भाग्य रेषा अन् लक्ष्मीचा वरदहस्त !

प्रफुुुल्ल कुलकर्णी,ज्योतिषभास्कर – सामुद्रिक मार्तंड 8888747274

आज दिवाळीच्या या सणानिमित्त लक्ष्मी प्रसन्न असलेल्या विविध भाग्य रेषांचे विविध प्रकार पाहणार आहोतव त्यांच्या हातावरील विविध अवस्थेनुसार ूकारकत्व पाहणार आहोत.

भाग्य सदा व सर्वकाळ एक सारखे नसते, भाग्यात लक्ष्मी सुद्धा रुसते, काही काळासाठी लुप्त होते, आर्थिक क्षमता जेम तेम ठेवते, कर्ज बाजरी करते तसेच कायमची प्रसन्न असते, काही वर्षासाठी भरपूर देते, काही वर्ष सामान्य आवक देते.

लक्ष्मी दोन तीन मार्गाने आर्थिक आवक देते, एखादा वेळेस एका बाजूची अवाक स्थिर असते तर दुसर्‍या भाग्य रेषेची जेम तेम अवाक असू शकते. भाग्य रेषा हातावर एक ते सहा या संख्येने सापडतात मणिबंधकडून मधल्या बोटाच्या सानिध्यात जाणार्‍या सगळ्या भाग्य रेषा होत. हि भाग्य रुपी लक्ष्मी रेषा मधल्या शनीच्या बोटाकडे जेव्हडी सरळ व बारीक असेल तेव्हा ती खूपच प्रभावी असते, भरपूर धन देते .

डाव्या व उजव्या हातावरची भाग्य रेषा

हस्त सामुद्रिक शास्त्रा प्रमाणे डाव्या हातावरच्या भाग्य रेषेत बदल होत नाही, मात्र उजव्या हातावरील भाग्य रेषेत मनुष्याच्या कर्तबगारीने, निरंतर प्रयत्न व कष्टाने यश प्राप्त होते व या यशाच्या प्राप्तीने त्या व्यक्तीच्या ज्या वय वर्षात निरंतर प्रयत्न होतात त्या वय वर्ष्यात भाग्य रेषेत बदल होतो. हा बदल सूक्ष्म असतो.

भाग्य रेषा जाड पसरट असेल तर ती बारीक व चमकदार होते. अथवा नवीन भाग्य रेषेचा उगम हातावर दिसू लागतो. व्यक्ती डावखुरी असेल तर तिच्या डाव्या हातावरील भाग्य रेषा कर्माची असते व संचिताचा हात हा उजवा असतो.

डावखुर्‍या व्यक्तीची डाव्या हातावरची भाग्य रेषा तिचे आयुष्यचे आर्थिक गणित सांगते. भाग्यवान व्यक्तींच्या सक्रिय (डावा हात असो वा उजवा) हातावर विधात्याने आधीच जन्मतःच उत्तम भाग्य रेषा दिलेली असते. त्यांना त्यांच्या आयुष्यात आर्थिक तंगी किंवा विवंचना भोगाव्या लागत नाहीत. आर्थिक संपन्नता त्याच्या भाग्यात असते. लक्ष्मी त्यांचेवर कायम प्रसन्न असते.

दोन नंबरचे धंदे करणार्‍या व्यक्तीवर सुद्धा लक्ष्मी प्रसन्न असते. सज्जन, पापभीरु व्यतीच्या हातावर भाग्य रेषा उत्तम प्रकारातील नसेल तर त्याला लक्ष्मी प्रसन्न नसते. लक्ष्मी प्रसन्न असणे हे भाग्यातच असावे लागते. आर्थिक विवंचना व्यक्तीच्या आयुष्यात असल्यास त्याला त्या भोगाव्या लागतात. मात्र निरंतर प्रयत्न व कष्टाने लक्ष्मीला प्रसन्न करता येते.

मणिबंधापासून मधल्या बोटापर्यंत फक्त एकच भाग्य रेषा असेल तर असे लोक खूप भाग्यवान असतात. आयुष्यभर यांना आर्थिक विवंचना नसते. उच्च शिक्षण होते अथवा व्यवसायात पडल्यास भरभराट होते. यांना भाग्य नेहमी साथ देते. राजकीय, धार्मिक गुरु,व्यवसायिक म्हणून हे नेहमी पुढे असतात उच्च पदी कायम राहतात.

आयुष्य रेषेतून भाग्य रेषा उगम पावत असेल तर असे लोक भाग्यवंत असतात. यांना आर्थिक विवंचना असत नाही. कर्ज झाले तरी ते नक्की फिटते.असे लोक कुठल्याही क्षेत्रात यशस्वी होतात, राजकारण, नोकरी व्यापारात हे त्यांचा इतर ग्रहांच्या शुभत्वाने त्या त्या प्रमाणात उंची गाठतात, त्यांच्या प्रत्येक प्रयत्नाला यश येते. यांना अपयश माहित नसते. वाड-वडिलांचा व्यापारव्यवसाय अथवा सहजासहजी नोकरीस लागतात व नाव कमावतात.

भाग्य रेषा मणिबंधापासून थेट मधल्या शनीच्या ग्रहावर गेली आहे, ती अतिशय शुभ आहे. परंतु युवा अवस्थेपर्यंत म्हणजे वयाच्या 5 ते 25 वर्षापर्यंत भाग्य रेषा आयुष्य रेषेच्या समीप आहे. अशावेळी भाग्य रेषा उत्तम असली तरी ती आयुष्य रेषे जवळ जितकी जास्त असेल किंवा आयुष्य रेषेला चिटकून असे पर्यंत आर्थिक घडी उत्तम राहत नाही. हा काळ शिक्षणाचा असू शकतो. या वेळेस पालकांची आर्थिक परिस्थिती नक्कीच खालावलेली असते. भाग्य रेषा आयुष्य रेषेपासून दूर गेल्यावर आर्थिक परिस्थिती सुधारते.

एक नंबरची भाग्य रेषा शनी ग्रहाच्या मधोमध गेली आहे. परंतु ती शेजारच्या मोठ्या भाग्य रेषेपेक्षा तिचा पोत जाड आहे. त्यामुळे तिचे गुण कमी झाले आहेत. अपेक्षेपेक्षा ती जास्त धन देऊ शकत नाही. शेजारील दोन नंबरची भाग्य रेषा बारीक आहे. परंतु ती शनी ग्रहाच्या मोधोमाध नाही. त्यामुळे अपेक्षे इतके धन देणार नाही. दोनही भाग्य रेषा मिळून आर्थिक परिस्थिती उत्तम राहील.

एक नंबरची रवी रेषा आहे व ह्या रवी रेषे मधूनच दोन नंबरच्या भाग्य रेषेचा उगम झालेला आहे. उत्तम रवी रेषेमुळे यश, मान, सन्मान ज्या क्षेत्रात मिळविला आहे, त्या क्षेत्रातून आर्थिक आवक होत आहे. येथे भाग्य रेषा तिरकी शनी ग्रहाकडे गेली असली तरी उत्पन्न रवी रेषेमुळे प्रचंड वाढले आहे.

ह्या चित्रात भाग्य रेषा गुरु ग्रहावर गेली आहे. अश्या परिस्थितीत या मंडळींचे उत्पन्न समाधानकारक असतेच शिवाय त्यांना आर्थिक विवंचना असत नाही. यांचे उत्पन्न सात्विक व चांगल्या मार्गाने येणारे असते. अशी भाग्य रेषा असता हि मंडळी दोन नंबर व फसवणुकीचा व्यवसाय करू शकत नाही. उलट आलेल्या उत्पन्नाचा वाटा सामाजिक व धार्मिक कामासाठी वापरतात.

भाग्य रेषा शनीच्या क्षेत्रात एकूण तीन आहेत, तीनही रेषा तीन वेग वेगळे उत्पन्नाचे मार्ग दाखवितात. यातील शनी ग्रहावर दोन नंबरची भाग्य रेषा मधोमध गेली आहे. शिवाय ती इतर दोन भाग्य रेषेपेक्षा बारीक व जास्त लांबीची आहे. त्यामुळे ती इतर दोन भाग्य रेषेपेक्षा आर्थिक उत्पन्न मोठ्या प्रमाणावर दाखविते. मधल्या भाग्य रेषेपेक्षा उर्वरित एक व तीन नंबर च्या भाग्य रेषेंचा पोत हा जाड आहे. त्यामुळे त्या आर्थिक लाभ कमी देतील.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *