चिंता एक वास्तव नाही

चिंता एक वास्तव नाही

तुम्ही ज्याला चिंता म्हणता ती म्हणजे एखाद्या गोष्टीचा परिणाम काय होणार आहे याची तुम्हाला काळजी वाटते. तुमची तशी इच्छा आहे म्हणून एखाद्या गोष्टीचा परिणाम ठरवला जात नाही. तुम्ही काय कृती करता यावरून ते ठरवले जाते. तुम्ही करू जाणार्‍या कार्याची तयारी जितकी कमी केली आहे तितके अधिक तुम्ही चिंताग्रस्त होणार.

मला सांगा की तुम्हाला मोटरसायकल कशी चालवायची हे माहीत नाही. तुम्ही त्यावर बसून जर गेला. तर प्रत्येक क्षण भीतीने व्याकूळ होणार. परंतु जर तुम्हाला मोटारसायकल कशी चालवायची हे माहीत असेल तर ती एक अद्भूत गोष्ट आहे. मोटारसायकल ही चिंता नाहीये, ती हाताळण्याची तुमची असमर्थता हीच चिंता असते. म्हणून चिंता हाताळण्याचा प्रयत्न करू नका. चिंता हे वास्तव नाहीये, ती एका विशिष्ट असमर्थतेचा परिणाम आहे. जर तुम्हाला एखाद्या गोष्टीत यशस्वी व्हायचे असेल तर तुम्ही तुमची क्षमता बळकट करण्यावर लक्ष दिले पाहिजे, परिणामांकडे नव्हे.

तुम्हाला यश प्राप्ती होते ती तुम्ही केवळ इच्छा करता म्हणून नव्हे. ते लाभण्याचे कारण हे की तुम्ही यथायोग्यरित्या त्यासाठी तयारी केली आहे म्हणून. पृथ्वीवरील कोणत्याही प्रकारच्या यशस्वी कार्यासाठी आवश्यक दोन मूलभूत घटक म्हणजे तुमचे शरीर आणि मन या दोघांच्या संपूर्ण क्षमतांचा पुरेपूर उपयोग करून घेणे. जर असे घडून यायचे असेल तर तुम्ही तुमच्या नैसर्गिक स्वभावाने आनंदी असले पाहिजे. याचा अर्थ असा की तुम्ही स्वतःच तुमच्या जीवनात एक समस्या नाही आहात. जर तुम्ही एक समस्या नाही आहात, तर मग बाह्य जगातील अडचणी हाताळण्यासाठी तुम्ही पूर्णतः मोकळे असाल. तुम्ही स्वतःच जर एक समस्या असाल, तर मग प्रत्येक गोष्ट एक समस्या असेल यात शंका नाही.

या पृथ्वीवर जगण्याच्या हजारो वर्षांच्या अनुभवानंतरही मानवता अजूनही गोंधळलेली आहे, कारण वैयक्तिकरित्या लोक स्वतःच एक मोठी समस्या आहेत. जर त्यांनी दुसरं काहीतरी हाताळण्याचा प्रयत्न केला तर ते आणखी अधिकच समस्या निर्माण करतात; ते काहीही सोडवणार नाहीत. जर त्यांनी एक समस्या सोडवली, तर त्यासोबत ते शंभर अधिक समस्या निर्माण करतात. सर्वत्र हे घडत असल्याचे तुम्हाला दिसत नाही का? - आंतरराष्ट्रीय पातळीवर, स्थानिक स्तरावर, कुटुंबात आणि तुमच्या आतसुद्धा जेव्हा तुम्ही स्वत:च एक समस्या आहात तेव्हा जे काही तुम्ही स्पर्श कराल ती एक भली मोठी समस्या बनेल.

म्हणून सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही स्वतः प्रस्थापित होणे. जर का हे एकदा प्रस्थापित झालं तर मग जगात आपण आपल्याला शक्य तितके सर्व काही करू शकतो. मग काहीही झालं तरी, तुम्ही मात्र प्रस्थापित आहात. ही एक अशी गोष्ट आहे ज्याचा प्रत्येक माणूस हक्कदार आहे आणि त्याने हे स्वतःसाठी केलेच पाहिजे. तुम्ही देशाचा एक मोठा नेता होणार की एक महान धावपटू; मुद्दा हा नाही. जर असे झाले तर ते ही उत्तम; परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही किमान जीवन आनंदाने, सुखाने जगून गेलं पाहिजे. ही एक अशी गोष्ट आहे, ज्यासाठी प्रत्येक मनुष्य हक्कदार आहे.

(जागतिक पातळीवर नावाजलेले द्रष्टे योगी, आत्मज्ञानी आणि प्रसिद्ध लेखक असा लौकिक असलेले सद्गुरु हे भारतातील पहिल्या 50 प्रभावशाली व्यक्तींपैकी एक आहेत. सद्गुरूंना भारत सरकारने 2017 मध्ये ‘पद्मविभूषण’ पुरस्काराने गौरविले आहे.)

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com