Friday, April 26, 2024
Homeभविष्यवेधदर्शन दिल्यानंतर गायब होते शिवमंदिर

दर्शन दिल्यानंतर गायब होते शिवमंदिर

श्रावण महिन्यात प्रमुख तीर्थक्षेत्रांना भेट देणे खूप फलदायी आहे. त्यामुळे श्रावण महिन्यात देशातील प्रमुख शिवमंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी असते. यातील अनेक मंदिरे प्राचीन आहेत आणि त्यांच्याशी निगडित रहस्यांमुळे जगभरातून लोक त्यांना भेटायला येतात. गुजरातमधील वडोदरा येथे असेच एक जगप्रसिद्ध मंदिर आहे, जे दररोज गायब होते आणि पुन्हा प्रकट होते. हा रोमांचक कार्यक्रम पाहण्यासाठी येथे दररोज मोठ्या संख्येने लोक येतात. हे शिवमंदिर समुद्रात वसलेले आहे.

भगवान शंकराचे हे प्रसिद्ध मंदिर,स्तंभेश्वर महादेव मंदिर समुद्रात आहे. या मंदिराची स्थापना भगवान शिवपुत्र कार्तिकेयाने केली असे मानले जाते. समुद्राच्या आत असलेले हे मंदिर दिवसातून दोनदा पाण्यात बुडते आणि नंतर ते दिसू लागते. खरे तर दररोज या समुद्रातील पाण्याची पातळी इतकी वाढते की मंदिर पाण्याखाली जाते आणि नंतर पाण्याची पातळी कमी झाल्यावर मंदिर पुन्हा दिसू लागते. ही घटना दररोज सकाळी आणि संध्याकाळी घडते.

महासागर करतो शिवाचा अभिषेक

- Advertisement -

शिवमंदिर समुद्रात बुडून पुन्हा प्रकट होण्याच्या या घटनेला भक्तांनी समुद्रात केलेला शिवाचा अभिषेक म्हणतात. जेव्हा समुद्राची पातळी वाढू लागते तेव्हा काही काळासाठी भाविकांचा मंदिरात प्रवेश बंद केला जातो. स्कंद पुराण आणि शिवपुराणातील रुद्र संहितेत, स्तंभेश्वर मंदिराविषयी असे म्हटले आहे की ताडकासूर राक्षसाने कठोर तपश्चर्या करून शिवाकडून वरदान घेतले होते की केवळ शिवाचे पुत्रच त्याचा वध करू शकतात. यानंतर केवळ 6 दिवसांच्या कार्तिकेयाने तडकासूरचा वध करून लोकांना तडकासूरच्या प्रलयातून मुक्त केले. यानंतर ज्याठिकाणी राक्षसाचा वध करण्यात आला. त्याच ठिकाणी हे शिवमंदिर बांधण्यात आले. या मंदिराचा शोध सुमारे 150 वर्षांपूर्वी लागला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या