वास्तूशास्त्र : आजाराला मिळतंय आमंत्रण

वास्तूशास्त्र : आजाराला मिळतंय आमंत्रण

तुम्हाला माहित आहे का की, तुमच्याकडे हे वास्तुदोष असतील तर आजार होण्याची शक्यता वाढते. या कोणत्या गोष्टी आहेत ते माहित करून घेऊया

ब्रह्माच्या स्थानी मोकळे अंगण असावे- वास्तुशास्त्रानुसार घराचा मध्य भाग ब्रह्माचे स्थान मानला जातो. जुन्या काळात ब्रह्म्याच्या स्थानी मोकळे अंगण असायचे.

परंतु आजच्या काळात घरे लहान आहेत आणि तिथे अंगण तयार करणे शक्य नाही. जर तुमच्या घरामध्येही मोकळे अंगण नसेल तर घराचा मोकळं भाग उत्तर किंवा पूर्वेकडील बाजूने तयार केला पाहिजे.

तसेच, घराचे ब्रह्म स्थान दबू नये याची काळजी घ्यावी. घराचे ब्रह्म स्थान दबले असेल तर हे रोगांना आमंत्रण देण्यासारखेच आहे.

तसेच, घराच्या मध्य भागात कोणतेही अवजड सामान ठेवू नये याकडेही लक्ष द्या. असे करणे सकारात्मक उर्जेच्या मार्गात अडथळा मानला जातो. घरात सकारात्मक उर्जा नसल्यामुळे घरातील सदस्यांची प्रतिकारशक्ती कमी होऊ लागते.

उत्तर-पूर्व दिशा बंद असेल तर- सगळ्यांच्या घरात उत्तर-पूर्व दिशा मोकळी असणे महत्त्वाचे मानले जाते.

या दिशेला बहुतेक घरात मंदिर असतं आणि ही दिशा देवतांचे स्थान मानल्यामुळे ही दिशा सकारात्मक उर्जेचे भांडार मानली जाते.

म्हणून, ही दिशा चुकूनही बंद करू नका. अन्यथा घरात पैशांची कमतरता जाणवायला सुरवात होईल आणि त्या बरोबरच घरातील सदस्य आजारी पडू लागतील.

दक्षिण दिशा मोकळी असेल तर- दक्षिणेकडील दिशा मोकळी असणे अत्यंत दोषपूर्ण मानले जाते.

ही दिशा यमराजाची दिशा मानली जाते आणि ही दिशा उघडणे म्हणजे घरात नकारात्मक उर्जा प्रवाह वाढविणे होय.

ही दिशा मोकळी ठेवल्याने घरात नकारात्मक उर्जा येते आणि याचा घरातील वृद्ध सदस्यांवर जास्त परिणाम होतो व ते आजारी पडतात. बर्याच वेळा अकाली मृत्यूलादेखील सामोरे जावे लागते.

या वस्तू पलंगाखाली ठेवू नये- जर तुम्ही अनवधानाने घरात पलंगाखाली शूज,चप्पल किंवा इतर जुन्या, तुटलेल्या आणि गंज चढलेल्या वस्तू ठेवत असाल तर तुमची सवय बदला. खरं तर, हे खूप वाईट मानले जाते. कचरा बेडच्या खाली चुकूनही ठेऊ नका ही जागा स्वच्छ ठेवावी.

असा ईशान्य कोन नसावा- घराची ईशान्य दिशा सर्वात सुंदर व चांगली असावी. चुकूनही घरातील ईशान्य कोण कापलेला नसावा.

असं म्हणतात की ईशान्य कोन तुटलेला असल्यामुळे घरात राहणार्‍या लोकांना रक्त विकाराचा त्रास होऊ शकतो.

लैंगिक रोगांसह, याचा प्रजनन क्षमतेवरही प्रतिकूल परिणाम होतो. जर ईशान्य दिशेने उत्तर बाजू अधिक उंच झाली असेल तर त्या घरात स्त्रियांना आरोग्याचा त्रास संभवतो व पूर्वेकडील भाग उंचावल्यास पुरुषांना त्रास होऊ शकतो. त्यामुळे काळजी घ्या.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com