मंगलकारी त्रिपुरारी पौर्णिमा

मंगलकारी त्रिपुरारी पौर्णिमा

त्रिपुरारी पौर्णिमेला पुराणात अतिशय महत्व आहे. या संदर्भात असे म्हटले जाते की, त्रिपुरा पौर्णिमेचा आदला दिवस म्हणजे कार्तिक चतुर्थी ही वैकुंठ चतुर्थी म्हणून साजरी केली जाते. चार्तुमासामध्ये भगवान विष्णू आराम करत असल्याने ते सगळा भार हा शंकर भगवानकडे सोपवतात. म्हणून की काय याच्या दुसर्‍या दिवशी शंकराकडे सगळा भार आल्यामुळे त्रिपुरारी पौर्णिमा साजरी केली जाते.

कार्तिक शुद्ध पौर्णिमेला हिंदूची दोन पवित्र तत्वे म्हणजे शिव आणि विष्णू यांची भेट होते. म्हणून घरोघऱी दिवेलावणी केली जाते. घरी रांगोळया काढल्या जातात. महाराष्ट्रातील मंदिरामध्ये या दिवशी दिवे लावले जातात. या दिवशी देवदिवाळी साजरी केली जाते. अनेक जण या दिवसाला देव दिवाळी म्हणतात. या दिवशी पुन्हा एकदा घराबाहेर रांगोळी काढली जाते. दिवे लावले जातात. फटाके देखील फोडले जातात. चांगले ते रुजावे आणि वाईटाचा नाश व्हावा, हाच खरा त्रिपुरारी पौर्णिमेचा उद्देश असतो. कार्तिक स्वामींचे दर्शन घेणे या दिवशी फारच शुभ असते. त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजे काय हे जाणून घेतले तरी देखील याची त्रिपुरारी पौर्णिमेची संपूर्ण माहितीे जाणून घेणे गरजेचे आहे.

पहाटे उठून पाण्यात गंगाजल घालून स्नान करावे. पूर्वीच्या काळी नदीत आंघोळ केली जात असे. पण सध्या तसे करणे शक्य नसल्यामुळे गंगाजल घालून घरी स्नान करावे. या दिवशी लक्ष्मी नारायणाचे पूजन केले जाते. त्यामुळे लक्ष्मी- नारायणाची षोडशोपचार पूजा करावी. देवासमोर तूपाचा दिवा लावावा. या दिवशी सत्यनारायणाची पूजा करणे शुभ मानले जाते. त्यामुळे देवासमोर सत्यनारायणाची कथा वाचावी. देवाला गोडाचा नैवेद्य दाखवावा आणि आरती करावी. तुळशीचे पूजन आणि आरती करावी. संध्याकाळी घराबाहेर दिवे लावावे. शिवाय या दिवशी दीपदान करावे. दीपदानाचे या दिवशी खास महत्व आहे.

त्रिपुरासूर नावाचा एक राक्षस होता. त्याने ब्रम्हदेवाचे खडतर असे तप केले. ब्रम्हदेव प्रसन्न झाल्यानंतर त्याने त्यांच्याकडून असा आशीर्वाद मागितला की, मला या पुढे कोणाचेही भय राहणार नाही. पण हा आशीर्वाद मिळाल्यानंतर तो फारच उन्मत्त झाला. तो देवांनाही त्रास देऊ लागला. त्रिपुरासुराचा वध करायचे देवांनी ठरवले. पण त्रिपुरासुराची तटबंदी ही अभेद्य होती. त्यामुळे त्यांना त्रिपुरासुराचा वध करता येत नव्हता. अखेर सगळ्यांनी शंकर देवाला बोलावणी केली. तेव्हा शंकरांनी तिन्ही नगरे जाळून त्रिपुरासुराचा वध केला. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी हा वध झाल्यामुळेच हा दिवस मोठ्या आनंदात साजरा केला जातो. त्या दिवशी घराबाहेर सगळ्यांनी दिवे लावून आपला आनंद व्यक्त केला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com