चंद्र ग्रहाच्या शुभ अधिपत्यात मधुर आवाजाची देणगी !

भविष्य आपल्या हाती
चंद्र ग्रहाच्या शुभ अधिपत्यात मधुर आवाजाची देणगी !

प्रफुुुल्ल कुलकर्णी ,ज्योतिषभास्कर, सामुद्रिक मार्तंड-8888747274

आशा भोसले यांचा जन्म मंगेशकर मंगेशकर कुटुंबात 8 सप्टेंबर 1933 रोजी झाला त्यांचे आयुष्य पार्श्वगायिक म्हणून प्रसिद्ध आहे. त्यांची कारकीर्द 1942 मध्ये सुरू झाली होती आणि सात दशकांपेक्षा जास्त काळानंतरही त्या हिंदी चित्रपटसृष्टीत पार्श्वगायनासाठी परिचित आहे.

त्यांनी एक हजाराहून अधिक चित्रपटांसाठी पार्श्वगायन केले आहे. याव्यतिरिक्त त्यांनी अनेक स्वतंत्र अल्बम रेकॉर्ड केले आहेत. भारतच नव्हे तर विदेशात असंख्य मैफिलींमध्ये भाग घेतला आहे. 2006 मध्ये आशा भोसले यांनी असे सांगितले की त्यांनी 12 हजारपेक्षा अधिक गाणी गायली आहेत.

2011 मध्ये आशा भोसले यांना गीनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने संगीत इतिहासातील सर्वाधिक गाणी रेकॉर्डसाठी एक गायिका कलाकार म्हणून म्हणून गौरव केला.

भारत सरकारने आशा भोसले यांना सन 2000 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार आणि 2008 मध्ये पद्मविभूषण देऊन सन्मानित केले. भोसले पार्श्वगायिका लता मंगेशकर यांची बहीण असून प्रख्यात मंगेशकर कुटुंबातील आहेत. त्यांनी विविध ढंगांची गाणी गायली.

यात चित्रपटात चित्रपट संगीत, पॉप, गझल, भजन, पारंपारिक भारतीय शास्त्रीय संगीत, लोकगीते, कव्वाली अशा प्रकारांचा समावेश आहे. हिंदी व्यतिरिक्त त्यांनी 20 पेक्षा जास्त भारतीय आणि विदेशी भाषांमध्ये गाणी गायली. 2013 मध्ये अशा भोंसले यांनी माई या चित्रपटामधून अभिनेत्री म्हणून पदार्पण केले आणि त्यांचा चित्रपटातील अभिनयाबद्दल कौतुक झाले.

मंगेशकर कुटुंब पुण्याहून कोल्हापूर आणि त्यानंतर मुंबईत गेले. आशा व त्यांची मोठी बहीण लता मंगेशकर यांनी आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी चित्रपटांमध्ये गाणे व अभिनय करण्यास सुरवात केली. आशा यांनी मराठी चित्रपटासाठी पहिलं गीत ‘चला नव बाला’ हे 1933 साली ध्वनीमुद्रित केले. या चित्रपटाला संगीतकार दत्ता डावजेकर यांनी संगीत दिले होते.

हंसराज बहल यांचा ‘चुनरिया’ (1948) साठी ‘सावन आया’ हे गाणे गायले, तेव्हा आशा यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पार्श्वगायिका म्हणून पदार्पण केले. त्यांचे हे पहिले हिंदी गाणे ‘रात की रानी’ या चित्रपटासाठी होते.

वयाच्या 16 व्या वर्षी आशा भोसले यांनी आपल्या कुटुंबियांच्या इच्छेविरुध्द 31 वर्षीय गणपतराव भोसले यांच्याबरोबर घरातून पळून जाऊन लग्न केले होते. त्याअर्थी त्या स्वतंत्र स्वभावाच्या आणि बंडखोर होत्या.

आशा भोसले व संगीतकार ओ. पी. नय्यर यांच्या जोडीने विविध चित्रपटात दिलेली हिट गाणी हा बॉलीवूडमधील एक गाजलेला काळ ठरला. संगीतकार नय्यर यांनी त्यांची स्वतंत्र ओळख संगीत क्षेत्राला करून दिली. दोघांमधील नात्याबद्दल अनेक वावड्या त्या काळात उठल्या होत्या. नय्यर यांनी त्यांना ‘सीआयडी’ चित्रपटात गाण्याची मोठी संधी दिली. ‘नया दौर’ या चित्रपटातील गाण्यांनी यशाची शिखरे गाठली.

या यशामुळे ओ.पी व आशा ही जोडी खूप लोकप्रिय झाली. संगीतकार ओ.पी.नय्यर यांच्या हळूवार तरीही उडत्या चाली आणि त्यात आशा यांचा आवाज यामुळे धमाल झाली. आजही यातील अनेक गाणी प्रसिद्ध आहेत. मधुबाला यांच्या वर चित्रित झालेलं, 1958 मधील ‘हावडा ब्रिज’ याचित्रपटातील ‘ये है रेश्मी जुल्फोंके अंधेरे’, 1965 मधील ‘मेरे सनम’ चित्रपटातील ‘आईए मेहेरबाँ, बैठीये जानेजा’हा गाणी आजही ऐकली जातात. ‘आओ हुजूर तुमको’ (किस्मत) आणि ’जाईयेे आप कहां जाओगे’(मेरे सनम) ही गाणीही अत्यंत लोकप्रिय ठरली. त्यांनी तुमसा नहीं देखा

(1957), एक मुसाफिर एक हसीना (1962) आणि काश्मीर की कली (1964 ) यासारख्या अनेक हिट चित्रपटांसाठी गाणी गायली. ओ.पी. नैय्यर यांनी ‘उडे जब जब जुल्फे तेरी’ (नया दौर), ‘मैं प्यार का राही हूं’ (एक मुसाफिर एक हसीना), ‘दिवाना हुआ बादल’ अशा लोकप्रिय गाण्यांमध्ये आशा भोसले-मोहम्मद रफी यांच्या आवाजाय जे प्रयोग केले ते अप्रतिम ठरले.‘ईशारों ईशारों में दिले लेने वाले’ (कश्मीर की कली) सारखी गाणी तर आजची तरूण पिढीही गुणगुणते.

1966 मध्ये आशा भोसले यांनी संगीत दिग्दर्शक आर.डी.बर्मन यांच्यासाठी ‘तीसरी मंझील’ या चित्रपटासाठी गाणी गायली. ज्यांनी तुफान प्रसिद्धी मिळवली. ‘आजा आजा’ या गीताचे बोल ऐकल्यावर हे पश्चिमात्य सुरातले गाणे आपल्याला शक्य होईल का, याबाबत त्या साशंक होत्या. आरडी यांनी संगीताचा बाज बदलावा, असेही त्यांना वाटत होते.

मात्र दहा दिवसांच्या तालीमनंतर संगीत क्षेत्राचाच बाज बदलला. ‘आजा आजा मै हू प्यार तेरा’ कमालीचे हिट झाले. ‘ओ हसीना जुल्फोवाली’, ‘ओ मेरे सोना’ प्रचंड यशस्वी झाली. किंबहूना भारतीय चित्रपट संगीतात या गाण्यांनी नव्या धाटणीला यश मिळवून दिले. आशा-आरडी जोडीने अनेक हिट गाणी दिली. ‘ओ हसीना झुल्फों वाली’ गाणे आजही वाजले की अनेकांचे पाय ताल धरतात. ‘पिया तू अब तो आजा’(कारवां) आणि ‘ये मेरा दिल’ (डॉन) या गाण्यांनाही आशाजींच्या आवाजाने हिट केले.

उमरराव जान या चित्रपटातील ‘दिल चीज़ क्या है’, ‘इन आँखों की मस्ती के’ या गाण्यांमुळे त्यांच्या गायकीचे नवे रूप समोर आले. या गाण्यांनी त्यांना पहिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळवून दिला. ‘मेरा कुछ सामना’ या इजाजत चित्रपटातील गाण्यासाठी त्यांना दुसरा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.

आशाजी यांचे वय आज 86 आहे. आशाजींना आयुष्मान योग आहेत. आशाजींचा स्वभाव बंडखोर आणितितकाच प्रेमळ व लाघवी आहे. आजही त्यांचा उत्साह तरुणाईला लाजवेल असा आहे. आयुष्याच्या कारकिर्दीत काही उणेपणा हा असतोच, तो उणेपणा त्यांचे जीवनात आला. आवाजाची दैवी देणगी लाभलेल्या आशाजींसारखा आवाज अन्य कुणाला मिळणे अशक्य आहे.

सुमधुर आवाजाची दैवी देणगी मंगेशकर घराण्याला लाभली आहे. मधुर आवाजासाठी चंद्र ग्रहाची कृपा असावी लागते ती आशाजींना लाभली आहे. अर्थात संपूर्ण मंगेशकर घराण्याला ती लाभली आहे. शेजारी छायाचित्रात वर्तुळ करून हातावरील चंद्र ग्रह बाणाने दाखविला आहे.

हा चंद्र ग्रह मस्तक रेषेपासून मणिबंध पर्यंत व आयुष्य रेषेपर्यंत उठावदार उभार घेऊन आला आहे. ताल हाताच्या मध्य भागी चंद्राचा उभार सहसा पाहावयास मिळत नाही. हाताच्या कडेला एक खोबण असून हातावर चंद्र ग्रह अत्यंत शुभ कारक आहे.

आशाजींच्या बोटाखालील अनुक्रमे (डावीकडून) बुध, रवी,शनी व गुरु ग्रह शुभ आहेत हातावरील हे चारही ग्रह शुभ असल्याने त्यांना त्यांच्या आयुष्यात कोठलीही कमतरता राहिली नाही. आयुष्यभर जागतिक प्रसिद्धी आहे. प्रसिद्धीपाठोपाठ पैसा आला आहे. परंतु आशाजींच्या हातावरील रवीचे बोट हे शनी बोटाच्या बरोबरीने लांबीला मोठे आहे. त्यामुळे रवी ग्रहात न्यूनता आली आहे. रवी ग्रह उच्च असता व त्यात परत न्यूनता आली असता कौटुंबिक सौख्य लाभत नाही. आशाजींना वैवाहिक सौख्याचा लाभ झाला नाही. यासाठी रवीचे बोट आपण शेजारी छायाचित्रात पाहू शकता.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com