कोणतेही काम करण्यापूर्वी स्वत:ला हे 3 प्रश्न विचारावे

कोणतेही काम करण्यापूर्वी स्वत:ला हे 3 प्रश्न विचारावे

चाणक्य (Chanakya) महान विद्वान होते. ते कौटिल्य (Kautilya) आणि विष्णुगुप्त नावांनीही ओळखले जातात. त्यांनी रचलेला अर्थशास्त्र नावाचा ग्रंथ राजकारण, अर्थशास्त्र, कृषी व सामाजिक धोरणावरचा एक महान ग्रंथ आहे.

- कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी स्वत:ला हे तीन प्रश्न विचारावेत.

- मी जे काम करत आहे, त्याचे परिणाम काय होऊ शकतात आणि मी यात यशस्वी होऊ शकतो का? जेव्हा सकारात्मक उत्तर येईल तेव्हाच पुढे जा.

- तुम्ही जे काही करणार आहात, त्याचे मनसुबे कुणासमोर मांडू नका, ते गुपितच ठेवा आणि हे काम पूर्ण करण्यावर स्थिर राहा.

- शिक्षण सर्वात उत्तम मित्र आहे. एक शिक्षित व्यक्ती प्रत्येक ठिकाणी सन्मानास पात्र होतो.

- जेव्हा केव्हा भीती तुमच्याजवळ येण्याचा प्रयत्न करेल, तेव्हा तिला जागीच गाडून टाका.

- व्यक्ती आपल्या जन्मापासून नाही तर आपल्या कार्यातून महान बनते.

- सुरूवातीची पाच वर्षे आपल्या मुलाला प्रेमाने सांभाळा, त्यापुढील पाच वर्षे रागवून व तो वयात आल्यावर, 16 वर्षांचा झाल्यावर त्याच्याशी मित्राप्रमाणे राहावे. तुमची वयात आलेली मुलेच तुमचे चांगले मित्र असतात.

- सर्व दु:खांचे मूळ कारण ओढ आहे, त्यासाठी ही ओढ सोडली तर सुखी रहाल.

- दुसर्‍यांच्या चुकांतून शिका कारण प्रत्येक प्रयोग स्वत:वर करून पाहाल, तर आयुष्य कमी पडेल.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com