Friday, April 26, 2024
Homeभविष्यवेधआयुर्वेद : जीवनाचे विज्ञान

आयुर्वेद : जीवनाचे विज्ञान

आयुर्वेद या शब्दाचा उगम आयुर ह्या शब्दातून झाला आहे ज्याचा अर्थ आहे जीवनकाल. तर आयुर्वेद हा संपूर्ण आयुष्याचा कालखंड कसा सांभाळावा याचे विज्ञान आहे. आयुर्वेद हे जीवनाच्या एका वेगळ्याच पैलूतून निर्माण केलं गेलं आहे आणि आयुष्याच्या एका वेगळ्या समजुतीतून त्याची रचना केली गेली आहे. आयुर्वेद प्रणालीत शरीराबद्दल मुख्य समजूत अशी आहे की, हे शरीर ते आज जसे आहे तो केवळ पृथ्वीवरील पाच तत्वांचा संग्रह आहे.

पृथ्वीचे स्वरूप आणि पृथ्वीचाच भाग असलेली पंचमहाभूते यांचे स्वरूप. हे मानवी शरिरात प्रकट आहे. मुलभूतपणे हे संपूर्ण शरीर म्हणजे पंचमहाभूतांचा खेळ आहे. मग ते व्यक्तिगत मानवी शरीर असो किंवा वैश्विक शरीर, मुख्यतः हे पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांनी किंवा पाच घटकांनी बनले आहे. ज्याला तुम्ही मी असे म्हणता ती या पाच घटकांची चेष्टा आहे. जर तुम्हाला तुमचे शरीर अशा पद्धतीने हाताळायचे आहे की जेणेकरून तुमच्या आयुष्याने तुमच्यासाठी सर्वोत्तम फलप्राप्ती करावी. जे मुख्यतः काळ आणि उर्जेचे संयोजन आहे. तर हे महत्त्वाचे आहे की तुम्ही करणार्‍या प्रत्येक गोष्टीचं या पृथ्वीशी नातं आहे जिच्यावर तुम्ही चालत फिरत आहात.

- Advertisement -

आयुर्वेद असं म्हणतो की प्रत्येक मूळ, प्रत्येक पान आणि झाडाची साल या सर्व गोष्टी औषधी आहेत. आपण फक्त थोडक्याच गोष्टी कशा वापरायच्या हे शिकलो आहे. बाकीच्या गोष्टी कशा वापरायच्या हे अजून आपल्याला शिकायचे आहे. या वाक्याचा अर्थ असा आहे की आरोग्य ही काही आकाशातून पडणारी गोष्ट नाही. आरोग्य हे तुमच्या आतून वाढीस लागलं पाहिजे, कारण शरिराची वाढ ही तुमच्या आतूनच होत असते. जरी त्याला लागणारी पोषण सामुग्री पृथ्वीतून येत असली तरी शरीराची वाढ होते ती तुमच्या आतूनच. आयुर्वेदाचं सार असं आहे की, जेव्हा आपण खोलवर जाऊन शरीराकडे पाहिलं तर असं लक्षात येईल की शरीर ही काही एकसंध गोष्ट नाही, ती एक अखंड, अविरतपणे चालणारी प्रक्रिया आहे ज्यात ही पृथ्वी सुद्धा सामील आहे ज्यावर तुम्ही चालता.

जर हा संबंध व्यवस्थित प्रस्थापित झाला नसेल तर या सूक्ष्म उपचार पद्धती, ज्या आतून कार्य करतात; त्या निष्फळ ठरतील. संपूर्ण प्रणालीचा विचार न करता केवळ एखादाच पैलू हाताळणे हे फारसे फलद्रुप ठरणार नाही. होलिस्टिक सिस्टीम अर्थात परिपूर्ण प्रणाली म्हणजे शरीराला एक संपूर्ण एकक म्हणून संबोधणे नव्हे. परिपूर्ण प्रणाली याचा अर्थ अवघ्या जीवनाला संपूर्ण मानणे ज्यात पृथ्वी, आपला श्वास, आपण काय खातो, काय पितो या सगळ्यांचा त्यात समावेश आहे. या सगळ्या गोष्टी हिशेबात घेतल्याशिवाय आयुर्वेदाचे खरे लाभ दिसून येणार नाहीत. जर आयुर्वेद आपल्या आयुष्यात आणि समाजात एक जिवंत वास्तविकता बनली तर माणसे देवासारखी जगू लागतील.

(जागतिक पातळीवर नावाजलेले द्रष्टे योगी, आत्मज्ञानी आणि प्रसिद्ध लेखक असा लौकिक असलेले सद्गुरु हे भारतातील पहिल्या 50 प्रभावशाली व्यक्तींपैकी एक आहेत. सद्गुरूंना भारत सरकारने 2017 मध्ये ‘पद्मविभूषण’ पुरस्काराने गौरविले आहे.)

- Advertisment -

ताज्या बातम्या