वार्षिक राशिभविष्य 2023 : कर्क : उत्कर्षाचे वर्ष असणार आहे

वार्षिक राशिभविष्य 2023 : कर्क : उत्कर्षाचे वर्ष असणार आहे

पुरुष - प्रगतीकारक वर्षारंभ होणार असल्यामुळे सर्व कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. अशा आनंदमय वातावरणात सुसमाचार प्राप्त होईल. आपल्या कार्यात जी मंडळी शत्रुगत कार्य करीत होती. त्यांच्या कार्यामुळे आपल्या कार्यात अडथळे येत होती. शत्रु नामोहरम होईल व त्यांचे कार्य अपूर्ण पडेल. आपलीही कार्य सहज साध्य होतील. आपण आपले कार्याबाबत अथवा कुटुंबीयांबाबत आपण काही योजना आखून ठेवलेल्या असतील तर या योजनांचा आरंभ करण्यास उत्तम शुभ ग्रहयोग आहेत व ही सर्व कार्य संपूर्णपणे संपन्न होतील. सुखाचे हे पर्व असणार आहे.

स्त्रिया - कौटुंबिक वातावरण तणावाचे असेल. घटस्फोट घेण्याच्या विचारात असाल तर ही तणावाची स्थिती नाहिशी होईल व संसारिक संबंध सुखाचे सुरु होतील. काहींचे संसार संबंधित असलेले वाद कोर्टात सुरु असतील तर त्यांना समझोता करण्यास उत्तम ग्रहयोग आहेत. पुनरुपी संसार सुखरुप होतील. साखरपुडा मोडला गेला आहे. प्रयत्न करुनही विवाह जमत नाही, अशा मुलींचे विवाह जमतील व लगेचच शुभमंगल सावधान होईल. आजारपण असेल तर आरोग्यात सुधारणा होईल. ऑपरेशन करण्यास ऑपरेशन सुधारण्यास ग्रहस्थिती अतिउत्तम आहे.

नोकरवर्ग - सर्वप्रथम ज्यांना नोकरी नाही व नोकरी करण्याची इच्छा आहे त्यांनी या काळात प्रयत्न करावा. नोकरीची इच्छा पूर्ण होईल. कंपनीमार्फत परदेश गमनाच्या संधी हुकलेल्या आहेत. त्यांना प्रारंभीच्या चार महिन्यांत परदेश गमनाच्या संधी लाभतील. आपणास हव्या असलेल्या ठिकाणी बदली केली जाईल. जुन्या कंपनीत पगार कमी आहेत, पगारवाढीसाठी दुसरे कंपनीत नोकरीचे प्रयत्न करीत आहात तर आपणास याबाबतीत अधिक कार्य करावे लागेल व हे प्रयत्न आपले सफल होणार आहेत. अधिक पगाराची नोकरी लाभणार आहे.

व्यावसायिक - व्यावसायिकांना वर्तमान उत्कृष्ठ व्यवसाय करण्याची संधी लाभणार आहे. या काळात आपण धाडसाने व्यवसाय, व्यापार करावा. स्टॉक जुने विक्री करणे, नवीन स्टॉक करण्यासारखे आपण या काळात कार्य करु शकतात. यातून आपणास भरघोस आर्थिक लाभ होतील. नवीन व्यावसायिक कार्य आरंभ करु शकतात. नवीन मालाची एजन्सी घेऊन आपण व्यवसाय करु शकतात. आपल्या मुलांना व्यवसायात टाकण्याची इच्छा असल्यास प्रस्तुत प्रारंभीच्या तीन महिन्यांतील ग्रहयोग अतिउत्तम आपणास साथ देणारे असणार आहे.

विद्यार्थी वर्ग - विद्यार्थी वर्गास जसे ग्रह असायला पाहिजे तसेच ग्रह प्रारंभीच्या तीन महिन्यांत असणार आहे. यासाठी आपण या काळात जे कार्य कराल, त्यात आपण यशस्वी व्हाल. या काळात आपली ज्या परीक्षेसाठी अभ्यासाची पूर्ण तयारी झालेली असेल तर त्या स्पर्धा परीक्षांमध्ये आपण यश मिळवाल. शालेय प्रवेशासंबंधित काही अडथळे येत असतील, काही कायद्याच्या अडचणी येत असतील तर त्या दूर होतील. आपल्या इच्छेप्रमाणे आपणास प्रवेश दिला जाईल. विचलितपणा काही वेळेला इतर जणांकडून आपणाला मिळणार आहे. त्याबाबत मात्र सावध असावे.

राजकारणी - राजकारणात कार्यरत असाल तर लाभदायक. माजी राजकारणी असाल व पुनरुपी राजकारणात प्रवेश करण्यास इच्छुक असाल तर भाग्यकारक व आपण नवीन आहात. घराण्यात राजकारणाचा वारसा नाही, अशा समस्तांसाठी ही वेळ राजकारणात प्रवेश करण्यास योग्य आहे. याशिवाय आपण वृद्धापकाळाच्या उंबरठ्यावर आहात व आपल्या वंशाला मुलांना आपला राजकारणी वारसा चालविण्याची इच्छा आहे व वंशाला पण राजकारण करण्याची हौस आहे, अशांसाठी प्रथम तीन महिने उत्तम नंतरचा काळ सामान्य स्वरुपाचा असणार आहे. राजकारणी मालामाल होतील.

आरोग्य - ज्या व्यक्तींना आपल्या आरोग्याच्या बाबतीत चिंता आहे. आपल्या आरोग्याबाबत काळजी आहे. अशा समस्तांसाठी औषधोपचार घेण्यास तसेच डॉक्टरांना आपणास ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला असेल तर आपण प्रारंभीच्या तीन महिन्यांत औषधोपचार सुरु करावा. ऑपरेशन करण्याचा निर्णय घ्यावा. आरोग्यात सुधारणा, तब्येतीत सुधारणा होईल. आरोग्य संपन्न जीवन असेल. संधीवात असलेल्या वर्गाने उत्तम हॉस्पिटलमध्ये सांधेरोपणाची शस्त्रक्रिया करवून घ्यावी. हॉस्पिटलमधून शस्त्रक्रिया करवून गेलेल्या रुग्णांच्या भेटीगाठी घेऊन निर्णय घ्यावा.

आर्थिक - कर्क राशी व्यक्तींना प्रस्तुत 2023 वर्ष आर्थिक बाबतीत आपणास भाग्यशाली ठरणार आहे. ‘पैसा है तो सबकुछ है।’ सर्वकाही प्राप्त होणारे हे वर्ष असणार आहे. या वर्षातील प्रथम तीन महिने आपल्या हाती सतत पैसा खेळत राहणार आहे. आपण कसलेही कार्य करा. कार्य लहान, असो का मोठे कार्य असो लाभ हा निश्चितपणे मिळण्याची शक्यता राहील. वर्षातील प्रथम तीन महिन्यांत आपण एखादी मूल्यवान वस्तुंची खरेदी कराल. वास्तुस्थानात रंग, फर्निचर असे अनेक बदल करणार आहात. नवीन बांधकामदेखील सुरु कराल.

नातीगोती - मोठे बंधू, मोठी सूनबाई, जावाई मंडळी यांना भूमी खरेदीचे योग नवीन वर्षात आहेत. वरील नातेसंबंधीतात वादाची शक्यता आहे. सामोपचाराने वागून वेळ निभावून न्यावी. मुलांना वाहन चालवितांना सावधानता बाळगावी अशा सूचना द्याव्यात. पत्नीसह पर्यटननिमित्त प्रवास कराल. साळा व साळी यांच्याकडील मंगलकार्यात सहभागी व्हाल. मामा, लहान मावशी, लहान काकू यांच्या तब्येतीकडे लक्ष द्यावे लागेल. हे व्यापार करीत असतील तर व्यापार उत्तम चालेल. सासूबाईंच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील. पाण्यापासून सावधानता बाळगावी अशा सूचना आईला द्याव्यात. साळा, साळी यांना भाग्यकारी वर्ष राहील.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com