त्रैमासिक भविष्य - मकर Quarterly Future - Capricorn

आर्थिक आवक विपुल प्रमाणात
त्रैमासिक भविष्य - मकर Quarterly Future - Capricorn

सौ. वंदना अनिल दिवाणे

मे - 2021

नवीन वर्षाच्या महिन्याच्या सुरुवातीला राशीच्या स्थानी शनि-प्लुटो, द्वितीयात गुरू- नेपच्यून, चतुर्थात रवि-हर्षल, पंचमात बुध-राहू-शुक्र, षष्ठात मंगळ, लाभात केतू अशी ग्रहस्थिती आहे.

तुमची रास -राशीची आद्याक्षरे भो, जा, जी, खु, खे, खो,गा, गी अशी आहेत. राशीचे चिन्ह मगर आहे. राशी स्वामी शनि, तत्व- पृथ्वी असल्याने सहनशक्ती चांगली आहे. चर रास असल्याने सतत काही तरी बदल हवा असे वाटत रहाते. दक्षिण दिशा फायद्याची आहे. राशीचे लिंग स्त्री असल्याने स्वभाव सौम्य व तमोगुणी, वात प्रकृती, स्थूलपणा टाळण्यासाठी दररोज हलका व्यायाम करा. राशीचा अंमल गुडघ्यावर आहे. काळजी घ्या. शुभ रत्न-निलम, शुभ रंग- निळा, आकाशी, शुभ दिवस-शनिवार, देवता-शनि, शुभ अंक-8, शुभ तारखा- 8,17,26. मित्रराशी- कुंभ, शत्रुराशी - सिंह. उत्तम प्रशासक, कर्तव्यदक्ष, सतत कामात मग्न.

पंचमात शुक्र आहे. सरकार दरबारी वजन वाढेल. कन्यांचे विवाह सुस्थळी होऊन जावई सज्जन मिळतील. गूढशास्त्राचे आकर्षण वाटेल. देवीची उपासना लाभदायक. शत्रुंवर विजय मिळेल. नवविवाहीतांचा भाग्योदय होईल.

स्त्रियांसाठी -नातेवाईक व शेजारी पाजार्‍यांशी संबंध चांगली राहतील. महिलांचा स्वभाव आनंदी व उल्हासी राहील. गायनादी कलात प्रगती होईल. नीटनेटकेपणाने काम केल्याने मानसिक समाधान लाभेल.

विद्यार्थ्यांसाठी - तीक्ष्ण बुध्दीमत्ता व उत्तम स्मरणशक्ती यामुळे अभ्यासात प्रगती होईल. कला शाखेच्या विद्यार्थ्यांना काव्य कल्पनात रस वाटेल. काहींना धाडसी खेळात भाग घेण्याची संधी मिळेल.

शुभ तारखा -1, 3, 4, 5, 13, 14, 15, 16, 17, 18, 20, 21, 22, 26, 28, 30, 31

जून - 2021

महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी शनि-प्लुटो द्वितीयात गुरू- नेपच्यून, चतुर्थात हर्षल, पंचमात रवि-बुध-राहू. षष्ठात शुक्र, सप्तमात मंगळ, लाभात केतू अशी ग्रहस्थिती आहे.

पंचमात बुध आहे. परिस्थितीत एकदम बदल होईल. स्त्री, पुत्र सुख उत्तम राहील. उपासनेमध्ये मन लागेल. त्यामुळे मानसिक शांती मिळेल. लेखक वर्गाला साहित्यसेवा करण्यात यश मिळेल. विद्याव्यासंगात वृद्धी होईल. गूढशास्त्रांची आवड वाटेल. आर्थिक आवक वाढेल. धनसंग्रह होईल. पंचमात रवि आहेे. चंचल बुद्धीमुळे प्रवासाला निघावेसे वाठेल. विद्याभ्यासात चंचल बुद्धीमुळे खंड पडेल. काहीही करून पैसा मिळवलाच पाहिजे. अशी मनाला ओढ लागेल. त्यासाठी शेअर्स, व्यापार बिनभरवश्याच्या बँकेत गुंतवणूक अशाप्रकारचे व्यवहार कराल. काहींना त्यातून पैसा मिळेलही परंतू असे व्यवहार जपून करा. विनाकारण विषाची परीक्षा घेणे तोट्याचे ठरेल.

धनस्थानी नेपच्यून आहे. हा नेपच्यून धनप्राप्तीसाठी नवनवीन कल्पनांचे भांडार तुमच्यापुढे उघडे करील. अन्य जनांचे लक्षही जाणार नाही. अशा कल्पना सुचतील. त्या कृतीत आणल्याने उद्योगधंदे ललितकला, कथालेखन, वक्तृत्त्च यापासून धनलाभ लोईल. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.

स्त्रियांसाठी - महिलांना पतीराजांचे उत्तम सहकार्य मिळेल. मात्र कलह टाळण्यासाठी नम्रतेचे पथ्य पाळणे जास्त चातुर्याचे ठरेल. उत्साह चांगला राहील. कलाकौशल्यात प्रगती होऊ शकेल.

विद्यार्थ्यांसाठी - विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या दृष्टीने चांगला काळ आहे. एकाग्रता साध्य होईल. परीक्षेच्या दृष्टीने त्याचा चांगला उपयोग होईल. खेळ व टी.व्ही.कडे दुर्लक्ष करा. भविष्याच्या दृष्टीने फायद्याचे राहील.

शुभ तारखा - 2, 3, 6, 12, 13, 15, 16, 17, 19, 20, 22, 25, 28, 29

जुलै - 2021

महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी शनि-प्लुटो, द्वितीयात गुरू - नेपच्यून, चतुर्थात हर्षल, पंचमात बुध-राहू, षष्ठात रवि, सप्तमात मंगळ-शुक्र, लाभात केतू अशी ग्रहस्थिती आहे.

धनस्थाी गुरू आहे. द्वितीय स्थानातील गुरूमुळे विद्वत्तेबद्दल नावलौकीक होईल. अभ्यास केल्यास वक्तृत्त्वात विशेष यश मिळेल. केवळ शब्दाने लोकांवर हुकूमत गाजविता येईल. राजकारणी लोकांना याचा विशेष फायदा होईल. आर्थिक आवक विपुल प्रमाणात राहील. सुग्रास भोजन प्राप्त होईल. द्वितीयात गुुरु असणे हा भाग्यवृद्धीचा एक स्वतंत्र योग आहे. नेहमी आनंदी वृत्ती राहील. उद्योगशीततेत वृद्धी राहील. स्वप्रयत्नाने धनप्राप्ती होईल.

लग्नी शनी आहे. तीक्ष्ण बुद्धीमुळे अभ्यासू वृत्ती राहील. उद्योगशीलतेत वृद्धी होईल. हिशेबीपणामुळे धनसंग्रह करणे तर जमेलच शिवाय नियमीत बचत करणे सोेपे जाईल. प्रमाणिकपणामुळे नोकरीत उन्नती होईल. भाविकपणामुळे जनमानसात चांगली छवी राहील. स्वमत हट्टाचा जास्त आग्रह करू नये.

पंचमात राहू आहे. संततीपासून सौख्य मिळणे कलीयुगात कठीण आहे तुमच्या बाबतीत याचा विशेष अनुभव येण्याची शक्यता आहे. स्त्री वर्गाला स्वास्थ हानी होऊन काही ना काही विकारांना तोंड द्यावे लागेल. विद्यार्थ्यांना विद्येत अडथळे येण्याचा विचीत्र अनुभव येईल.

स्त्रियांसाठी - महिलांचा स्वभाव प्रेमळ राहील. कोणत्याही गोष्टीवर सहज विश्वास ठेवण्याची वृत्ती राहील. हे मात्र धोक्याचे राहील. सोने म्हणून पितळ हाती लागण्याचा संभव आहे.

विद्यार्थ्यांसाठी - विद्यार्थ्यांना अभ्यासात एकाग्रता साध्य होईल. आळस टाळावा. गेलेलेा वेळ परत येणार नाही.

शुभ तारखा - 1, 2, 3, 11, 12, 16, 18, 21, 25, 27, 28, 29

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com