Wednesday, April 24, 2024
Homeभविष्यवेधआमिर तिसर्‍यांदा बाशिंग बांधणार ?

आमिर तिसर्‍यांदा बाशिंग बांधणार ?

प्रफुुुल्ल कुलकर्णी-ज्योतिषभास्कर, सामुद्रिक मार्तंड,8888747274

आमिर खान यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर अनेक चित्रपट हिट केले. फिल्मफेअर पुरस्कार, चार राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार अन्य अनेक पुरस्कार त्यांनी पटकावले. 2003 मध्ये भारत सरकारकडून पद्मश्री आणि 2010 मध्ये पद्मभूषण देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.

- Advertisement -

2017 मध्ये चीन सरकारकडून त्यांना सन्माननीय पदवी मिळाली. मोहम्मद आमिर हुसेन खान असे त्यांचे पूर्ण नाव. जन्म 1 मार्च 1965 रोजी त्यांचा जन्म झाला. उत्तम अभिनेता, दिग्दर्शक, चित्रपट निर्माते आणि टॉक शो होस्ट करण्यासोबत सामाजिक कार्यातही अग्रेसर असे हे नाव!

हिंदी चित्रपटांमध्ये 30 वर्षांच्या कारकिर्दीत भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय आणि प्रभावी अभिनेते म्हणून आज त्यांची ओळख आहे. खासकरुन भारत आणि चीनमध्ये त्यांचे कोट्यवधी चाहते आहेत. न्यूजवीकने तर त्यांचा जगातील सर्वात मोठा चित्रपट स्टार म्हणून गौरव केला आहे.

आमिर हे चित्रपट सृष्टीत त्यांचे काका नासिर हुसेन यांच्या यादों की बरात (1973) चित्रपटात सर्वप्रथम बाल कलाकार म्हणून झळकले. होली (1984) या चित्रपटातून त्यांनी खर्‍या अर्थाने या क्षेत्रात करिअरची सुरूवात केली.

कयामत से कयामत तक (1988) हा चित्रपट प्रचंड गाजला आणि अमिर स्टार झाले. राख या चित्रपटातील त्यांच्या अभिनयामुळे त्यांना विशेष उल्लेखनिय गटात राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला.

1990 च्या दशकात त्यांनी अनेक हिट चित्रपट दिले. राजा हिंदुस्थानी, सरफरोश या चित्रपटांनी त्यांना मोठे व्यावसायिक यश मिळवून दिले. 1999 मध्ये त्यांनी आमिर खान प्रोडक्शन्सची स्थापना केली. लगान (2001) हा चित्रपट याच संस्थेची निर्मिती.

परदेशी भाषा गटात सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी लगान थेट ऑस्करमध्ये पोहचला होता.सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपटाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि दोन फिल्मफेअर पुरस्कार या चित्रपटाने पटकावले.

फना, रंग दे बसंती, तारे जमीन पर गजनी, थ्री इडियट्स, धूम, पीके आणि दंगल या विविधांगी विषयांवरील चित्रपटांनी मोठे यश मिळवून दिले. आमिर खान यांनी चित्रपटाची निर्मिती करताना भारतीय समाजातील सामाजिक प्रश्नांशी संबंधित कथानक घेऊन निर्मिती केली. व्यावसायिक चित्रपटांतूनही त्यांनी सामाजिक संदेश दिला.

सत्यमेव जयते या टॉक शोची निर्मिती व सुत्रसंचलन केले. भारतातील संवेदनशील सामाजिक विषयां या कार्यक्रमातून हाताळले. हा कार्यक्रम प्रभावी ठरला. समाजिक जाणीवेतून केलेल्या कार्यामुळे गरीबी, शिक्षण, सामाजिक वर्तन आणि भेदभाव अशा अनेक विषयांना या कार्यक्रमातून त्यांनी हात घातला. जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या टाइम 100 यादीमध्ये त्यांचा समावेश झाला होता.

आमिर खान यांनी पहिल्या पत्नी रीना दत्ताशी पंधरा वर्षे संसार केला. त्यानंतर त्यांनी चित्रपट दिग्दर्शक किरण राव यांच्याशी लग्न केले. त्यांचा नुकताच झालेला घटस्फोट देशात चर्चेचा विषय ठरला. दुसरी पत्नी किरण राव व त्यांनी मिळून अनेक चित्रपटांची निर्मिती केली. तसेच पाणी फाऊंडेशच्या माध्यमातून ते सामाजिक कार्यात सक्रीय आहेत.

आमिर खान यांनी वयाच्या 56 व्या वर्षी घटस्फोट का घेतला?. अमीर खान तिसरे लग्न करणार का? अमीर व किरण राव आता नवरा बायको म्हणून नाही तर मित्र म्हणून एकत्र काम करणार म्हणजे काय करणार? असे अनेक प्रश्न आहेत.

हस्त सामुद्रिक शास्त्र एकमेव असे शास्त्र आहे की ते व्यक्तीची मानसिकता, व्यक्तिमत्व व कामेच्छा किती प्रमाणात आहेत, याचा अचूक अंदाज बांधते. त्या प्रमाणे व्यक्तीच्या संपूर्ण चरित्राची ओळख होत असते व ती व्यक्ती कोणत्या परिस्थितीत कुठला निर्णय घेऊ शकते, याचा अंदाज कितीतरी वर्ष आधी घेता येतो.

कुठलीही संस्कारी व्यक्ती लग्न बंधनात गुंतली, अपत्ये झाली की दोघांते एक अतूट नाते व प्रेमसंबंध दृढ होतात. दोघेही एकमेकांची काळजी घेतात. एकमेकांच्या भावना जीवापाड जपतात. नवरा बायकोचे वाद होत नाही, असे जोडपे सापडणार नाही. परंतु ते विभक्त होत नाहीत. एक मेकांचे दोष, आवडी निवडी सांभाळल्या कि वैवाहिक सौख्यात गोडी राहते. कारण विवाह उपरांत दोघे तन, मन, धनाने एकत्र येतात. दीर्घ काळ एकत्र राहिल्याने एकमेकात अतूट नाते निर्माण झालेले असते. वरील सर्व बाबींना अमीर खान अपवाद आहेत. असे का?

उजवा हात

उजव्या हाताची पहिली आडवी हृदय रेषा आहे ती मधल्या बोटा खाली म्हणजेच शनी ग्रहाच्या मध्यावर थांबली आहे व ती बर्‍यापैकी सरळ रेषेत आहे. अश्या वेळेस व्यक्तीचे कामजीवन इतरांपेक्षा अधिक बहरलेले असतेे. तसेच हृदय रेषेला फाटा नसल्याने व अचानक शनी ग्रह खाली थांबल्याने मनुष्य स्वार्थी असतो. आपल्या सुखा पुढे दुसर्‍यांच्या भावभावनांचा विचार ते करीत नाही.

आपल्याला जे वाटते जे सोयीस्कर आहे, तोच निर्णय अश्या व्यक्ती घेतात. यासाठी आपण चित्रपट क्षेत्रातील ऐश्वर्या राय यांच्या हातावरील सरळ हृदय रेषेचे उदाहरण पहिलेच आहे. त्यांनी प्रेमाचा त्याग करून व्यवहारी निर्णय घेतला. हृदय रेषा भाव-भावना, प्रेम, वात्सल्य व स्वार्थी भाव मुखतः दाखविते तसेच हृदय रेषा ज्या ग्रहावर थांबते त्या ग्रहाचे कारकत्व तिच्यात सम्मिलीत होतात.

डावा हात

आमिर खान यांच्या डाव्या हातावरील हृदय रेषा शनी ग्रहाच्या सानिध्यात थांबली आहे. परंतु ती शनी ग्रहाचा मधोमध थांबलेली नाही ती गुरु ग्रहाच्या क्षेत्राच्या अलीकडे थांबलेली आहे. म्हणजेच उजव्या कर्माच्या हातावरील हृदय रेषेपेक्षा डाव्या हातावरील संचिताचा हातावरची हृदय रेषा किंचित उजवी आहे. त्यामुळे हृदय रेषेत थोडे गुरु प्रभावी अंश आल्याने व डाव्या हातावरील हृदय रेषा उजवी असल्याने दर दोन पांच वर्षाने वैवाहिक जीवन संपुष्टात आले नाही, तर ते निदान 15 – 15 वर्ष टिकले. दोनही हातावरील शुक्र ग्रहाचा प्रभाव मोठा आहे. डाव्या व उजव्या हातावर आयुष्य रेषेतून भाग्य रेषा उगम पावली आहे. त्यामुळे आयुष्यात यांना काम मिळण्यासाठी झगडावे लागत नाही. आर्थिक सुबत्ता खूप मोठी आहे.

दोन्ही हातावरची रवी रेषा आंतरराष्ट्रीय ख्याती देणारी आहे. हातावर आडव्या तिडव्या रेषा नाहीत. त्यामुळे जीवनात सौख्य मिळण्यात अडचणी नाहीत. तळ हाताच्या आकारा पेक्षा बोटे लांबीला छोटी आहेत. अश्या वेळेस मागचा पुढचा विचार न करता जलद निर्णय घेण्याची प्रवृत्ती या छोट्या लांबीच्या बोटांमुळे प्राप्त होत असते. अमीर खान यांनी पहिल्या दोन पत्नी बरोबरचे संबंध संपुष्टात का आणले याचे उत्तर आपण हस्त सामुद्रिक पाहताना आणखी एक लक्षात घ्यायला हवे की आमिर यांना धार्मिक प्रथेनुसार बहुविवाहाची परवानगी आहे. शिवाय प्रतिष्टीत असल्याने पत्रकार परिषद घेऊन संमतीने विभक्त झाल्याचा निर्णय त्यांनी आपल्या चाहत्यांना कळविला. ज्या पत्नींना घटस्फोट दिला त्यांना त्यांच्या जीवनात आर्थिक त्रास होऊ नये याची खबरदारी त्यांनी घेतलीच असणार. शिवाय तीन अपत्यांचे पालन पोषणाची जबाबदारी उचलली असणार, ह्या गोष्टी आमिर यांना सहज शक्य आहेत.

हस्त सामुद्रिक दृष्ट्या विवेचनात अमीर यांच्या स्वभावाचे पैलू, त्यांनी निवडलेला मार्ग, त्यांची प्रेम भावना, संपत्ती व प्रसिद्धी यांचा विचार करता ते पुन्हा नवीन संसाराला लागू शकतात.

- Advertisment -

ताज्या बातम्या