अमित शहा : सध्या प्रबळ...पुढे ?

अमित शहा : सध्या प्रबळ...पुढे ?

सध्या केंद्रीय सत्तेत पंतप्रधान मोदी यांच्यानंतर सर्वात प्रबळ नेतृत्त म्हणजे गृहमंत्री अमित शहा. मोदी सरकारचा चेहरा असले तरी पडद्याआडील सर्व घडामोडींवर कमांड शहा यांची. सतत पक्षवाढ आणि न थकता सातत्याने निवडणूक मोहिमा राबविण्याबाबत त्यांची बरोबरी करणारा दुसरा नेता नाही.

भारतीय जनता पक्षाचा चेहरा-मोहरा बदलण्यात त्यांचा वाटाही मोठा आहे. पक्षाला जे यश मिळाले, त्यात मोदींनंतर मोठा वाटा उचलणारे नेते म्हणून त्यांचा उल्लेख होतो. म्हणून मोदींचे उत्तराधिकारी ते ठरतील का, असा प्रश्न उपस्थित केला जातो. मात्र त्यांच्या कुंडलीचा अभ्यास केला असता त्यांची सध्याची स्थिती सर्वोच्च असल्याचे दिसते.

22 ऑक्टोबर 1964 ही त्यांची जन्मतारीख. मुंबई हे जन्मठिकाण तर 5.40 ही जन्मवेळ. जन्मराशी मेष तर नक्षत्र भरणी-1 होय. त्यांच्या राशीत 22 नोव्हेंबर 2003 ते 21 नोव्हेंबर 2021 पर्यंत दशमातील मिथुनच्या राहूची महादशा आहे. हाच कालखंड त्यांना जीवनातील अत्युच्च स्थान देणारा. स्वकतृत्वाच्या जोरावर पुढे जाण्यासाठी अत्यंत योग्य. तसे घडलेही आहे. राज्याच्या राजकाणातून थेट देशाच्या राजकारणात प्रभाव निर्माण करण्याची संधी त्यांना मिळाली.

21 नोव्हेंबर 2021 नंतर गुरुची महादशा सुरू होणार असून गुरु भाग्यात कृत्तीका नक्षत्री वक्री असल्याने कोणत्याही गोष्टीच्या सातत्यात काही वेळेस खंड पडण्याचे योग आहेत.

भाग्यस्थान भाग्येश, लाभस्थान कुटुंबस्थान व कुटुंबेष दूषित असल्याने येणार्‍या लोकसभेत तरी त्यांना सर्वोच्चस्थानी विराजमान होण्याचे योग नाहीत. मात्र किंगमेकर किंवा त्यांच्या समर्थकांच्या भाषेत भाजपचे चाणक्य म्हणून महत्वाची भुमिका बजावण्याचे योग आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com