Friday, April 26, 2024
Homeभविष्यवेधश्रीकृष्णाच्या विविध रुपांचे वास्तुदिशेनुसार लावा फोटो

श्रीकृष्णाच्या विविध रुपांचे वास्तुदिशेनुसार लावा फोटो

वास्तूनुसार घरात देवाची चित्रे लावणे शुभ असते. देवाच्या वेगवेगळ्या चित्रांचे महत्त्वही वेगवेगळे असते. श्रीकृष्णाची विविध रूपे मानवासाठी प्रेरणादायी आहेत. श्रीकृष्णाची प्रत्येक लीला अनुकरणीय आणि अतुलनीय आहे. घरातील वास्तू ऊर्जा आणि वृद्धीसाठी भगवान श्रीकृष्णाची रूपे अतुलनीय आहेत. कृष्ण जन्माष्टमीच्या मुहूर्तावर सुख, समृद्धी आणि ध्येयपूर्तीसाठी भगवान श्रीकृष्णाचे कोणते चित्र घरामध्ये कोणत्या ठिकाणी लावावे हे जाणून घेऊया.

स्मरणशक्ती आणि बुद्धिमत्ता वाढते– घराच्या ईशान्य दिशेला कृष्णाचा लोणी खातांनाचा फोटो लावावा. हे दृष्य माणसाच्या मनात श्रद्धा निर्माण करते. जर घरात 12 वर्षांपर्यंतची मुले असतील तर कृष्णाचे बालचित्र जरूर लावावे. हे स्मरणशक्ती आणि बुद्धिमत्ता वाढवते असे मानले जाते. पूर्वेला श्रीकृष्णाचे बाळ स्वरूपाचे चित्र लावावे. हे दृष्य संपत्ती, अन्न आणि धर्म प्रदान करणारा आहे. देव भक्ती आणि श्रद्धेने निसर्गाशी असलेल्या संबंधाचे प्रतीक आहे. घरात लक्ष्मीचा वास राहतो.

या दिशेला फोटो लावल्यास होईल संरक्षण– आग्नेय दिशेला देवाच्या महान रूपाचे चित्र लावावे. हे ऊर्जेचे सूचक आहे. भगवान श्रीकृष्ण हे संपूर्ण जगाचे हितकर्ते आहेत, संपूर्ण विश्वाला व्यापलेल्या अमर्याद ऊर्जेचे प्रतीक आहे. ही दिशा स्वयंपाकघरासाठी योग्य आहे. गोवर्धन पर्वत उचलतांना श्रीकृष्णाचा फोटो लावावा. हे संरक्षणाचे प्रतीक आहे. यामुळे प्रत्येकाला घरात सुरक्षित आणि समाधानकारक वाटते. आकस्मिक आपत्तींचा धोका कमी होतो. अडचणींवर मात करण्याची बुद्धी तुम्हाला मिळते.

- Advertisement -

तामसिक शक्तींपासून होणार दूर – नैऋत्य दिशेला कृष्णाच्या सुदर्शन चक्रधारी रूपाची मूर्ती किंवा फोटो लावावा. हे रूप आपल्याला वाईटांपासून दूर ठेवते. तामसिक शक्तींपासून रक्षण करते. नैऋत्य दिशा राहूची मानली जाते. देवांनी मोहिनीचे रूप घेऊन देवतांना अमृत दिले होते. राहूच्या कपटातून अमृत प्यायल्यानंतर भगवंतांनी चक्राने त्याचे मस्तक धडापासून वेगळे केले होते.

सुख समृद्धीसाठी या दिशेला लावा फोटो – भगवान द्वारकाधीश यांचे चित्र पश्चिम दिशेला लावल्याने धन आणि वैभव प्राप्त होते. सर्वांचे सहकार्य मिळते. घरात सुख-समृद्धी वाढते. मोठ्यांचा आदर करण्याची भावना मनात जागृत होते.

राधा-कृष्ण आणि रासलीला यांचे चित्र उत्तर-पश्चिम दिशेला लावा. हे आनंदमय रूप सर्व चिंता दूर करते. कोमल भावना वाढवते. तसेच यामुळे अविवाहितांना सुंदर प्रस्ताव प्राप्त होतील. जीवनातील नीरसपणा नष्ट होतो. ही चंद्राची दिशा आहे. हे दृष्य जीवनात रस आणि पवित्रता भरते.

- Advertisment -

ताज्या बातम्या