमध्ये गेले. अभिषेक यांनी जे. पी. दत्ताच्या युद्ध व रेफ्यूजी या चित्रपटातुन चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. रेफुजी चित्रपटानंतर अभिषेक यांनी चित्रपटाच्या जी कामे केली ती बॉक्स ऑफिसवर ठसा उमटवू शकले नाहीत.

तथापि, सूरज आर. बडजात्या यांच्या रोमँटिक चित्रपटात मैं प्रेम की दिवानी हूं मधील त्याच्या अभिनयामुळे सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी त्यांनी प्रथम नामांकन मिळविले. त्यांनी मणिरत्नमच्या यांच्या युवा चित्रपटातील अभिनयासाठी चा पुरस्कार जिंकला. अ‍ॅक्शन थ्रिलर धूममधे अभिषेकनी हिंदी चित्रपटसृष्टीत नांव कमावले.

अभिषेकचा गुन्हेगारी विषयावर विनोदी ढंगाचा चित्रपट बंटी और बबली प्रदर्शित झाला.हा चित्रपट व 2005 मधील सर्वाधिक कमाई करणारा दुसरा बॉलिवूडपट बनला, बंटी व बबली साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन अभिषेकला मिळाले. या चित्रपटात त्यांचे वडील अमिताभ बच्चन यांच्याबरोबर अभिषेक यांची पहिली व्यावसायिक भागीदारी होती व या चित्रपटात ते पोलीस अधिकार्‍याच्या भूमिकेत होते

अभिषेक बच्चन हे अमिताभ यांचे चिरंजीव असल्याने त्यांच्यावर समीक्षक अमिताभपेक्षा जास्त किंवा त्यांच्या तोडीचा,उंचीचा अभिनयाची अपेक्षा ठेवतात. अभिताभ चंदेरी दुनियेतील एक अजूबा आहेत त्यांच्याबरोबरच अभिषेकाची बरोबरी करणे सर्वथा चूक आहे.

हे मान्य करावे लागेल की, अभिषेक यांना चित्रपटसृष्टीत काम मिळविण्यासाठी झगडावे लागत नाही जितके अभिताभ बच्चन यांना काम मिळण्यासाठी झगडावे लागले. अभिषेक यांनी चित्रपट 2000 साली सृष्टीत पदार्पण केले तेव्हापासून आजपर्यंत अभिषेक यांचे प्रत्येक वर्षी चित्रपट प्रदर्शित होत आहेत.

अभिषेक यांनी काही चित्रपट सुपर डूपर दिले परंतु त्यांच्या एकट्याच्या अभिनयाने सुपर डुपर झालेले चित्रपट एखादा दुसराच असेल. कुठल्याही क्षेत्रात वडील नामवंत असतील तर त्यांच्या मुलांच्या कामगिरीकडे बारकाईने पहिले जाते. त्यांची तुलना न कळत त्यांच्या वडिलांच्या कर्तृत्वाशी केले जाते. मी आधीच म्हटले आहे प्रत्येकाचे नशीब असते. उतुंग यश मिळणं हे नशिबातच असावे लागते. अभिषेक नशिबावनच परंतु त्यांच्या प्रयत्नांना माफक यश मिळत गेले बाकी दिग्गजांपेक्षा रवी ग्रहाची त्यांच्यावर मेहेर नजर नाही.

अभिषेक यांच्या आयुष्य रेषेतून भाग्य रेषेचा उगम होत आहे त्यामुळे ते भाग्यवंतच आहे. अभिषेक यांच्या हातावर खालच्या मंगळ ग्रहावरून तीन आडव्या रेषा अनुक्रमे आयुष्य रेषा मस्तक रेषा यांना छेदून गेलेल्या रेषा पहिली गुरु ग्रहावर गेलेली दुसरी मंगळ मैदानावर गेलेली व तिसरी भाग्य रेषेला सुद्धा छेद देऊन रवी उंचवट्यावर हृदय रेषेत जाऊन थांबलेली आहे.

या तीनही हातावर आडव्या गेलेल्या रेषेमुळे व खालच्या मंगळ ग्रहवरून हाताला आडव्या गेलेल्या रेषांमुळे त्या व्यक्तीच्या अंगात कितीही प्रतिभा असेल तरी तिचे नशीब तिला मागे खेचते. त्या व्यक्तीची कामे सहजासहजी होत नाही. त्याव्यक्ती बरोबर इतर लोक व सहकलाकार कामे करत असतील तर त्यांच्या अंगी हुशारी नसताना सुद्धा त्यांचा चमको होत असतो व हातावर आडव्या असलेल्या रेषामुळे नशीब कायम आडवे येत असते.

हृदय रेषेचा एक फाटा मस्तक रेषेवर जाऊन थांबलेला आहे त्यामुळे असे लोक प्रेमात पडतात त्याप्रमाणे अभिषेक हे सुद्धा ऐश्वर्याच्या प्रेमात पडले होते. हातावरील रवी रेषा उत्तम असल्याने मान सन्मान आहेतच परंतु हातावरील आडव्या रेषा उतुंग यश मिळू देत नाहीत. मस्तक रेषा चंद्र ग्रहावर उतरली आहे त्यामुळे जात्याच कलाकार आहेत प्रतिभा उच्चीचे आहे. अभिनय कौशल्य आहे कल्पना विस्तार मोठा आहे .

हातावरील वयाच्या पस्तीशीनंतर असलेली विवाह रेषा खूपच लांब आहे ती रवी ग्रहापर्यंत गेली आहे, मात्र तिने रवी रेषा छेदलेली नाही. विवाह रेषा लांब व बारीक असता असे लोक आपल्या जोडीदार बरोबर खूप संशयाने वागतात. असे लोक आपल्या जोडीदाराने कोणाशी बोलावे कोणाशी नाही. काय वेष परिधान करावा इत्यादी बारीक सारीक गोष्टीत लक्ष घालतात यांच्या म्हणण्याप्रमाणे यांचा जोडीदार वागला नाही तर हे चिडतात.

विवाह रेषा रवी रेषेला छेदून गेली असती तर घटस्फोट होतो. तसेच विवाह रेषा रवी रेषेला जाऊन मिळाली तर त्या व्यक्तीला त्यांच्या खानदानापेक्षा उच्च व श्रीमंत घराण्यात विवाह होतो, जोडीदार अतिशय देखणा असतो. रवीच्या बोटावर मधल्या पेरावर एक तीळ आहे हा तीळ सुद्धा मान सन्मान व कीर्ती मिळवण्यासाठी अडसर ठरतो. तरीही रवी ग्रह व रवीवरील रेषा उत्तम प्रकारातील आहे त्यामुळे कीर्ती प्रसिद्धी ही मिळणार परंतु मिळणारी कीर्ती नेहमीच त्यांच्या कामाच्या कर्तृत्वापेक्षा कमीच राहणार आहे.

अभिषेक यांच्या हातावरील विवाह रेषा बाक घेऊन रवी रेषेकडे गेली आहे या गोलाईयुक्त विवाह रेषेमुळे या लोकांना आपल्या जोडीदारापेक्षा सर्व आवडी निवडी भिन्न असतात त्यामुळे यांच्यात कायम धूस फूस चालू राहते. अश्या परिस्थितीत जोडीदार किती संयमी यावर वैवाहिक सुख अवलंबून असते. अभिताभ यांच्याही हातावर नशिबाला आडव्या गेलेल्या रेषा आहेत परंतु त्या सलग नाहीत तुटक आहेत त्यांची हातावरील मुख्य रेषा आयुष्य, मस्तक व भाग्य याना एकाच वेळेस त्यांनी छेद दिलेला नाही. ज्या वय वर्षात या हातावरील आडव्या रेषा छेद देतात त्या वय वर्षात संकटे निश्चित येतात.

शारीरिक, मानसिक व आर्थिक नुकसान होत असते. अभिषेक यांच्या हातावरीर आयुष्य रेषा 53 नंतर दुभंगलेली असल्याने त्यांची शारीरिक क्षमता कमी होईल. या दुभंगलेल्या रेषा सुधृड नाहीत त्यामुळे अभिषेक यांना त्यांच्या आरोग्याची काळजी वय वर्ष 53 नंतर घ्यावी लागणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या