वार्षिक राशिभविष्य 2023 : धनू : प्रगतीकडे वाटचाल

वार्षिक राशिभविष्य 2023 : धनू : प्रगतीकडे वाटचाल

पुरुष - आपणास साडेसाती सुरु आहे. आपली वाटचाल प्रगतीकडे आहे. परंतु काही काळ ही वाटचाल बिकटदेखील असणार आहे. सरळ मार्गाने चालले तर आपण निश्चितपणे कल्पना पण केलेेली नसेल इतपत आपणास प्रगती प्राप्त होईल. प्रथम चार महिने हे संथगतीची असतील नंतर मे ते डिसेंबर-2023चा काळ हा समृद्धीचा काळ राहील. आपण प्रयत्न करा यश मिळवा. आपणास या काळात भाग्यकारक संधी चालून येतील. परंतु आपण त्या स्वीकारायला हव्यात. नातेवाईकांपासून जरा सांभाळून राहावे. त्यांच्याशी आर्थिक व्यवहार न केलेले बरे.

स्त्रीया - सांसारिक स्त्रीयांसाठी जानेवारी ते एप्रिलचा काळ हा छोट्या समस्या राहतील. परंतु त्या चिंता उत्पन्न करणार्‍या नसतील. साडेसातीचे पर्व आहे. नातेवाईकच अडथळेकारक, नुकसानकारक ठरणार आहे. सावध असावे. मे ते डिसेंबर-2023चा काळ सतत पुढे-पुढे जाल. प्रगती आपली वाट बघत आहे. मनातील सर्व इच्छा पूर्ण करणारा हा काळ आहे. नाराजी मात्र आपणास परवडणार नाही. याचा अनुभव पण येईल. आपण देवतांपुढे नवस बोलले असाल तर त्याची प्रचिती आपणास येईल. आपण हा नवस ज्येष्ठांकडून पूर्ण करा.

नोकरवर्ग - वर्षाच्या प्रारंभापासून आपण नोकरी मिळविण्याचा प्रयत्न करावा. एप्रिल, मेमध्ये नोकरी मिळण्याची शक्यता राहील. जानेवारी ते एप्रिलचा काळ सर्वच नोकरवर्गास सामान्यतेचा असणार आहे. या काळात नोकरीत समस्यादेखील उत्पन्न होतील. मे ते डिसेंबर-2023 चा काळ हा आपणास नोकरीत उत्तम राहील. प्रगती, बढतीचे योग या काळात असणार आहे. वरिष्ठ अधिकारी वर्ग हा आपणावर खुश राहील. आपणास मोठी जबाबदारी नोकरी कार्यात सोपविली जाईल. नोकरीनिमित्त लांबवर प्रवासदेखील करावा लागेल.

व्यवसायिक - व्यवसायिकांनी आपणास साडेसाती आहे. याचे भान सदैव ठेवावे. कायद्याला धरुनच आपण आपले व्यवसाय करावेत. जानेवारी ते मार्च हा काळ आपणास समस्यांचा जाणार आहे. या काळात आपण स्टॉक हे आपले अनुभवाच्या आधारावरच करावेत. दूरवर व्यापार करीत असाल तर सावधानपूर्वकच आपण व्यापार करावेत. मे ते डिसेंबर हा काळ आपण धाडसाने करावा. व्यापारी जागा, व्यापारासाठी नवीन वाहन खरेदी कराल. मुलांना व्यापारात टाकावयासाठी हा काळ अती उत्तम राहील. प्रगतीच्या दिशेने व्यापार चालेल.

विद्यार्थीवर्ग - जानेवारी, फेब्रुवारी, मार्च हे तीन महिने विद्यार्थीवर्गासाठी फार महत्त्वाचे असतात आणि हेच तीन महिने अभ्यासात मन न लागणे. चुकीचे मित्र संबंध जोडणे. अभ्यास सोडून इतर कार्य करणे यापासून आपण दूर राहावे नाहीतर वर्षभराच्या मेहनतीचे फळ आपणास मनाप्रमाणे मिळणार नाही. अभ्यासाशिवाय इतर कसलाही विचार आपण करु नका. मे ते डिसेंबर-2023 अत्यंत यश मिळवून देणारा हा काळ आहे. ग्रहांची साथ आपणास आहे. आपली पण साथ अभ्यास करुन ग्रहांना द्या व भरघोस यश मिळवून दाखवा.

राजकारणी - बहुतेक राजकारणी पाहून घेऊ काय होईल? ते बघून घेऊ, अशी भाषा वापरतात व तसेच कार्य करतात. परंतु आपणास शनी बघत आहे हे लक्षात ठेवा. आपले कार्यावर जानेवारीअखेरपर्यंत शनी बघणार आहे. जानेवारी ते मार्च या तीन महिन्यात आपण पक्ष बदल करु नका. राज्यकर्ते यांना सांभाळण्याचा प्रयत्न करा. शांत राहूनच या काळता कार्य करावे. मे ते डिसेंबर-2023 राज्यकर्त्याची नेतागिरीमार्फत चालेल आपणावर महत्त्वाची जबाबदारी पक्षश्रेष्ठी सोपवतील. हा काळ आपणास सुवर्णकाळ ठरणार आहे. यश, किर्ती मिळवाल.

आरोग्य - जानेवारी महिना हा आरोग्यदृष्ट्या कमजोर असेल. जुनी काही दुखणी पुनरुपी डोकेवर काढतील. औषधावर अधिक खर्च करावा लागेल. या काळात मधूमेह, हृदयादी अनारोग्याची शक्यता राहील. ऑपरेानची शक्यता पण राहणार आहे. हा काळ आपणास काळजीचा असणार आहे. मे ते डिसेंबर-2023 हा काळ आरोग्यात सुधारणा होईल. ऑपरेशन असल्यास ऑपरेशन यशस्वी होतील. वृद्धजणांनी आरोग्याकडे लक्ष द्यावे. तब्येत उत्तम राहील. बाहेरचे खाणे, अशुद्ध खाणे यापासून पूर्ण वर्षभर दूर राहावे.

आर्थिक - जानेवारी महिना साडेसातीचा जरा विचारा-विचारानेच पैश्यांचे व्यवहार करावेत. फेब्रुवारी ते एप्रिल हा काळ आर्थिक कामाची गती सामान्य राहील. उधारी, उसनवारी अडकून राहणार आहे. मे ते डिसेंबर-2023चा काळ हा आर्थिकबाबतीत अग्रेसर राहील. कर्जसमस्या असतील तर त्या दूर होतील. हाती पैसा खेळता राहील. नवीन मूल्यवान वस्तुंची खरेदी कराल. लांबवर प्रवासदेखील कराल. कुणाचे देणे असतील तर ती देणी देऊन टाकावीत. कर्जात राहणे हे योग्य नसते. याचा अनुभव पण आपणास येईल.

नातीगोती- नाना, दादी यांच्या प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल. आपले मोठे मामा, आपले कुटुंबीय यांना त्यांच्या कार्यात कायदेशीर अडचणी निर्माण होतील. मातृविषयक नातेवाईक मंडळीचे आगमन या नवीन वर्षात सतत होणार आहेत. रक्तसंबंधित नातेवाईक मंडळीपासून सावध असावे. कलुषीत वातावरण निर्माण करण्याची शक्यता आहे. मातृ घराण्यात मंगलकार्याचे आयोजन केले जाईल. यावेळी काही दुर्घटना होण्याची शक्यता आहे. याबाबतीत आपण सावध असावे. सासुरवाडीकडील मंडळी गुढ अवस्थेत या वर्षात राहणार आहेत. त्यांचे गुपीत जाणण्याचा प्रयत्न करावा.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com