Monday, April 29, 2024
Homeभविष्यवेधसंगणकाचे जग बदलणारा अवलिया!

संगणकाचे जग बदलणारा अवलिया!

बिल गेट्स यांचा जन्म 28 ऑक्टोबर 1955 रोजी सिएटल, वॉशिंग्टन येथे झाला. विल्यम एच. गेट्स सीनियर बी आणि मेरी मॅक्सवेल गेट्स यांचे ते सुपूत्र. त्यांचे वडील एक प्रख्यात वकील होते आणि आईने फर्स्ट इंटरस्टेट बँक सिस्टम आणि युनायटेड वे ऑफ अमेरिकेच्या संचालक मंडळावर काम केले. आजोबा जे.डब्ल्यू. मॅक्सवेल राष्ट्रीय बँकेचे अध्यक्ष होते. क्रिस्टिअन आणि लिबी या त्यांच्या दोन बहिणी.

प्रफुुुल्ल कुलकर्णी

बिल गेट्स एक अमेरिकन व्यवसायिक, सॉफ्टवेअर डेव्हलपर, गुंतवणूकदार, लेखक आहेत. बिल गेट्स यांनी बालपणीचा मित्र पॉल ऍलन यांच्यासह मायक्रोसॉफ्टची स्थापना केली. मायक्रोसॉफ्टमधील त्यांच्या कारकिर्दीत, गेट्स यांनी अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आणि मुख्य सॉफ्टवेअर आर्किटेक्ट या पदांवर काम केले आहे.

- Advertisement -

मे 2014 पर्यंत मायक्रोसॉफ्टमधील ते सर्वात मोठे वैयक्तिक भागधारक होते. बिल गेट्स हे 1970 आणि 1980 च्या दशकातील कॉम्प्युटर क्रांतीतील सर्वात प्रसिद्ध उद्योजकांपैकी एक मानले जातात. मानव जातीच्या उत्क्रांतीसाठी व भल्यासाठी मनुष्यलोकी काही अवलिया जन्म घेत असतात यांच्या कार्याने जगाचे भले होत असते व त्यापैकी एक असलेल्या संगणकाची सॉफ्टवेअर प्रणाली बनविणारे मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स होय. शालेय विद्यार्थी दशेपासूनच संगणक प्रणाली बनविण्यासाठी त्यांनी अथक मेहनत घेतली. आज मानव जातीच्या कल्याणासाठी व नवीन उत्क्रातींच्या दिशेने 21 व्या शतकात भरारी घेताना संगणकाविना जग ही कल्पनाच कोणी करू शकत नाही. संगणकामुळे मानवाचे काम खूप सुलभ व जलद झाले आहे.

अब्जाधीश व मायक्रोसॉफ्ट कंपनीचे संस्थापक, मानव कल्याणासाठी अब्जावधी रुपयांचा देणगी देणारे बिल गेट्स हे नाव जगात प्रसिद्ध आहे. त्यांच्या हातावरील रेषा, ग्रह कसे असतील, त्यांच्याकडे असलेली अमाप संपत्ती, असामान्य विद्वता, त्यांची व्यावहारिक हुशारी व दानशूरपणा व मानवी उन्नतीसाठी त्यांच्याकडून होत असलेले प्रयत्न हे त्यांच्या हातावर प्रतिबिंबित असतील का? हस्तरेखाशास्त्राप्रमाणे बिल गेट्स यांच्या हातावरील रेषा समूह व ग्रहांची साथ, हाताचा, बोटांचा व अंगठ्याचा आकार विशेषतः उजव्या हाताचा, कारण उजवा हात हा त्यांचा सक्रिय हात आहे व तोच त्यांच्या कर्माचा आहे. असामान्य हुशारी, जगातला अतिश्रीमंत, बुद्धिवान, संशोधक, व्यवहारी, दयाळू, मानव जातीचा कनवाळू आदी अनेक पैलू त्यांच्यात आहेत. या असामान्य व्यक्तिमत्वातील पैलूंचा हस्तसामुद्रिकदृष्ट्या अभ्यास करून वाचकांसाठी देण्याचा प्रयत्न आहे.

हातावरच्या असामान्य रेषा- हस्तसामुद्रिकदृष्ट्या तळहातावरील रेषांचा अभ्यास करताना व त्यांचे कारकत्व पाहताना त्यांचा उगम व शेवट,कुठल्या ग्रहावरून उगम व कुठल्या ग्रहावर समाप्ती, हातावरील रेषांचा प्रवास हा अत्यंत महत्वाचा असतो. प्रत्येक रेषा व ग्रह यांचे स्वतंत्र कारकत्व असते. रेषा किती भाग्यशाली हे रेषांच्या पोतावरून ठरवावे लागते. हातावरील रेषांचा पोत व आकार हा हातावरील रेषा बारीक, थोड्याश्या खोल, चमकदार व हाताच्या रंगापेक्ष्या थोड्या गडद असाव्यात. रेषांचा उगम व शेवट हा शास्त्राच्या नियमाप्रमाणे असावा लागतो. मुख्य रेषेव्यतिरिक्त हातावरील प्रभाव रेषा त्या व्यक्तीच्या भाग्याला आडव्या येणार्‍या नसाव्यात. बिलगेट्स यांच्या हातावर त्यांच्या नशिबाला आडव्या येणार्‍या रेषा नाहीत हे त्यांचे भाग्यच होय.

शुक्र, बुध व रवी ग्रहाची युती – बिल गेट्स यांच्या तळहाताकडे बघितले कि आधी लक्ष जाते ते शुक्र ग्रहावरून आयुष्य रेषेला छेद देऊन बुध व रवि ग्रहाच्या बोटांच्या पेर्‍यामध्ये जाऊन थांबलेली रेषा. शुक्र, बुध व रवी ग्रहाची युती अफलातून आहे शुक्र – ऐश्वर्य , बुध ग्रह हुशारी व व्यावहारिकपणा व रवी ग्रह जागतिक मान सन्मान व कीर्ती देत आहे. शरद पवार यांच्या हातावर अश्याच प्रकारच्या रेषेचा संगम आहे व तो शुक्र व बुध युतीचा आहे. त्यामुळेच त्यांचेकडे ऐश्वर्य व कुशाग्र बुद्धिमत्ता आहे. जागतिक कीर्ती बिल गेट्स यांच्या एवढी नाही कारण त्यांच्या या रेषेच्या युतीमधे रवी ग्रह नाही.

बुध रेषेतून भाग्यरेषा व स्वतंत्र रवि ग्रहावर जाणार्‍या रेषेचा उगम

बुध रेषेतून भाग्यरेषा व स्वतंत्र रवि ग्रहावर जाणार्‍या रेषेचा उगम हा सुद्धा आजपर्यंत कधी न पाहिलेला संगम आहे. जी बुध रेषा शुक्र ग्रहावरून आयुष्य रेषेला छेद देऊन रवि व बुध ग्रहाच्या दोन बोटांच्यामध्ये पेर्‍यात जाऊन थांबत आहे. त्याच बुध रेषेतून भाग्य रेषेचा व भाग्य रेषेतुन रवी ग्रहावर जाणार्‍या रेषेचा उगम होत आहे. रवि ग्रहावर स्वतंत्र रवी रेषेचा उगम हा भाग्य रेषेतून बिल गेट्स यांच्या वय वर्ष 45 पासून आहे. त्यामुळे त्यांचा जागतिक प्रवास वयाच्या 45 वर्षापासूनच चालू झाला. त्याच वेळेस शक्तिशाली विंडोज ही सॉफ्टवेअर प्रणाली सामान्य जनतेसाठी खुली केली. याचा उपयोग जगातील सर्व उद्योग जगतात व सर्व व्यवहारात होऊ लागला व याच सुमारास बिल गेट्स शक्तीशाली संगणक प्रणालीचे स्वयंभू निर्माते बनले.

हातावरील रेषा कधीच खोटे भाकीत अथवा भाग्य दाखवीत नाहीत हे बिलगेट्स यांच्या शुक्र, बुध, रवी व शनी ग्रहावर गेलेल्या भाग्य रेषेने दर्शविले आहे व शनी ग्रहाची साथ मिळाली आहे. म्हणजेच या चार ग्रहांच्या अति उच्च व भाग्यशाली असलेल्या युतीने बिल गेट्स यांच्यावर मेहेरबानी केली आहे. अश्या प्रकारची रेषांची-ग्रहांची युती व त्यांची मिळणारी शुभदायी फलप्राप्ती मी तरी आयुष्यात पहिल्या प्रथम बिल गेट्स यांच्या हातावर पाहिली आहे.

कुठल्याही रेषेचा फाटा जर बोटांच्या पेर्‍यात जाऊन थांबत असेल तर अशा व्यक्तीवर त्या ग्रहाचा अंमल मोठा असतो. जसे की रवी रेषा किंवा रवी रेषेचा फाटा तिसर्‍या बोटाच्या पेर्‍यात जाऊन थांबला असेल तर अशी व्यक्ती स्वतःचा मोठेपणा दाखविण्यासाठी कर्ज काढून मोठेपणा मिरवीत असते. त्याचप्रमाणे गुरु बोटापर्यंत भाग्य रेषा जाऊन पोहोचली कि व्यक्ती आपल्या जवळची सर्व माया, संपत्ती दान-धर्मात लावते.

बिल गेट्स यांच्या एक भाग्य रेषेचा तुकडा गुरूच्या बोटाच्या पेर्‍यात जाऊन थांबल्याने त्यांनी त्यांची सर्व संपत्ती दानधर्मासाठी देऊ केली आहे. त्यांच्या हातावरील करंगळी खाली असलेल्या हृदय रेषा व मस्तक रेषेच्या दरम्यान हाताच्या कडेला असलेला वरचा मंगळ ग्रह अति फुगीर आहे. कुठलाही ग्रह अति उभार घेतलेला अथवा फुगीर असता त्यात न्यूनता येते. वरचा मंगळ ग्रह हा सारासार विचार करणारा, नियोजनाप्रमाणे विचारपूर्वक शांततेने विचार करणारा व त्याप्रमाणे कृती करणारा हा ग्रह आहे. परंतु तो अति फुगीर झाल्याने मागचा पुढचा विचार न करता निर्णय करण्याची बिल गेट्स यांच्यात प्रवृत्ती आहे.

बिलगेट्स यांच्या हातावरील चंद्र ग्रह अति शुभदायी आहे. मस्तक रेषा दोन फाट्याने चंद्र ग्रहावर उतरली आहे, त्यामुळे ते विद्वान आहेत. विद्यार्थी दशेत असताना त्यांनी संगणक प्रणाली तयार केली. मात्र त्यातून बिलगेट्स यांना पैसे मिळत नव्हते. या सांगणक प्रणालीला एक दिवस नक्कीच पेटंट मिळू शकते, त्यातून पैसा मिळू शकतो, याची त्यांना खात्री होती. बिल गेट्स यांना संगणक प्रणालीसाठी पेटंट व पैसे मिळाले तेव्हा ते 25 वर्षांचे होते. त्यांच्या हातावरील चंद्र शुभ कारकत्वाचा असल्याने कल्पना शक्तीचे प्रचंड भांडार आहे. या कल्पना शक्तीच्या जोरावर आज ते जगातील श्रीमंत व्यक्ती आहेत.

त्यांच्या हातावरील अंगठा मजबूत आहे. त्यावरील दोनही पेरे मोठी व स्वच्छ आहेत. त्यामुळे त्यांना येणार्‍या कल्पना विनाआळस ते लगेचच सत्यात उतरवितात. आयुष्य रेषे सोबत मंगळ रेषेची साथ आहे.त्यामुळे अधिकची ऊर्जा व उत्साह आहे. हि अधिकची ऊर्जा अठरा-अठरा तास त्यांना संगणक प्रणाली बनवितानाची कामास आली आहे. त्यांच्या पहिल्या बोटांवरच्या पेर्‍यावर मध्यभागी फोड आल्यासारखा फुगीर भाग आहे. या उभाराने त्यांना अति संवेदनशील बनविले आहे. मानव जात व त्यांच्या उन्नतीसाठी त्यांचे अविरत प्रयत्न चालू आहेत. त्यात विशेतः जागतिक ऊर्जा, पर्यावरण, खाद्यान्न यासाठी ते आपल्या संपत्तीतून सध्या प्रचंड खर्च करीत आहेत.

बिल गेट्स यांच्या हातावरची हृदय रेषा त्यांच्या वय वर्ष 80 चे दरम्यान नाजूक झाली आहे. त्यामुळे या वय वर्षात त्यांना गंडांतर योग् आहेत. बिल गेट्स सारख्या मानवी कल्याणासाठी लढणार्‍या उद्योग जगतातील नेतृत्वास आयुष्यमान योग लाभो ही प्रार्थना!

ज्योतिषभास्कर, सामुद्रिक मार्तंड

8888747274

- Advertisment -

ताज्या बातम्या