Wednesday, April 24, 2024
Homeभविष्यवेधवार्षिक राशिभविष्य 2023 : मेष : सुरूवातीला प्रतिकूलनंतर अनुकूल

वार्षिक राशिभविष्य 2023 : मेष : सुरूवातीला प्रतिकूलनंतर अनुकूल

पुरुष- वर्षारंभीचा सुरुवातीचा काळ हा आपणास विचार करावयास लावणारा असणार आहे. या काळात आपणास सर्वच कार्य विचारपूर्वक करावी लागतील. आपले सुरळीत चालणारे कार्यात आपलेच नातेवाईक मंडळी ही आपले कार्यात मोडता घालतील, याबाबत सावधान असावे. वर्षभराच्या मध्यंतरानंतरचा काळ हा आपणास दिलासा देणारा असणार आहे. आपली अपूर्ण असलेली कामे या काळात पूर्ण होतील. कोर्ट-कचेरीबाबत अनुकूल निकाल लागतील. नोकरी इच्छुकांना नोकरीच्या संधी प्राप्त होतील. सुसमाचार प्राप्त होतील. विवाह जमविण्यास हा काळ अनुकूल असा राहील. आपणास भाग्योदय करणारा हा काळ असेल.

स्त्रिया- गर्भवती महिलांनी आपल्या प्रकृतीला जपावे. सुरुवातीच्या काळात माहेरील संबंधात तणाव निर्माण होईल. नंतर मात्र सुरळीत होईल. उपवर मुलींना वर्षाच्या मध्यंतरानंतर अनुकूल स्थळे आपणास प्राप्त होतील. याच काळात दूरवर प्रवासाचे योग पण आहेत. विवाह होऊन बरेच वर्ष झाले, संतती नाही, त्यांना हा काळ योग्य असणार आहे. घटस्फोट घेण्यापर्यंतची स्थिती आलेली आहे, त्यांना या काळात समझोता होऊन आपण पुनरुपी संसार करण्यास सुरुवात कराल. प्रेमविवाह करु इच्छिणार्‍या मुलींनी आपल्या मनातील इच्छा ही आई – वडिलांना सांगण्यास उत्तम काळ आहे. नोकरी करीत असलेल्या महिलांना नोकरीत बढतीचे योग आहेत.

- Advertisement -

नोकरवर्ग- आपण नोकरी करीत आहात व प्रथम नोकरी सोडण्याच्या विचारात आहात तर आपण आपले विचार या वर्षात स्थगित ठेवावे. सुरुवातीच्या काळात वरिष्ठ लोकांकडून आपणास त्रास होण्याची शक्यता आहे. ही स्थितीनंतरच्या काळात राहणार नाही. थोडाफार पगारदेखील वाढणारा आहे. सतत प्रयत्नशील राहिल्यास आपणास नोकरी मिळेल. ज्यांना कामे प्राप्त करण्याची इच्छा आहे, त्यांना कामे प्राप्त होतील. सुरुवातीच्या काळात चुकूनही कारण नसताना गैरहजर राहू नका. वेळोवेळीची कामे आपण केलीत तर आपणास याच वर्षात आहे, त्याचठिकाणी बढतीचे योग आहेत.

व्यावसायिक- सुरुवातीचा हा काळ आपणास सामान्य जाणार आहे. एप्रिलपर्यंत आपण आपले व्यवसाय मर्यादितच ठेवावेत. भागीदारीचे व्यवहार असतील तर याबाबत आपण आवश्य विचार करावा. आपली फसवणूक तर होत नाही? याकडे लक्ष द्यावे. या काळात पैशांचे व्यवहार नोकरदारावर सोपवू नये. व्यापार, व्यवसायजागी अधिक रोकड ठेवू नये. एप्रिलनंतर स्टॉक खरेदी-विक्रीचा निर्णय घ्यावा. व्यवसाय जागी फर्निचर वा इतर काही बदल करावयाचे असल्यास आपण या काळात करु शकतात. नवीन नोकर चाकर ठेवताना पूर्ण चौकशी करुनच ठेवावे. सावध राहण्याचा हा काळ आहे.

विद्यार्थी वर्ग- एप्रिलपर्यंत विद्यार्थी वर्गास प्रतिकूल ग्रहयोग आहेत. या काळात चुकीचे मित्र लागण्याची पण शक्यता आहे. याबाबत सावध असावे. शालेय काळात इतर विद्यार्थी भानगडी करतील आणि आपणाकडे बोट दाखविले जातील, अशा विद्यार्थी वर्गापासून दूर राहावे. आपणाजवळ वाहन असल्यास एप्रिलअखेरपर्यंत इतरांना देऊ नये. आपण पण वाहन चालविताना सावधपूर्वक चालवावे. एटीएमच्या व्यवहारात दक्षता बाळगावी. मूल्यवान वस्तुंचा वापर करु नये. वर्षाच्या शेवटी आपणास अनुकूलता राहणार आहे. आपण या काळात ज्या परीक्षा द्याल, त्यात आपणास यश मिळणार आहे.

राजकारणी- प्रारंभीच्या एप्रिलपर्यंत आपण ज्या पक्षात आहात, त्याच पक्षात कार्यरत राहावे. पक्ष बदलाचा विचार पण मनात आणू नये. मीडिया, पत्रकार यांच्यासोबत वार्तालाप करताना मनातील सुतोवाच करु नका. एखादा शब्द धरला जाऊन आपणाविषयी गैरसमज अधिक पसरविला जाईल. कार्यकर्त्यांना सांभाळण्याचा प्रयत्न करावा.

आपणास कुठले पद मिळाले नाही, तरी याविषयी नाराजी व्यक्त करु नका. मे महिन्यापासून आपण राजकारणात एक पाऊल पुढे असणार आहे. आपल्या पक्षनिष्ठतेवर पक्षश्रेष्ठींचे लक्ष आपणावर असणार आहे. भविष्यात आपल्या कार्याची दखल निश्चितपणे घेतली जाईल.

आरोग्य – आरोग्याच्या बाबतीत आपणास नेहमी सतत काळजी घ्यावी लागणार आहे. उष्णताजन्य विकार, संथ चालणारे विकार ग्रस्त करीत जाणारे असणार आहेत. वाहन जरा सांभाळून चालवावे. दुखापत होण्याची शक्यता आहे. डोळ्यांचा त्रास, दाताचा त्रास, उष्णताजन्य विकारातून फोडे, फुन्शी, साथीजन्य आजारातून मात्र आपला बचाव होईल. घाईगर्दीत कामे करु नका. लहान-मोठी जखम होण्याची शक्यता आहे. जुने आजार डोके वर काढतील, याबाबतीत सावधगिरी बाळगावी. वर्षाच्या शेवटी आरोग्यात सुधारणा होईल. ऑपरेशन झालेले असेल तर काळजी राहणार नाही.

आर्थिक – जानेवारी, फेब्रुवारी महिने आर्थिक समस्या अचानक उभ्या राहतील. कर्ज काढतानादेखील अडथळे येतील. उधारी, उसनवारीबद्दल चिंता काळजी लागेल. मे महिन्यानंतर आर्थिक व्यवहार हे सुरळीत चालू लागतील. वर्षाच्या शेवटपर्यंत आर्थिक व्यवहारास गती प्राप्त झालेली असेल. हाती पैसादेखील खेळू लागेल. या काळात कौटुंबिक खरेदी कराल. दूरवर प्रवास, तीर्थयात्रेनिमित्त खर्चदेखील करणार आहेत. अचानकपणे ज्या पैशांची आपण आशा सोडलेली होतील, अशी रक्कम आापणास प्राप्त होईल. भूमी, वास्तू खरेदीच्या संधी प्राप्त होतील.

- Advertisment -

ताज्या बातम्या