वार्षिक राशिभविष्य 2023 : तूळ : आरोग्याची काळजी घ्यावी लागेल

वार्षिक राशिभविष्य 2023 : तूळ : आरोग्याची काळजी घ्यावी लागेल

पुरुष- 2023 ची सुरुवातच आपणास अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. शत्रु पक्षाची आपले प्रत्येक कार्यावर अत्यंत बारीक नजर असणार आहे. कोर्ट-कचेरीबाबतची कामे आपण गोपनीयता राखूनच करावी. या काळात आपण बाहेरचे खाणे शक्यतोवर टाळावेत. जानेवारी ते एप्रिलचा हा काळ संसर्गबाधेचा असेल. पाण्यापासून दूर राहावे. घसरुन पडण्याचा धोका राहील. मे ते डिसेंबर-2023 काळ समस्याग्रस्त. अडथळाकारक असेल. मित्रापासून सावध असावे. आर्थिक व्यवहार सर्व आपले स्वत:च्या हातानेच करावेत.

स्त्रीया - 2023 संपूर्ण वर्षभरात गर्भवती महिलांनी आपले प्रकृतीकडे लक्ष द्यावे. सांसारिक दुरावा, घरात अशांत वातावरण होण्याचे योग या वर्षात आहेत. जानेवाी ते मार्चचा काळ स्त्रीयांनी माहेरी न जाता सासरीच आपला संसार सांभाळण्याचा प्रयत्न करावा. पाव्हणे मंडळीचे आगमन होणार आहेत. गैरसमज करण्याचा प्रयत्न होणार आहे. याबाबत आपले संसारातील पाव्हण्यांचा हस्तक्षेप वेळीच रोखावा. मे ते डिसेंबर या काळात आपले घरात एखादे मंगलकार्य संपन्न होईल. मुलांकडून आनंददायक वार्ता येतील.

नोकरवर्ग- वर्षातील प्रथम जानेवारी महिन्यात नोकरवर्गाने अत्यंत जागरुक राहावे. सर्व जबाबदारीची कामे आपण स्वत:च्या हातानेच करावीत. लहानशी चूकदेखील नोकरीसाठी धोकादायक ठरु शकते. नोकरी इच्छुकांना जानेवारी, फेब्रुवारी, मार्च महिना हा केवळ पायपीट करणारा ठरणार आहे. या काळात नोकरी मिळविण्यासाठी इतर कुणालाही पैसे देऊ नका. फसगत होण्याची शक्यता राहील. मे, जून, जुलै या महिन्यात नोकरीसाठी प्रयत्न करावे. सप्टेंबर, ऑक्टोबर काळात नोकरीचे योग प्रबळ आहेत. ज्यांना नोकरी आहेत. त्यांना नोव्हेंबर, डिसेंबर अधिक लाभाचा राहणार आहे.

व्यवसायिक - जानेवारी, फेब्रुवारी, मार्च-2023 हा काळ आपणास व्यवसायात प्रगतीचा ठरणार आहे. आपणास या काळात समस्या येतील. परंतु समस्यांचे निवारण पण होणार आहे. आपण या काळात धाडसाने व्यवसाय करावा. स्टॉकपासून बर्‍याच प्रमाणात आपणास अधिक नफे पण मिळणार आहेत. व्यवसायासाठी जागा आपण खरेदी करा. व्यवसायसाठी लागणार्‍या वाहनांची पण आपण खरेदी करु शकणार आहेत. आपल्या मुलांना व्यवसायात टाकण्याची इच्छा असल्यास आपण या वर्षात मुलांना आपलेच व्यवसायात सहभागी कराल.

विद्यार्थीवर्ग - विद्यार्थीवर्गास 2023चे वर्ष समस्याग्रस्त असणार आहे. मनाचा विचलितपणा वाढणारा राहील. अभ्यासात लक्ष लागणार नाही. अचानकपणे चुकीच्या मित्रांशी संबंध येतील. याचा परिणाम अभ्यासावर होणारा आहे. चुकीच्या कामामुळे इतरांचा चुकीचा ठपा आपणावर ठेवल्यामुळे शाळेतील वर्ग शिक्षक आपणास जबाबदार धरतील. यासाठी हे नवीन वर्ष खास करुन जानेवारी, फेब्रुवारी, मार्च महिना हा आपण आपली शाळा आणि आपला शालेय अभ्यास याकडेच लक्ष द्यावे.

राजकारणी - राजकारणी व्यक्तींना सारखी धावपळ करावी लागणार आहे. एकीकडे कार्यकर्त्यांची कामे तर दुसरीकडे पक्षश्रेष्ठींची नाराजी. पक्षश्रेष्ठींची भेट न होऊ देणे. असली चिंता राजकारणी व्यक्तींना असेल. या काळात आरोग्याच्या समस्या निर्माण होतील. दवाखान्यात भरतीसुद्धा व्हावे लागण्याची शक्यता आहे. शत्रु पक्षाची नजर आपणावर राहील. याबाबतीत सावध असावे. या काळात आपण ज्या पक्षात आहात तिथेच कार्यरत राहावे. चुकूनही आपण पक्ष बदल करु नये. मनातदेखील विचार आणू नये. हेही दिवस राहत नाही हे लक्षात घ्यावे.

आरोग्य - तूळ राशी समस्त व्यक्तींनी सर्वप्रथम आपले आरोग्याकडे लक्ष द्यावे. अनारोग्याचे प्रसंग वारंवार येणार आहेत. हॉस्पिटलमध्ये भरती पण आपणास व्हावे लागणार आहे. यासाठी औषधावर खर्चदेखील अधिक होईल. जानेवारी ते मार्च या महिन्यात दूरवर प्रवास करणे टाळावेत. तसेच बाहेरचे खाणेदेखील टाळावेत. जुनी दुखणी असतील तर त्यावर लक्ष द्यावे. लहान बालकांच्या आरोग्याकडे अधिक लक्ष द्यावे. साथी जन्य आजारग्रस्त होण्याचे योग आहेत.

आर्थिक - नवीन वर्ष व्यापारीवर्गास आर्थिकबाबतीत प्रथम चार महिने अतीउत्तम जाणार आहे. इतरजणांना वरील महिने हे अधिक समस्याग्रस्त असतील. कर्जदेखील काढावे लागणार आहे. रोजंदार मजूरवर्गास चिंताकारक वरील काळ. मे ते डिसेंबर-2023चा काळ हा सर्व तूळ राशी व्यक्तींना समाधानकारक राहणार आहे. आर्थिक कामामुळे जी कामे अडकलेली होती ती कामे मार्गी लागतील. नातेवाईक, इतर परिवाराकडून देखील आर्थिक सहाय्य प्राप्त होईल. नवीन नोकरी लागलेल्यांना कमी पगारावर काम करावे लागेल.

नातीगोती - लहान भाऊ, लहान बहिण, आपले जवळचे मित्र शिक्षण घेत असल्यास त्यांना हे नवीन शैक्षणिक वर्ष उत्तम जाणारे आहे. त्यांना कामे हवी असल्यास कामाच्या संधीपर उपलब्ध होतील. सासूरवाडीकडून वास्तू, भूमीचा लाभ होण्याचे योग आहेत. मोठ्या मामींनी धावपळ करु नये. लहान-मोठी जखम होण्याची शक्यता आहे. आई संबंधित कोर्ट-कचेरीत वाद असतील तर त्याकामी आपणास खूप धावपळ करावी लागणार आहे. परंतु ही धावपळ आपणास कामास येईल. पत्नीचे आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. मामा, लहान मावशी, लहान काकू यांचे व्यवसाय असल्यास व्यवसायात उत्तम लाभ मिळतील.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com