मस्तक रेषेत होती आबेंची हुशारी

भविष्य आपल्या हाती
मस्तक रेषेत होती आबेंची हुशारी

शिंझो आबे यांचा जन्म 21 सप्टेंबर 1954 रोजी झाला. ते जपानचे पंतप्रधान होते. 2006 ते 2007 आणि पुन्हा 2012 ते 2020 पर्यंत ते जपानी इतिहासातील सर्वात जास्त काळ पंतप्रधान राहिले. आबे यांचा जन्म टोकियोमधील एका प्रतिष्ठित राजकीय कुटुंबात झाला होता. तत्कालीन पंतप्रधान नोबुसुके किशी यांचे ते नातू. आबे 1993 च्या निवडणुकीत प्रतिनिधीगृहात निवडून आले. तेव्हाचे पंतप्रधान कोइझुमी यांनी 2005 मध्ये मुख्य कॅबिनेट सचिव म्हणून त्यांची नियुक्ती केली आणि त्यानंतरच्या वर्षी त्यांची पंतप्रधान आणि लिबरल डेमोक्रॅटीक पक्षाचे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती झाली. आबे हे दुसर्‍या महायुद्धानंतरचे जपानचे सर्वात तरुण आणि पहिले पंतप्रधान. अल्सरेटिव्ह कोलायटिस आजारामुळे आबे यांनी 2020 साली पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. आबे हे कट्टर पुराणमतवादी होते. राजकीय विश्लेषक त्यांचा उजव्या विचारसरणीचे जपानी राष्ट्रवादी असे वर्णन करत.

प्रफुुुल्ल कुलकर्णी

जपानी राजकारणातील ध्रुवीकरण करणारे व्यक्तिमत्व म्हणून आबे यांची ओळख त्यांच्या समर्थकात कायम राहील. त्यांनी जपानची सुरक्षा आणि आंतरराष्ट्रीय दर्जा मजबूत करण्यासाठी काम केले. विरोधक त्यांच्या राष्ट्रवादी धोरणांवर टीका करत. जपानी शांततावादाला धोका निर्माण करण्याचा आणि चीनशी संबंध खराब करण्याचा आरोपही त्यांच्यावर झाला.

जपानचे पंतप्रधान म्हणून आबे यांनी त्यांच्या कार्यकाळात जपान-भारत संबंध सुधारण्याचा मोठा प्रयत्न केला. आबे यांनी 2007 मध्ये जपान, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील चतुर्भुज सुरक्षा संवादाची सुरुवात केली. ऑगस्ट 2007 मध्ये त्यांच्या तीन दिवसीय भारत भेटीमध्ये भारत आणि जपान यांच्यातील मैत्रीपूर्ण द्विपक्षीय संबंधांच्या दीर्घ इतिहासावर आधारित द्विपक्षीय आशियाई युतीचा प्रारंभ केला. आबे यांचा पुढाकार उदयोन्मुख परिस्थितीत पाचवा द्विपक्षीय दुवा स्थापित करण्याचा होता. आशियामध्ये एक महत्त्वपूर्ण भागीदार मिळवताना जपानच्या आर्थिक निर्देशकांना चालना देण्यासाठी त्यांनी भारत मैत्रीचा आधार घेतला.

8 जुलै 2022 रोजी आबे यांना वरिष्ठ सभागृहाच्या निवडणुकीच्या दोन दिवस आधी नारा येथे प्रचाराचे भाषण देताना जपान सागरी सेल्फ-डिफेन्स फोर्सच्या माजी सदस्याने गोळ्या झाडल्या, त्यात त्यांचा मृत्यू झाला. घटनास्थळी अटक करण्यात आलेल्या संशयिताने आबे यांचे युनिफिकेशन चर्चशी संबंध असल्यामुळे त्यांना लक्ष्य केल्याची कबुली दिली. आबे यांची ओळख भारतीयांना त्यांच्या भारत भेटीच्या दरम्यान झाली. त्यांनी भारतासोबत अनेक व्दिपक्षीय करार करून जपान-भारत संबंध दृढ करण्याचा प्रयत्न केला.

कोरियाचा हुकूमशहा किम जोंग असेल किंवा जपानचे माजी पंतप्रधान आबे, त्यांच्या हातावरील रेषा, ग्रह, चिन्हे, हाताचा व बोटांचा आकार व्यक्तिमत्वाबरोबरच संपूर्ण आयुष्याचा लेखाजोखा कळून येतो. हातावरील रेषा बदलतात, त्यामुळे हस्तरेषेवरून भाकीत करताना ते बदलते, हा समज चुकीचा आहे.

आबे यांचे हस्त परीक्षण

मस्तक रेषा - आबे यांचे दोन्ही हाताचे फोटो उपलब्ध झाल्याने त्यांच्या जीवनातील विविध घटनांची उकल झाली. त्यात त्यांची हुशारी व आरोग्य महत्वाचे आहे. त्यांची उपजत हुशारी प्रचंड होती. आबे यांची हुशारी त्यांच्या दोन्ही हातावरील मस्तक रेषेमुळे दिसून येत. दोन्ही हातावरील मस्तक रेषा चंद्र ग्रहावर खाली उतरलेल्या आहेत व त्यांची लांबी तळहाताच्या बाहेरपर्यंत आहे. मस्तक रेषा चंद्र ग्रहावर उतरलेली असल्यास कल्पना प्रचंड असतात आणि चंद्र ग्रहाच्या कारकत्वामुळे त्या संवेदनशील असतात.

आबे यांच्या दोन्ही हातावर अंतर्ज्ञान रेषा - चंद्र ग्रहावर मणिबंधाकडून तळहातावर येणारी चंद्र प्रभावी रेषा त्यांच्या दोनही हातावर आहे. ही रेषा अंतर्ज्ञानाची आहे. या अंतर्ज्ञान रेषेमुळे आबे यांची राजकीय वाटचाल सुकर झाली. कारण त्यांचे राजकारणातील अचूक आडाखे, मानसिकता यांचे उपजत ज्ञान अंतर्ज्ञान रेषेकडून मिळाल्यामुळे ते वरचढ ठरले व निवडून आले. डाव्या हातावरची अंतर्ज्ञान रेषा मस्तक रेषेला जाऊन मिळाली आहे. त्यामुळे मस्तक रेषेचे कार्य अधिक सजग झाले.ही रेषा तीव्र बुद्धिमत्तेचे द्योतक आहे. चंद्र ग्रह स्वच्छ आहे. त्यामुळे आबे यांच्या भावभावना व कल्पना यांच्यात कधीही गोंधळ झाला नाही. ते आपल्या निर्णयावर कायम ठाम राहिले व जपानच्या आर्थिक व सामरिक शक्तित त्यांचे मोठे योगदान आहे.

हृदय रेषा - आबे यांच्या डाव्या हातावर मुख्य हृदय रेषा एक ठळक व वरच्या बाजूची पूर्ण लांबीची पण अस्पष्ट आहे. या दोन हृदय रेषांनी त्यांना अत्यंत संवेदनशील बनवले. हृदय रेषा, मस्तक रेषा चंद्र ग्रहावर उतरलेली व बोटांच्या पहिल्या पेर्‍यावर फोडासारखा फुगीरपणा आहे. हा फुगीरपणा त्यांच्या संवेदशीलते अधिक भर घालत होता. त्यामुळे दया, करुणा प्रचंड होती.

आयुष्य रेषा - त्यांच्या डाव्या हातावरची आयुष्य रेषा पूर्ण लांबीची मणिबंधापर्यंत आहे. परंतु उजव्या हातावरची आयुष्य रेषा वयाच्या 52 वर्षानंतर पुसट झाली आहे. आबे यांनी 2007 मध्ये स्वास्थ्य ठीक नसल्याने पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला होता. त्यांचा हा आजार कधीही पूर्णपणे बरा झाला नाही. हातावरील आयुष्य रेषा पुसट झाली असेल तर त्या व्यक्तीला निश्चितच शारीरिक व्याधीने घेरलेले असते. दोनही हातावरच्या आयुष्य रेषेपैकी एका हातावरची आयुष्य रेषा ज्या वय वर्षात पुसट झाली असेल त्या वय वर्षापासून शारीरिक व्याधी किंवा आजारपणाला सुरवात होते. त्यांच्या हातावरील आयुष्य रेषा वय वर्ष 52 नंतर वयाच्या 68 वयापर्यंत पुसट झाली होती. त्यांच्या आयुष्य रेषेला मंगळ रेषचे संरक्षण नव्हते.

खुनी हल्ला - निधन अपघाताने, हल्ला केल्याने किंवा अकस्मात झाल्यास आणि व्यक्ती श्रीमंत, राजकारणी किंवा सुप्रसिद्ध असेल तर याबाबत अधिक चर्चा होते. आबे यांच्या डाव्या हातावर हृदय रेषा, मस्तक रेषा व आयुष्य रेषा यांचा उगम एकत्र झालेला आहे. अशी स्थिती असता यांचे निधन अकस्मात होण्याची शक्यता जास्त असते. उजव्या हातावरील आयुष्य रेषेने तर त्यांची साथ सोडलेली होती. वय वर्ष 52 पासूनच त्यांची आयुष्य रेषा पुसट झाली होती. केवळ औषध उपचारावर ते जगत होते. व्यक्तीचा शेवट किंवा निधन हे पाप ग्रह शनीच्या अधिपत्याखाली होत असते. आबे यांच्या उजव्या हातावर शनी व रवी ग्रहाचे दरम्यान आडेव्या रेषांचे चट्टे आहेत. या आडव्या चट्यामुळे व डाव्या हातावरील हृदय रेषा, मस्तक रेषा व आयुष्य रेषा यांच्या एकत्रित उगमामुळे आकस्मित खूनी हल्ल्याने त्यांचे निधन झाले.

ज्योतिषभास्कर, सामुद्रिक मार्तंड

8888747274

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com