Wednesday, April 24, 2024
Homeभविष्यवेधअजितदादांच्या यशात शनी रेषा आडवी!

अजितदादांच्या यशात शनी रेषा आडवी!

राज्याच्या राजकारणात अजित पवार हे एक मोठे नाव आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांचे स्थान दुसर्‍या नंबरचे मानले जाते. पहिल्या नंबरवर अर्थातच ज्येष्ठ नेते शरद पवार आहेत. मागच्या आठवड्यात अमित शहा यांच्या दोनही हातांच्या फोटो वरून हस्तसामुद्रिकदृष्ट्या लेख लिहिला होता. त्यांच्यापेक्षा वयाने मोठे व राजकारणातला अनुभव देखिल मोठा असलेले अजित पवार यांच्या उजव्या हातावरील फोटावरून त्यांचे व्यक्तिमत्व, त्यांना साथ देणारे भाग्य, त्यांच्या आयुष्यात उतुंग भरारी घेण्यात येणार्‍या अडचणी, हुशारी, विद्वत्ता, निर्णय क्षमता, राजकारणातील डावपेच इत्यादी अनेक व्यक्तिमत्वाच्या पैलूंवर व त्यांना साथ देणार्‍या, न देणार्‍या ग्रह रेषा यांच्या कारकत्वावर आज प्रकाश टाकणार आहे.

तेे शरद पवार यांचे पुतणे. त्यामुळे राजकारणातील प्रवेश तसा सोपा ठरला. सहकारातील अनेक संस्थांवर त्यांना तरूणपणीच संधी मिळाली. खासदार म्हणून ते निवडून आले होते. पुढे काकांसाठी खासदारकी सोडली. पुढे विधानसभेवर निवडून आले. उपमुख्यमंत्रीपदही मिळाले. सध्या ते विरोधी पक्ष नेते आहेत. मंत्रालयातील विविध मोठ्या खात्यांचा त्यांचा प्रशासकीय अनुभवही दांडगा आहे. परंतु मुख्यमंत्री होण्याची संधी त्यांच्यापर्यंत आलीच नाही. राज्य बँक व जलसंधारण घोटाळ्याच्या आरोपांना त्यांना सामोरे जावे लागले.

- Advertisement -

त्यांच्याकडे विद्वत्ता आहे, हुशारी आहे. हातावरील बुध रेषा त्यांना जनमानसात कायम चर्चेत राहाण्याची खुबी देत आहे. स्वतःला कसे प्रेझेन्ट करायचे त्याचे त्यांना उपजत ज्ञान आहे. घरी ऐश्वर्य आहे, त्यामुळे कमवून घर चालवायची चिंता नाही. त्यांना राजकारणात पूर्णवेळ काम करण्याची मोकळीक आहे. आयुष्य रेषा खणखणीत आहे, त्यासोबत मंगळ रेषा पूर्ण लांबीची असल्याने कामाची क्षमता दांडगी आहे. परंतु त्याचबरोबर मंगळ रेषा उत्कट भावना व क्रोधाची भावना तीव्र करत आहे. त्याचे प्रत्यंतर सर्वांना आले आहे.

क्रोधाची भावना व त्यावर नियंत्रण हातावरील गुरु ग्रह अर्थात गुरु महाराज नियंत्रित ठेवण्याचे काम चोख बजावीत आहे. त्यांच्या हातावरील हृदय रेषा गुरु ग्रहावर मधोमध जाऊन थांबली आहे. त्यामुळे ते सहृदयी, प्रेमळ, न्याय बुद्धीचे व कायदा पाळणारे आहेत. गुरु ग्रह उभार घेतलेला असल्याने तो शुभ आहे. गुरु ग्रह सात्विकता प्रदान करतो.

राजकारणात जलद निर्णय क्षमतेला व खेळीला अत्यंत महत्त्व आहे. जुगाड करतो तो राजकारणात यशस्वी होतो. परंतु प्रत्येक राजकारण्यांचे आडाखे, खेळी यशस्वी होत नाही, त्याला भाग्याची साथ लागते. उतुंग भाग्याचा लाभ होण्यासाठी किंवा राजकारणात उच्चपद व अधिकार मिळण्यासाठी ग्रह, रेषा व चिन्हांच्या शुभ फळाची साथ लागते. राजकारणात खेळी यशस्वी होण्यासाठी तळहातावरील मैदान मोकळे असावे लागते. म्हणजे हातावर मुख्य रेषांव्यतिरिक्त हातावर आडव्या रेषा नकोत. ते ज्या राजकीय पक्षात किंवा आखाड्यात आहेत तेथे त्यांचे काका अतिभाग्यवान आहेत. त्यांच्या इतके भाग्य दादांना लाभलेले नाही. राजकीय आखाड्यात स्पर्धक जर भाग्यवान असेल तर विजयश्री तेच पटकावतात. आंतर्मनाची चाहूल ही त्यांना मिळालेली देणगी आहे. भविष्यात काय घडते किंवा घडणार आहे याची जाणीव त्यांना होत असते. ही अंतरमनाची चाहूल त्यांच्या त्यांच्या हृदय रेषा व मस्तक रेषेच्या मधे, शनी ग्रहाखाली भाग्य रेषेच्या मदतीने झालेल्या डमरू आकाराच्या चिन्हामुळे लाभली आहे.

त्यांच्या हातावरील मस्तक रेषा लांब आहे. ही रेषा चंद्र ग्रहावर उतरली आहे. त्यामुळे त्यांच्या कल्पना भन्नाट असतात. कधी कधी अवास्तवादी व जलद निर्णय घेणार्‍या आहेत. परंतु त्याच्यावर आणखी एक मस्तक रेषेचा तुकडा वरच्या मंगळ ग्रहावर आहे व तो वास्तविक जगाच्या व परिस्थितीची कल्पना देण्याचे व सजग ठेवण्याचे काम करीत आहे. चंद्र ग्रहावरून मनगटाच्या बाजूने आणखी एक वर येणारी रेषा, मस्तक रेषेपर्यंत आल्याने ही रेषा चुकलेले आडाखे व निर्णय अंगाशी न येण्याचे किंवा निर्णयाच्या विपरीत परिणामांची जाणीव करून देण्याचे काम करीत असल्याने जनमानसातील व पक्षातील त्यांची प्रतिमा स्वच्छ व निष्ठावंत ठेवण्याची बुद्धी त्यांना देत आहे.

उतुंग यशातील अडथळे

त्यांच्या उजव्या हाताच्या, तळहाताकडून अंगठ्याच्या बाजूने असलेला फोटो दादा यांच्या हातावरील पाचही बोटे लांब व पहिल्या पेर्‍यात फुगीर आहेत. अंगठासुद्धा पहिल्या पेर्‍यात फुगीर आहे. त्यामुळे त्यांच्यात नेतृत्व क्षमता आहे. अंगठा पहिल्या पेर्‍यात फुगीर असल्याने विरोधकांना धोबी पछाड करण्याची उत्कट भावना आहे व त्याप्रमाणे कृती केल्याशिवाय ते शांत बसू शकत नाहीत. मधले शनीचे व तिसरे रवीचे बोट जवळ जवळ लांबीला सारखे असल्याने रवि ग्रहाचे कारकत्व वाढीस लागले आहे. त्यामुळे राजकारणात जुगार खेळण्याच्या प्रवृत्तीत वाढ झालेली आहे. या प्रवृत्तीला अंगठ्याच्या दुसर्‍या पेर्‍यात एक ठळक आडवी रेषा असल्याने, निर्णय होत नाहीत किंवा झाले तर चुकीचे व घाईने होतात. त्यांच्या हातावरील शनि रेषेचा तुकडा अर्ध्या शनि ग्रहाच्या भागाला ग्रासलेला आहे. त्यामुळे दादांच्या जीवनात विनाकारण अडचणी येतात. सहज सुटणारे गणित अवघड होऊन जाते. शनी ग्रहावरील गेलेली आडवी रेषा गुरु ग्रहाच्यापर्यंत जाऊन थांबली आहे. शिवाय त्यावर छेद देणार्‍या दोन छोट्या रेषा आहेत. या आडव्या रेषेमुळे त्यांच्या आयुष्यात दहापैकी निदान तीन बाबी किंवा योजलेली कामे अडकून राहतात. त्यातुन सुटका लवकर होत, यशस्वी होत नाही. त्यांच्या काही महत्वाचे आराखडे व कामे या न त्या कारणाने विनाकारण प्रलंबित राहतात. कालांतराने ती कामे झाली किंवा त्या अडचणीतून सुटका झाली तर त्या गोष्टींचा विचार त्यांनी सोडून दिलेला असतो किंवा ते काम कालांतराने यशस्वी झाले तरी त्यातला त्यांचा इंटरेस्ट संपलेला असतो.

त्यांच्या उतुंग यशात त्यांच्या हातावर हृदय रेषेच्या वर एक आडवी शनी रेषा असल्याने ती त्यांच्या सर्वोच्च यशाच्या मार्गात अडथळा आहेत. व्यक्ती कितीही विद्वान, चालाख, नीतिवान, मोठा राजकारणी, ऐश्वर्य संपन्न, उच्च पद उपभोगत असला तरी, हृदय रेषेवरची शनी रेषा आडवी असल्यास त्या व्यक्तीस, अतिउच्चपदाच्या लाभापासून वंचित ठेवते. माजी गृहमंत्री शिवराज पाटील निलंगेकर यांच्या नावावर राष्ट्रपतीपदासाठी सोनिया गांधी यांच्याकडून शिक्कामोर्तब होऊनही ते राष्ट्रपतिपदाच्या शर्यतीतून मागे पडले होते. त्यांच्या हातावरही शनि ग्रहावर हृदय रेषेच्या वर एक आडवी शनी रेषा आसल्याने, राष्ट्रपती पदाची माळ त्यावेळी प्रतिभाताई यांच्या गळ्यात आली.

त्यांची राजकारणातील कारकीर्द खूप मोठी आहे. त्यांचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. पक्षात त्यांना मानणार्‍या आमदारांची संख्या मोठी आहे. ते दिलेला शब्द मोडित नाहीत. त्यांचे राजकारणातील कट्टर विरोधकसुद्धा त्यांचे मित्र आहेत. त्यांचे स्वतःचे राजकारणातील काही आडाखे आहेत. त्यांचे विचार, वर्तन, सभ्य व सुसंस्कृत आहे. देशाच्या व महाराष्ट्राच्या हिताचे आहे, कारण त्यांचा गुरु ग्रह बलवान असल्याने तो शुभ फल देणारा आहे. शनी ग्रहावरील आडव्या रेषेमुळे त्यांनी मनावर दगड ठेऊन राजकारणात काही बाबी स्वीकारल्या आहेत. त्यांना उदंड आयुष्य आहे व वयाच्या 85 व्या वर्षापर्यंत त्यांचा कामाचा उ

- Advertisment -

ताज्या बातम्या