Tuesday, April 23, 2024
Homeभविष्यवेधवार्षिक राशिभविष्य 2023 : कुंभ : कर्तव्यात सफलता, धनात प्रगती

वार्षिक राशिभविष्य 2023 : कुंभ : कर्तव्यात सफलता, धनात प्रगती

पुरुष – कर्तव्यात आणि धनात प्रगती यश मिळविणारे हे नवीन 2023 वर्ष असणार आहे. कुंभ राशी व्यक्तींना हे संपूर्ण वर्ष या वर्षातील संपूर्ण काळ हा आपले प्रत्येक पाऊल हा पुढे टाकणारा असणार आहे. मागील काही वर्षात आपली जी प्रगती थांबलेली होती ती प्रगती या वर्षात घोडदौड करणारी असणार आहे. आपण काहीही कार्य करा यश मिळवा! यशाची तर खात्रीच आहे. परंतु धनाच्याबाबतीत आपण आगेकूच करणार. धनाचे कार्य आपले प्रगतीपथावर राहील. काही कर्ज समस्या असतील, कुणाचे देणे असतील ती सर्व दिले जातील.

स्त्रीया – या नवीन वर्षात अविवाहित मुलींचे विवाह होतील. ज्या महिलांच्या विवाहास चार ते पाच वर्ष झाली अपत्य प्राप्ती नाही. त्यांना आपत्य प्राप्तीचे योग आहेत. टेस्ट ट्युब करुनही ज्यांचे प्रयत्न सफल झालेले नाहीत त्यांनी यावर्षी पुनरुपी प्रयत्न करावेत. आपणास यशाची शक्यता अधिक आहे. वादकारक संसार आहे तर अशांच्या संसारात संवाद निर्माण होवून सुखकार संसार सुरु होईल. घरात माहेरच्या मंडळींचे आगमन होईल. एखादे मंगलकार्य आपण संपन्न कराल. भाड्याच्या घरात राहत असाल तर स्वत:च्या घरात राहण्यास जाल.

- Advertisement -

नोकरवर्ग – नोकरवर्गाची चिंता, समस्या सोडविली जाणारे हे वर्ष आहे. आपली नोकरी क्षेत्रातील कामगिरी पाहून त्याप्रमाणे बढती मिळेल. कंपनीमार्फत अनेकांना परदेशगमनाच्या संधी प्राप्त होतील. पगारवाढ होईल. बदली हवी असेल तर बदली पण होईल. ज्यांना अजूनपर्यंत नोकरी मिळालेली नाही अशा समस्तांनी नोकरीसाठी जानेवारी ते मार्च महिन्यात प्रयत्न करावेत. एप्रिलनंतरच्या काळात आपणास नोकरीची संधी प्राप्त होईल. आपण उत्कृष्ठ कार्य करुन दाखवा. वरिष्ठ अधिकारी दखल घेतील.

व्यवसायिक – व्यवसाय म्हणजे सतत काम व सतत पैसे मोजणे यावर्षी व्यवसायिकांना कार्य आणि पैसे याबद्दलच्या कार्यासाठी वेळ अपूर्ण पडेल. या नवीन 2023चे वर्षात आपणास जेवढा व्यापार करावयाचा असेल तेवढा व्यापार करावा. स्टॉक अनुभवाच्या आधारावर करा. धाडसाने व्यापार करण्याचा हा काळ आहे. व्यापार वाढवावयाचा असेल तर जरुर व्यापार वाढवावा. आपल्या व्यापाराची नवीन शाखा उघडावयाची असल्यास तर या नवीन 2023चे वर्षात उघडावी. नवीन एजन्सी आपण घेऊ शकतात.

विद्यार्थीवर्ग – विद्यार्थीवर्गास जानेवारी ते एप्रिल हा काळ सामान्य स्वरुपाचा असणार आहे. परंतु अशुभ मुळीच नाही. या कार्यात अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न होईल. याबाबत सावध असावे. अभ्यासात मन विचलित होणार नाही. याबाबत काळजी घ्यावी. मे ते डिसेंबर 2023चा काळ अभ्यास करा. त्यास ग्रहाची साथ मिळणार आहे. यशाची प्राप्ती होईल. शालेय प्रवेशातील सर्व अडथळे दूर होतील. आपल्या इच्छेप्रमाणे आपणास कॉलेजात प्रवेश प्राप्त होईल. यशाची होण्याचे हे वर्ष आहे हे लक्षात घ्यावे.

राजकारणी – हे नवीन वर्ष 2023 जानेवारी ते मार्चचा काळ हा आपले हाती शासनाचा अधिक निधी असतील. सर्वाधिक निधी आपणास प्राप्त होतील. पक्ष आपले पक्षनिष्ठेबाबतची प्रामाणिकता बघून आपणाकडे अधिक महत्त्वाची जबाबदारी सोपविणार आहेत. मे ते डिसेंबर-2023चा काळ हा विजय मिळवून देणारा असेल. आपले कर्तृत्व पाहून(च) मतदार आपणास मतदान करणार आहेत. स्वार्थ प्रेरीत पक्ष बदल मतदार विचारात घेतील. आपली कार्यकर्ते आपणाकडून लाभाची मागणी उघडपणे करणार आहेत.

आरोग्य – आपले कार्य, आपले कर्तृत्व, आपणास मिळणारा पैसा हा इतरजणांच्या डोळ्यात येणारा असेल. याचा परिणाम आरोग्यावर होणारा असेल कार्य करतांना लहान-मोठी जखम होण्याची शक्यता आहे. पाण्यापासून धोका राहील. घसरुन पडण्याची शक्यता आहे. डोळ्याचे प्रॉब्लेम, नसांची दुखरी त्रस्त करणारी असतील, मुत्रादी विकार, किडणी विकाराची शक्यता राहील.

आर्थिक – नवीन 2023 हे वर्ष समस्त कुंभ राशी व्यक्तींना आर्थिक संपन्नता मिळवून देणारे असणार आहे. जानेवारी ते एप्रिलचा काळ हा आपले हाती दोन पैसे अधिक खेळत राहणारा असणार आहे. आपण जे कार्य पैसे मिळविण्यासाठी कराल. त्या कार्यातून आपणास पैसा उपलब्ध होईल. उधारी, उसनवारी अडकलेली असेल ती वसूल होईल. या काळात 2023 वर्षात कुणालाही आर्थिक उसनवारी करु नये. आर्थिक व्यवहार नोकराचे हाती न सोपविता आपण स्वत:च्या हाताने करावेत.

नातीगोती- छोटे मावसाजी, छोटी मामी, लहान काका यांच्याशी आर्थिक व्यवहार करतांना सावधानता बाळगावी. शक्यतोवर आर्थिक व्यवहारास नकार द्यावा. मोठे मामा व मोठ्या ताई यांच्याकडे मंगलकार्याचे आयोजन केले जाणार आहे. आईला जड जोखमीची मेहनतीची कामे सांगू नका. लहान-मोठी जखम होण्याची शक्यता आहे. लहान साळा, लहान साळी शिक्षण घेत असल्यास त्यांना यश मिळणार. त्यांना नोकरी हवी असल्यास नोकरीच्या संधीपण प्राप्त होणार आहेत. विवाह इच्छुक असल्यास विवाह पण होतील. सासूरवाडीपासून दोन हात दूर रहावे. वार्तालापाने कार्य करावे.

- Advertisment -

ताज्या बातम्या